लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : वाल्मीक कराड व धनंजय मुंडेंविरोधातील बातम्या, चित्रफिती का पाहतो, असे विचारत एका तरुणाला दोघांनी कोयता व लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण अशोक शंकर मोहिते याला सुरुवातीला अंबाजोगाई व त्यानंतर लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

बीडच्या धारूरमध्ये बुधवारी दुपारी मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी जखमी अशोक मोहितेचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिध्देश्वर सानप, या दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार बांगर आणि सानपने अशोक मोहितेला मारहाण केली. तसेच तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Story img Loader