सुदृढ पिल्लांसाठी वाघांचे अंतर्गत प्रजनन थांबवा

औरंगाबादमधील वाघांची पिल्ले सदृढ व्हावीत आणि वंशपरंपरेने येणारे दोष कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील १२ वाघांचे अंतर्गत प्रजनन थांबविण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले आहेत.

राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे औरंगाबाद पालिकेला आदेश

औरंगाबाद : औरंगाबादमधील वाघांची पिल्ले सदृढ व्हावीत आणि वंशपरंपरेने येणारे दोष कमी करण्यासाठी औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील १२ वाघांचे अंतर्गत प्रजनन थांबविण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे आता प्रजनन काळ व वय लक्षात घेऊन वाघांच्या प्रजननासाठी नव्या वाघांचा शोध महापालिकेला घ्यावा लागणार आहे. औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानात सध्या १२ वाघ आहेत. त्यातील नऊ मादी व तीन नर वाघ आहेत.

शहरातील सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३७ वाघ येथे जन्मले. त्यातील १२ वाघ सध्या महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात आहेत. त्यांच्यासाठी तीन दालनेही आहेत; पण त्यांचा वावर मात्र कमी जागेत आहे. साधारणत: एका वाघासाठी एक हजार स्के. मीटर जागा अपेक्षित आहे. यामध्ये तीन पांढरे वाघ आहेत. हे सर्व वाघ औरंगाबादमध्ये जन्मले आणि वाढले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील मीलन हे भविष्यातील वाघांच्या सदृढतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असू शकतील. नव्याने होणाऱ्या सफारी पार्कमुळे वाघांच्या जागेचा प्रश्न मिटेल, पण आता नव्या प्रजननासाठी महापालिकेला इतर ठिकाणच्या वाघांचा शोध घ्यावा लागणार आहे. सध्या तरी अंतर्गत प्रजनन होणार नाही, अशी वास्तव्य रचना करण्याचे निर्देश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले आहेत. या विभागाचे काम पाहणारे महापालिकेचे उपायुक्त जोशी म्हणाले, सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयास मंजुरी देताना अंतर्गत प्रजनन बंद करण्याची अटही प्राधिकरणाने घातली आहे.

औरंगाबादमधील वाघांचे आता अंतर्गत जवळचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे वाघांची भविष्यातील पिल्ले जर सदृढ करायची असेल तर नवे वाघ शोधावे लागतील, तसे प्रयत्न करत आहोत; पण तूर्तास अंतर्गत प्रजनन होणार नाही, ही अट असल्याने त्याचे पालन करण्यासाठी आवश्यक ती पावले उचण्यात आली आहेत. जागा कमी असली तरी प्रजनन थांबविण्याचे हे मुख्य कारण नाही. 

– सौरभ जोशी, महापालिका उपायुक्त

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stop internal breeding tigers healthy cubs ysh

Next Story
दुसरे विश्व अहिराणी संमेलन २२ ते २४ जानेवारीला
फोटो गॅलरी