छत्रपती संभाजीनगर – पंजाबमधील फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांडाशी संबंधित सहा आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. पहाटे ३ वाजता पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना पंजाब पोलीस विभागाचे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कृती दल (एजीटीएफ – ॲण्टी गॅंगस्टर टास्क फोर्स) अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांचा फोन आला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मदत मागितली.

फिरोजपूर येथे लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेल्या एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणातील सहा आरोपी नांदेडहून निघून समृद्धी महामार्गाने पुढे जात असल्याचे बान यांनी पोलीस आयुक्त पवार यांना सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली १० अधिकारी आणि ४० कर्मचाऱ्यांचा ताफा तयार करून शस्त्रास्त्रासह जात असलेल्या सहाही आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले. पंजाब पोलीस दलातील फिरोजपूर येथील उपअधीक्षक राजन परमिंदरसिंग हे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असल्याचीही माहिती पोलिसांकडून मिळाली.

baba siddique shot dead news marathi
Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या, हरियाणा-यूपी कनेक्शनचा संशय; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात!
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Balasaheb Thorat phone call, Sudhir Mungantiwar,
थोरात यांचा थेट वनमंत्र्यांना फोन… वनमंत्र्यांनी दिले बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश! नेमके काय घडले?
Three suspects arrested in Bopdev Ghat gang rape case
बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
slaughterhouse, Bhayander, Narendra Mehta,
भाईंदर : …तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार, कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा

हेही वाचा – अहमदनगर : भंडारदरा पाणलोटातील घाटघरला आजपर्यंत पडला ५ हजार ३८ मिमी पाऊस

अक्षयकुमार उर्फ बच्छा बलवीरसिंग, गुरुप्रित दर्शनसिंग गोपी, दिलेरसिंग मनिंदर चिवनसिंग, प्रिन्स काका संधू, सुखचैनसिंग गब्बरसिंग जास, रवींद्रसिंग करणेलसिंग सुख, अशी सहा आरोपींची नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.

हेही वाचा – Puja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सरकारी सेवेतून बरखास्त; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

प्रकरण नेमके काय ?

फिरोजपूर शहरात ३ सप्टेंबर रोजी ९ आरोपींनी भरदिवसा भरवस्तीतील गुरुद्वारासमोरील एका वाहनात बसलेल्या फिर्यादींच्या वाहनावर अंधाधुंद गोळीबार केला. यात दिलदीप सिंग, आकाश दिपसिंग व जसप्रित कौर यांचा मृत्यू झाला. यातील जसप्रित कौर हिचा विवाह अवघ्या दहा दिवसांवर आलेला होता.