मागील काही दिवसांपासून जगभरात प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरुन भाजपावर टीका केली जात आहे. भाजपाच्या प्रवक्त्याने प्रेषित मोहम्मद यांच्यावर अवमानकार भाष्य केल्यामुळे भारत देशाला जगभरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाचा प्रवक्त म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भजपा म्हणजे देश नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रवक्त्यांच्या मेंदूत अक्कल घालावी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. ते औरंगाबादेत एका सभेत बोलत होते.

हेही वाचा >>> ‘जलआक्रोश मोर्चा पाण्यासाठी नव्हे तर सत्ता गेली म्हणून होता,’ औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Major fire at Marathwada University premises
विद्यापीठ परिसरात आग; अग्निशमन विभागाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल
engineer man killed his father in chhatrapati sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर : अभियंता मुलाकडून वडिलांचा निर्घृण खून
asaduddin owaisi
अकोल्यात वंचितला एमआयएमचा पाठिंबा, पुण्यातही उमेदवार देणार; असोद्दीन ओेवैसी यांची घोषणा
omprakash raje nimbalkar marathi news
धाराशिव : ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

“भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रवक्त्यांच्या मेंदूत अक्कल घालावी. भाजपाच्या प्रवक्त्याने प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध काय तुमचा. आपल्या देवीदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही आपण म्हणतो. तसेच त्यांच्या देवतांचा अपमान करण्याची तुम्हाला गरज नाही. हा अपमान केल्यानंतर अरब देश एकत्र झाले. त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावर आणलं. त्यांनी देशाला माफी मागायला लावली. तिकडे आपल्या देशाच्या पंतप्रधांनाचा फोटो कचराकुंडीवर लावला गेला,” असे म्हणत आपण फक्त बघत बसायचं का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हेही वाचा >>> औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर कधी होणार? जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

तसेच, “भारताने माफी मागायची. देशाने काय केलं आहे. गुन्हा भाजपाने केले आहे. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला आहे. भाजपाचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपा म्हणजे देश नाही,” असेदेखी उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> ..तर किरीट सोमय्यांचं थोबाड लाल करू; चंद्रकातं खैरेंचा धमकीवजा इशारा

तसेच, “भाजपाच्या प्रवक्त्यांमुळे आपल्या देशावर नामुष्की ओढावली हे तुम्हाला मान्य आहे का? एका व्यक्तीमुळे देशाच्या पंतप्रधांनाचा फोटो कचराकुंडीवर लावण्यात आला हे तुम्हाला पटतं आहे का? अशा पद्धतीने भाजपा पुढे जाणार असेल आणि तुमच्या मागे आम्ही फरफटत यावं अशी तुमची इच्छा असेल तर हे कदापी होणार नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावून सांगितले.

हेही वाचा >>> अमरावती : पीकविम्याची रक्कम न मिळाल्याने शिवसैनिक आक्रमक; विमा प्रतिनिधीला केली मारहाण

दरम्यान, उद्ध ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही भाष्य केले. बघता बघता सरकारला अडीच वर्षे झाली. तुमच्या विश्वासामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे हे सरकार सुरु आहे. कधीकाळी ज्यांच्या विरोधात होतो तेच आता मित्र झाले आहेत आणि जे सोबत होते ते आता हाडाचे वैरी झाले आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.