सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं गर्दी जमविण्याचं तंत्रच वेगळं. ग्रामीण ठासून भरलेला बेरकीपणाचा अनुभव आणि राजकारण शिकविण्याची त्यांची मांडणीही निराळीच. औरंगाबाद जिल्ह्यातील निवडून आलेल्या सरपंचाना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितलेले राजकारण सध्या मराठवाडय़ात चर्चेत आहे. ते मला असं म्हणत नाहीत. म्ह्या असा शब्द प्रयोग वापरतात. बसेल आहेत अशा दोन शब्दांसाठी ‘बशेल’ असा शब्द प्रयोग वापरतात. मराठवाडय़ाच्या बोलीतील त्यांचे दोन किस्से ग्रामपंचायत निवडणुकीनंतर चर्चेत आहेत. नुकतेच सरपंच झाल्यावर राजकारण कसं असतं हे त्यांनी समजावून सांगितले आणि टाळय़ा आणि हशांनी सभागृह भरून गेलं.

Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Nitin Gadkari Urges Chandrapur Voters to Elect Development-Focused Candidate Sudhir Mungantiwar
‘‘जाती-धर्मापेक्षा विकासाला प्राधान्य द्या,” नितीन गडकरी यांचे मतदारांना आवाहन

  त्यांनी सांगितलेला किस्सा राजकारणाचे अंतरंग उलगडून दाखविणारा.  १९८५़ -८६ मध्ये दुष्काळही होता आणि याच काळात जालना जिल्ह्यातील काही गावात गारपीट झाली. तेव्हा काही सरकारचं अनुदान मिळत नव्हतं. १९८४ मध्ये पराभव झाला होता. सायकलवर २० गावांचा दौरा केला. लोकांना गोळा केलं. मग सरकारने गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई दिली पाहिजे म्हणून आंदोलन केलं. तेव्हा पार्टी आंदोलन करायला सांगत नव्हती. पण स्वत:च समस्या शोधायची, आंदोलनही ठरवायचं. त्याचे पॅम्पलेट काढायचे ठरविले. प्रेसवाला म्हणाला. ४० रुपयाला हजार. तेवढे पैसे नव्हते. मग अर्ध्या आकाराचं पत्रक छापलं. गावोगावी वाटलं. काही दिवसांनी हे सरकापर्यंत पोहचलं आणि अचानक सरकारने गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कसा झाला माहीत नाही. पण त्या आंदोलनाने गावात भाव वाढला. लोक चहा पाजू लागले. पण २० पैकी १५ गावातच पैसे पोहचले. पाच गावातील लोक आले. ते म्हणाले, बघा आमची अडचण सोडवा’  तेव्हा रोज तहसीलदाराकडे जात असे. अधिकारी नीट बोलत नव्हते. पण रोज त्यांच्याकडे जायचो. निवेदने द्यायचो. त्यांच्याबरोबर वाद झाले. पण एकेदिवशी तहसीलदार म्हणाले, आलं तुमच्या पाच गावचं अनुदान’. मग बाहेर मंडप टाकला. तेव्हा फलक लिहिला ‘ पाच गावातील लोकांना मदत न मिळाल्याने रावसाहेब दानवे यांचे आमरण उपोषण’ पाच गावातील लोकांचा पाठिंबा मिळाला. पाच गावातील शेतकरी आले. मग लोकांसमोर भाषण केलं. तहसीलदारांना भेटून विनंती करू का, असं विचारल्यावर सकाळच्या टप्प्यात लोकांनी विरोध केला. पण दुपारी भेटतो म्हटल्यावर तहसीलदारांना भेटण्याची परवानगी मिळाली. ‘ पाच गावातील मदत केव्हा मिळेल, असं जोरात विचारलं ,  माझं आणि तहसीलदारांचं आधीच ठरलं होतं. ते म्हणाले, ‘ दहा दिवस लागतील.’ त्यावर पाच दिवसात झालं पाहिजे असं म्हणालो. त्यांनीही ते कबुल केलं. मग काय, पुढील काही दिवसात पाच गावातील लोकांना मदतीचे पैसे मिळाले. नेत्याची प्रतिमा ही अशी वाढत असते. अलीकडेच तेव्हाचे तहसीदार बळीराम जाधव यांचा रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात सत्कार घडवून आणला.

 त्यांनी सांगितलेला दुसरा किस्साही असाच भन्नाट! सत्ताधारी बाजूच्या ‘डिमांड’ (पीक कर्जाच्या मागणी अर्जाला डिमांड म्हटले जाते.) पूर्ण झाल्या होत्या. पण ज्या गणातून निवडून आलो होतो, तेथील डिमांड कोण घेऊन जाणार? एके दिवशी ती सगळी कागदे बखोटीला मारली आणि जिल्हा बँकेत दाखल करायला गेल्यानंतर कारकुनाने हाकलून दिले. ‘एवढय़ा उशिरा कोण डिमांड आणून देतो’ असे तो म्हणाला. पण आता काय करायचं, असा प्रश्न पडला. सायकल काढली आणि बाजार समितीच्या सभापतीच्या दालनात जाऊन बसलो. तेव्हा काळय़ा रंगाचे मोठे डब्बे फोन होते. तिथून फोन लावला. त्या जिल्ह्या बँकेच्या कारकुनाला म्हणालो, ‘मी पंचायत समितीचा सदस्य बोलतो आहे, रावसाहेब. पलीकडून कारकुनाचा आवाजही नरम आला. मग मी म्हणालो, आमच्या गावातील डिमांड घेऊन आलेल्या पोराला तुम्ही परत का पाठवले?’ तेव्हा कारकून म्हणाला, ‘मी त्या सगळय़ा डिमांड मंजूर करून घेतो. त्याला परत माझ्याकडे पाठवा.’ पुन्हा मी कागदे घेऊन जिल्हा बँकेत गेलो आणि पीक कर्ज मागणी पूर्ण झाली. तुम्ही गावाच्या बाहेर काय करता? कुणाच्या हाता-पाया पडता, याच्याशी काही देणे-घेणे नसते. काम करून आणले तर लोक तुम्हाला मोठे मानायला लागतात. तेव्हा मोठे व्हायचे असेल तर काम करावे लागेल.