छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात काही महत्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालीच नवीन पथक काम करणार आहे.

यापूर्वीच्या एसआयटीमधील काही अधिकाऱ्यांच्या नावावर आक्षेप घेतला होता. एका पोलिसासोबत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे परस्परांच्या खांद्यावर हात असणारे छायाचित्र माध्यमांमध्ये पसरले होते. त्यावरून एसआयटीतील काही अधिकारी, सदस्य बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हीच मागणी केली होती.

lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

हेही वाचा – शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा

हेही वाचा – Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत

नवीन विशेष तपास पथक (एसआयटी)

किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, सीआयडी, छत्रपती संभाजीनगर), अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक अन्वेषण विभाग, बीड), सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक, बीड), अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, सीआयडी, पुणे), शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, सीआयडी, पुणे), दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, सीआयडी, पुणे)

Story img Loader