औरंगाबाद: आधी देवाला नमस्कार केला मग दानपेटी केली रिकामी; चोरट्यांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद | theft in temple 2 thieves blessed god then theft viral cctv video crime in aurangabad rmm 97 | Loksatta

औरंगाबाद: आधी देवाला नमस्कार केला मग दानपेटी केली रिकामी; चोरट्यांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद

औरंगाबाद जिल्ह्यात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे.

theft in temple
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी महादेवाच्या मंदिरात चोरी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी मंदिरात देवाची पूजा केली आणि त्यानंतर दानपेटीतून पैसे लंपास केले आहेत. या विचित्र चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

ही घटना औरंगाबादच्या पाचपीरवाडी गावातील असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर शिवलिंगावर पुष्प अर्पण केली. देवाला वंदन केल्यानंतर त्यांनी दानपेटी उघडली आणि त्यातील पैसे लंपास केले. चोरी करून बाहेर पडतानाही चोरट्यांनी देवाला नमस्कार केला. या विचित्र चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

या अजब चोरीची घटना पाहून पोलीस कर्मचारीही हैराण झाले आहेत. संबंधित व्हिडीओत चोरटे देवाची पूजा करून दानपेटीवर डल्ला मारताना दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:30 IST
Next Story
“गच्चीवरून शिट्टी वाजवणे लैंगिक अत्याचार ठरत नाही”, औरंगाबाद उच्च न्यायालयानं नोंदवलं मत; काय आहे प्रकरण?