औरंगाबाद : कर्नाटकातील टोयोटा किर्लोस्कर मोटार्स प्रा. कंपनीकडून संस्थेला अनुदान मिळाल्याचे बनावट धनादेशाव्दारे भासवून तब्बल ३६ कोटी ५१ लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट धनादेशावर जपानमधील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्याही करण्यात आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी महालक्ष्मी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि वाचनालय प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी महिलेविरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी खुलताबाद तालुक्यातील साळीवाडा येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी उमेश भारती (वय ५१) या महिलेस अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणात कर्नाटक येथील टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा.लि. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अजित बाळासाहेब जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ४ सप्टेंबर २०२० रोजी आयसीआयसीआय बँकेने ई-मेलवरून टोयोटा किर्लोस्कर कंपनीला कळवले की, एमआयडीसी वाळुज येथील शाखेत २५ ऑगस्ट २०२० रोजी महालक्ष्मी शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा आणि वाचनालय प्रसारक मंडळ या नावाच्या संस्थेने ३६ कोटी ५१ लाख रुपयांचा धनादेश टोयोटा कपंनीच्या बँक खात्यातून वटविण्याकरिता दिला होता. मात्र धनादेशासंबंधी बँकेला शंका आल्याने त्यांनी ही माहिती टोयोटा कपंनीला कळवली. त्या धनादेशाची कलर प्रत बंगळुरू येथील कार्यालयात पाठवली. त्यावर कंपनीने असा कोणताही धनादेश कोणालाही दिला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर संबंधित धनादेश बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तो रद्द करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात संस्थेला अनुदान मिळाल्याचे भासवणारा बनावट धनादेश देणाऱ्या लक्ष्मी भारती हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Byju India CEO Quits
बैजूजचे मुख्याधिकारी अर्जुन मोहन यांचा राजीनामा; संस्थापक रवींद्रन यांच्या हाती आता दैनंदिन कारभार
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा