लूट करून दरोडेखोरांचा दोन महिलांवर अत्याचार

दोन महिलांवरही सामूहिक अत्याचार केला. दरोडेखोरांनी पुरुष मजुरांना बांधून ठेवले होते.  

Rape of a young woman by showing lust for marriage
(प्रातिनिधिक छायाचित्र)

औरंगाबाद : मोलमजुरीसाठी आलेल्या  वस्तीवर सशस्त्र हल्ला करून लूटमार करताना सात दरोडेखोरांकडून दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दरोडा, लूटमार व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास सात जणांच्या टोळीने आलेल्या दरोडेखोरांनी मजुरांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवून मारहाण, लुटालूट केली.  दोन महिलांवरही सामूहिक अत्याचार केला. दरोडेखोरांनी पुरुष मजुरांना बांधून ठेवले होते.   दरोडेखोरांनी मजुरांकडील ४० हजार रुपयांचा ऐवजही लुटून नेला. सकाळी पोलीस अधीक्षक निमित्त गोयल हे इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर गोयल हे तोंडाळी शिवारात तळ ठोकून होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two women were robbed and tortured by robbers akp

Next Story
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेचे सर्व मंत्री मराठवाडय़ात
ताज्या बातम्या