छत्रपती संभाजीनगर – परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र शाखेच्या सेवानिवृत्त प्रा. डॉ. विमलादेवी सुग्रीव काळे (वय ८२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. विमलादेवी काळे यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतीशास्त्रात एम. एस्सी. करून पीएच.डी. मिळवली होती.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, आर्य समाज प्रतिनिधी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष ब्रह्ममुनी तथा डॉ. सग्रीव काळे यांच्या त्या पत्नी, परळीतील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मधुसुदन काळे, उद्योजक विक्रम काळे व छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अपर आयुक्त डॉ. प्रताप काळे यांच्या त्या मातोश्री होत.
