छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती यार्ड येथे सुरू असलेल्या अभियांत्रिकी कामांमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकारात व थांब्यांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. तिरुपती येथील पुलाचे काम सुरू करण्यात आले. हे काम रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता व सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचा दावा दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले.

या कामासाठी २७ एप्रिल २०२६ ते ०२ मे २०२६ या कालावधीत प्रत्येकी दोन तासांचे एकूण सहा वेळा वाहतूक बंद ठेवण्यास मंजुरी घेण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत काही गाड्यांचे मार्ग बदल करण्यात येणार आहे.काही स्थानकांवरील थांबे तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. कोणत्या रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलेले रामेश्वरम – ओखा ही १६७३३ क्रमांकाची गाडी १ मे रोजी २०२६ कटपडी – मेलपक्कम – रेणीगुंटा मार्गे वळविण्यात येईल. त्यामुळे या दिवशी तिरुपती येथे या गाडीचा थांबा राहणार नाही.

तिरुपती – अकोला ही गाडी क्र. ०७६०५ ही गाडी १ मे २०२६ रोजी तिरुपती – रेणीगुंटा –गुत्ती मार्गे वळविण्यात येईल. या कालावधीत पाकाला, पिलेर, मदनपल्ले रोड, मालकालचेरुवू , कादिरी, धर्मावरम, अनंतपुर या स्थानकांवरील थांबे राहणार नाहीत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.