छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमदार आणि खासदारांच्या संख्येवर मोजता येत नाही. पूर्वी ४० आमदार फोडले. आता सहा खासदार फोडले. पण ठाकरे संपत नाहीत, हेच खरे आहे. पूर्वी खासदार फोडले पण पुन्हा नऊ निवडून आले. त्यातील सहा खासदार पुन्हा फाेडले. कारण हे सारे भाजपमधील अतंर्गत धुसफुशीतून सुरू आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये येऊ शकणारे सारे बाजूला केले जातील. शिवराज चव्हाण , नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना दूर ठेवण्यासाठी भाजपच्या अतंर्गत धुसफुशीतून हे घडते आहे, असा आरोप करत शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नामकरण ‘ बाबर जनता पार्टी ’ असे केले. लोकप्रिय शिवराज चव्हाण यांचे नाव आता चर्चेतही नाही. नितीन गडकरी यांना रा. स्व. संघाचा पाठिंबा असल्याचे त्यांचे पंख कापले जात आहेत. देवेंद्र फडणवीस पुढे येऊ शकतात असे लक्षात आल्यानंतर फोडलेले खासदार शिवसेनेच्या शिंदे गटात पाठविण्यात आले आहेत. २०२९ मधील सत्तास्पर्धेची ही तयारी आहे. भाजपमधील धुसफुशीतून हे घडवले जात आहे, असे ठाकरे म्हणाले.
फुटलेले खासदार निधीचे कारण सांगत असले तरी ते विकासाच्या कारण सांगून स्वार्थासाठी गेले आहेत. राम मंदिराच्या निधीत सुरू असणारा भ्रष्टाचारावर आता कोणी बोलत नाही. मात्र, प्रश्न विचारणाऱ्यांसमोर माेठ्या अवाजात ‘ जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या जात आहेत, असा अरोपही ठाकरे यांनी केला. धारशिवमधील खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या गैरव्यवहाराच्या अनेक भानगडी आपल्या कानावर येत आहे. पूर्वी या माहीत नव्हत्या. आता त्या समोर आल्या आहेत. त्यामुळे चुकीचा माणूस उमेदवार म्हणून दिला त्याबद्दल ठाकरे यांनी माफी मागितली.
परभणी, धाराशिवमध्ये ठाकरे यांनी दौरा करुन बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात दुसऱ्या दिवशी ठाकरे यांनी दौरा केला. धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. रात्री दीड वाजता कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना पाठवले. ‘ त्यांना खासदार पाहिजेत, मला ओम राजे पाहिजे ’ असेही म्हणालो. तरीही तो गेला. कारण सहा खासदारांचा गट होईपर्यंत तो भाव वाढवून गेला, असेही ठाकरे म्हणाले. या वेळी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांचे भाषण झाले.
‘पन्नास खोके’मध्ये शंभर कोटीचा बदल
नधी आणणे सोपे राहिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निधी मिळू देत नाही. मग ‘ गद्दारी’ करणाऱ्या ओम राजेनिंबाळकरांना निधी कसा मिळेल ? आजही शिंदे यांचे आमदार मंत्रालयात निधीसाठी फिरत असतात. त्यामुळे यांची गद्दारी ही निधीसाठी नाही तर ‘ शंभर खोक्या’ साठी आहे, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. धाराशिव येथे उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी ते बोलत होते. पूर्वी आमदार पन्नास खोक्यांसाठी गेले होते. मग खासदारांनी किती रुपये घेतले असतील ? शिवसैनिकांनी हा आकडा शंभर कोटी असा सांगितला आणि ‘ शंभर खोके एकदम ओके ’ अशी घोषणा सभेच्या ठिकाणी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू राजेनिंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत यांची यावेळी उपस्थिती होती. निष्ठा ही कृतीतून दाखवयाची असते. २०२२ मध्येही दाखवली होती. पुढेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेन असे धारशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
मल्टीस्टेटमधील गैरव्यवहारामुळे पक्षांतर
पक्ष बदलणारा खासदार हा खानदानी सोंगाड्या आहे. २००६ मध्ये ग्राम पंचायतीचा सदस्य नव्हतो. एक वेळ आमदार आणि दोन वेळा खासदार केले. तेव्हा. हा खासदार शंभर कोटीला विकला गेला. उमरग्याच्या शिवसैनिकानी ‘किडन्या’ विकून पैसे देतो असे म्हटले पण तरीही तो गेला. शिवसैनिकांनी कष्ट केले. ७ मे २०२४ समाधान पाटील भूम केंद्राच्या शिवसेनेच्या गुंडांनी केली. त्यांना विचारलंस की, सत्तेच्या गोटात गेला. त्याला रस्त्यावरुन फिरू देऊ नका. विकासासाठी गेलो. धारशिवची दुबई केले की सिंगापूर केले. तो गेला कारण त्याच्या बँकांमध्ये, पतसंस्थामध्ये गैरव्यवहार. पवन राजे यांच्या खुनामुळे दुसरेच. पवन राजे निंबाळकर मल्टीस्टेटमध्ये गरीबाच्या नावे खाते काढून गैरव्यवहार केला. त्याची चौकशी लागली म्हणून हा सोंगाड्या पक्ष सोडून गेला. शिवसैनिक बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
