मागील काही दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटातील नेते संदिपान भुमरे यांनी ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी जाती-जातींमध्ये भांडणं लावून दिले. भांडणं लावून देण्याशिवाय त्यांनी काहीही केले नाही. याच्याच जोरावर ते खासदार झाले आहेत. चंद्रकांत खैरे यांना कोणीही किंमत देत नाही, असे संदिपान भुमरे म्हणाले आहेत. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

हेही वाचा >> UAE च्या राजघराण्यातील कर्मचारी असल्याचं भासवलं, भामट्यानं दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलला लावला २३ लाखांचा चुना!

Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

“२०२४ साली औरंगाबाद मतदारसंघातून कोण निवडून येणार ते वेळच ठरवेल. या निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. या निवडणुकीला सध्या वेळ आहे. भविष्यात कोण लढणार, कोण कोणाशी युती करणार यावर सगळं अवलंबून आहे. औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा खासदार होणार. हे मी ठामपणे सांगू शकतो,” असा विश्वास संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >> Video : राहुल गांधींच्या सुरक्षेत पुन्हा हलगर्जीपणा? पंजाबमध्ये तरुण थेट जवळ आला अन्…

“चंद्रकांत खैरे यांची अवस्था आजही बिकट आहे. माध्यमं चंद्रकांत खैरे यांच्याकडे जातात. माध्यमं वगळता चंद्रकांत खैरे यांना कोणीही ओळखत नाही. चंद्रकांत खैरे यांना मतदार विचारत नाहीत. त्यांच्यावर मतदारांचा विश्वास नाही. खैरे यांनी या जिल्ह्याची, शहराची वाट लावली आहे. याच कारणामुळे औरंगाबाद शहराचे हे हाल आहेत,” अशी टीका संदिपान भुमरे यांनी केली.

हेही वाचा >>“शिंदे गटाचे वकील उद्या स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून घोषित करतील”, अनिल देसाईंची खोचक टीका

“खैरे यांनी शहराकडे, जिल्ह्याकडे लक्ष दिले असते तर पाणी मिळाले असते. येथे रस्ते झाले असते. शहर स्वच्छ झाले असते. येथे पर्यटकांची संख्यादेखील कमी झाली आहे. खैरे यांना नैतिक अधिकार नाही. खैरे यांनी एकही काम केलेले नाही. त्यांनी फक्त जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम केले. खैरे हा काय पुढारी आहे का. खैरे हा जाती-जातीत भांडण लावून पुढारी झालेला आहे,” असा दावा संदिपान भुमरे यांनी केला.