Supriya Sule Detained In Sambhajinagar : कर्जमाफीसह राज्यातील प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलना दरम्यान खासदार सुप्रिया सुळे , राजेश टोपे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संभाजीनगर-जालना महामार्गावरील केंब्रिज चौकात सुरू असणाऱ्या आंदोलनानंतर आाता टीईटी पेपरफुटीच्या विरोधातही आंदोलन केले जाईल असे रोहीत पवार यांनी जाहीर केले. सोमवारी आंदोलना दरम्यान पोलिसांनी कमालीचा बंदोबस्त ठेवला आहे.
मराठवाड्यातील विविध शहरातील शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता या आंदोलनास उपस्थित राहणार आहे. याशिवाय कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेही आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातून शेती प्रश्नाचा आवाज बुलंद करण्यात विरोधकांची एकजूट होताना दिसून येत आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे याही सहभागी होणार आहेत.
‘ सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी हे आंदोलन असून, विधिमंडळाच्या अधिवेशनापेक्षा रस्त्यावरील संघर्ष महत्त्वाचा आहे, ’ आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही जाहीर केले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत आहेत. आंदोलनस्थळी प्रचंड मोठा बंदोबस्त असून एसटी महामंडळाच्या तसेच शहर वाहतुकीच्या बसच्या रांगा लागल्या आहेत.
किल्ल्याच्या तटबंदीसारख्या दोन मोठ्या कमानी येथे उभारण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या पथकांसह सुमारे डझनभर मोठ्या व दीड डझन लहान गाड्यांमधील बंदोबस्त असून राखीव दलासह वेगवेगळे पथके येथे दाखल झाले आहेत.
आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या उस्ताह वाढविण्यासाठी एक हलगी पथकही करमाळा येथून मागवण्यात आले आहे. भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवेंसह मराठवाड्यातील शरदचंद्र पक्षाचे माजी आमदार व त्यांचे समर्थक नेते येथे दाखल होत आहेत. आंदोलनस्थळी सुमारे ५०० पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असून, पाण्याच्या बाटल्यांची अनेक वाहनेही येथे दाखल झालेली आहेत. शेतकरी एक जुटीचा विजय असो अशा घोषणांनी आणि हलगीच्या आवाजाने परिसर दणाणून गेला आहे. महिला हातात फलक घेऊन कर्जमाफीच्या नव्या अटी रद्द करण्याची मागणी करत आहेत. मराठवाड्यातील शेती प्रश्नावरुन उभारण्यात आलेला हा मोठा लढा असेल, असा दावा राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.
८० लाख लाडक्या बहिाणी केवासीच्या कारणावरुन बाद
हा मोर्चा धडक विधानसभेतही धडकेल. एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात आणलेल्या लाडकी बहीण योजनेतील ८० लाख लाडक्या बहिणींना मदतीपासून केवळ केवायसीच्या कारणावरून बाद ठरवून त्यांचा तोंडचा घास हिरावल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला
केंब्रिज चौकामध्ये आंदोलन मोठ्या संख्येने जमा होत असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मध्ये दाखल झालेले आहेत पाठोपाठ आता रोहित पवार व अन्य नेतेही ट्रॅक्टर अन्य वाहनातून दाखल होत असून दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पाच हजार आसपास शेतकरी नेते कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन स्थळी उपस्थित आहेत. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सरकारकडूनही प्रतिनिधी पाठवून काही वेळात चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे.
