छत्रपती संभाजीनगर: शहरातील बाजाजनगर भागातातील साई श्रद्धा पार्क परिसरात एका महिलेने दुसरीची चाकुने सपासप वार करुन खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बाजाजनगरच्या साई श्रद्धा पार्कमध्ये आरोपी महिला अचानक पीडितेच्या घरात घुसली. काही समजायच्या आत तिने सोबत आणलेल्या चाकूने पीडितेवर सपासप वार करायला सुरुवात केली. हा हल्ला इतका भयानक होता की पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना एका पिस्तुलही सापडले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. दोघांमध्ये झालेल्या झटापटीत आरोपी महिला पण थोडी जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहे.भरदिवसा घरात घुसून महिलेने महिलेचा खून का केला, याचं कारण अजून समोर आलेलं नाही. भरवस्तीत अशा प्रकारे हत्या झाल्याने बाजाजनगर परिसरात भीतीचं सावट आहे. पोलिसांनी सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस खुनाच्या कारणाचा शोध घेत आहेत.