औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. यानंतर आता या मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी माहिती दिली. डॉ.गणेश वीरभद्र शेटकर या अपक्ष उमेदवाराने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली.

Maharashtra MLC Election Results Live: “..म्हणून मी जिंकणार”,शुभांगी पाटील यांनी सांगितलं मतांचं गणित; सत्यजीत तांबेंच्या पराभवाचा दावा!

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’
ips officer abdur rahman marathi news, ips officer abdur rahman dhule lok sabha marathi news
धुळे मतदारसंघात ‘हे’ माजी पोलीस महानिरीक्षक वंचितचे उमेदवार

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात असलेले १४ उमेदवार

१. काळे विक्रम वसंतराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
२. पाटील किरण नारायणराव (भारतीय जनता पार्टी)
३. माने कालीदास शामराव (वंचित बहुजन आघाडी)
४. अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील (अपक्ष)
५. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (अपक्ष)
६. आशिष (आण्णा) अशोक देशमुख (अपक्ष)
७. कादरी शाहेद अब्दुल गफुर (अपक्ष)
८. नितीन रामराव कुलकर्णी (अपक्ष)
९. प्रदीप दादा सोळुंके (अपक्ष)
१०. मनोज शिवाजीराव पाटील (अपक्ष)
११. विशाल (विक्की) उद्धव नांदरकर (अपक्ष)
१२. सुर्यकांत संग्राम विश्वासराव (अपक्ष)
१३. संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष)
१४. ज्ञानोबा चिमनाजी डुकरे (अपक्ष)

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर म्हणाले, “औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात एका उमेदवाराने माघार घेतली आहे. आता एकूण १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.”

हेही वाचा : नाशिक पदवीधर मतदारसंघात सहा उमेदवारांची माघार, १६ उमेदवार रिंगणात, वाचा संपूर्ण यादी…

“या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान आहे. तसेच मतमोजणी २ फेब्रुवारीला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची पूर्वतयारी झाली आहे. उर्वरित तयारी करण्याचं काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही झाली. बॅलेट बॉक्स आणि इतर निवडणूक साहित्याची सोय करण्यात आली आहे. एकूण २२७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होईल. उमेदवारांना मतदान केंद्रांची यादी देण्यात आली आहे,” असंही आयुक्तांनी नमूद केलं.