मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा सुरू आहे. या सभेच्या व्यासपीठावर संभाजी म

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाराजांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याबाबत घोषणा करू शकतात, असा तर्क- वितर्क लावला जात होता. याच मुद्द्यावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी नामकरणाबाबत सूचक विधान केलं आहे. औरंगाबादचं नामकरण होणार हे नामकरण मीच करणार असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटलं की, औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर व्हावं, हे स्वप्न माझे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. हे मी विसरलेलो नाही आणि औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केल्याशिवाय मी राहणार नाही. याची सुरुवात करण्यात आली आहे. चिखलठाण येथे होणाऱ्या विमानतळाचं नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्याबाबतचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. कॅबिनेटने देखील या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण केंद्राकडून अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे औरंगाबादचं नामकरण करण्यावरून राज्यात आवाज उठवणाऱ्या नेत्यांनी केंद्रात जाऊन विमानतळाच्या नामकरणाबाबत मंजुरी मिळवून दाखवावी. तुमच्याकडे काही दिलं तर झाकून ठेवायचं आणि आम्ही काही केलं नाही तर बोंबलत सुटायचं, असं भाजपा नेते करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव भाजपाच्या नेत्यांनी केंद्रातून मंजूर करून आणला तर मी स्वत: त्यांचा सत्कार करेन, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर कधी होणार याबाबत सूचक विधान केलं आहे. शहराचं नामकरण मी आताही करू शकतो. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल, त्यामुळे आधी शहराचा कायापालट केला जाईल, त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल, असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aurangabad will be renamed as sambhajinagar big statement by cm uddhav thackeray in aurangabad live speech rmm
First published on: 08-06-2022 at 20:53 IST