बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारविहारही बदलत चालला आहे. त्याचा परिणाम शरीरावर कधी ना कधी होतो आणि त्याची यंत्रणा असहकार पुकारते. अशा वेळी काही पथ्यं केली की गाडी पुन्हा सुरळीत होते.

स्थौल्य, लठ्ठपणा, सूज, पोट मोठे असणे, बेढब अवयव, थुलथुलीतपणा

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

पथ्य :

गरम व ताजे उकळलेले पाणी. लिंबू, आले, कणभर मीठ व नाममात्र चहापूड असा ‘लो कॉस्ट’ चहा. ताजे ताक, नारळपाणी, मध.

ज्वारी, नाचणी, सातू, नाममात्र मूग असलेली आमटी, चवळी, कुळीथ किंवा मटकीचे कढण. भात, ज्वारी, राजगिरा लाह्य़ा.

तेल-तुपाशिवाय व उकडलेल्या, बिनमिठाच्या सर्व फळभाज्या व पालेभाज्या. दुध्याभोपळा वाफारून रोज पाव किलो दोन वेळा जेवणाच्या सुरुवातीला खाणे.

पोपई, ताडफळ, डोंगरी आवळा, कोहळा, गोड संत्रे, बोरे, कलिंगड, खरबूज, जांभूळ, करवंदे, जांब, नाइलाज असला तर घरगुती भाजलेला टोस्ट.

दीर्घ श्वसन, प्राणायाम, किमान सहा ते बारा सूर्यनमस्कार, कमान व्यायाम, पश्चिमोत्तानासन, दोरीच्या उडय़ा, पोहणे, रात्रौ जेवणानंतर फिरावयास जाणे, मलावरोध असल्यास कोमट पाण्याचे उष:पान, सायंकाळी लवकर व कमी जेवण.

मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे. योग्य पद्धतीने तेलाचे मसाज व गरम पाण्याचे वाफारे.

कुपथ्य :

गार पाणी, फ्रिजमधील पदार्थ, कोल्ड्रिंक, फाजील साखर व दूध असलेली पेये, लोणी, तूप, तेल, इ. फाजील पातळ पदार्थ व पाणी.

गहू, भात, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, वाल, मका, पोहे, चुरमुरे, भडंग, शेव, भजी, चिवडा, इ., फरसाण, मिठाई, डालडायुक्त पदार्थ, बेकरी पदार्थ, मांसाहार, जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण.

बटाटा, रताळे, शिंगाडा, शेंगदाणे, खोबरे, तीळ, बदाम व इतर सुकामेवा. फाजील मीठ, साखर, गूळ, इ.

दुपारी झोप, बैठे काम, व्यायामाचा अभाव, मलमूत्र व वायूंचे वेग अडवणे, मद्यपान.

रक्तदाबवृद्धी, अर्धागवात, स्थौल्य, मधुमेह, सूज, मूत्राल्पता, बहुमूत्रता, चक्कर, निद्रानाश, धाप, दम लागणे, फाफू होणे, मुंग्या, भोवळ.

पथ्य :

कोमट पाणी, ताजे ताक, गाईचे सायीशिवाय दूध, शेळीचे दूध; मध व तांदळाची पातळ पेज (मधुमेहींना वज्र्य) फिका चहा, बेलाच्या पानांचे उकळलेले पाणी. आळणी व तेलतूपविरहित भोजन.

ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू, मुगाची आमटी, कुळीथ कढण, सर्व फळभाज्या व पालेभाज्या उकडून, भात, ज्वारी व राजगिरा लाह्य़ा.

पोपई, ताडफळ, बोरे, करवंद, नारळ, कोहळा, डोंगरी आवळा, संत्रे, इतर फळे तारतम्याने.

माफक जेवण, जेवणाच्या अगोदर व शेवटी एक चमचा तूप खाणे, आठवडय़ातून दोन वेळा लंघन, सायंकाळी लवकर व कमी जेवण.

दीर्घ श्वसन, प्राणायाम, शवासन, तज्ज्ञांच्या सल्ल्याने हलकाफुलका व्यायाम. मलमूत्र वायू यांचे वेग वेळच्या वेळी करणे, तहानेच्या हिशेबात पाणी पिणे, वेळेवर झोप.

कुपथ्य :

गार पाणी, कोल्ड्रिंक व फ्रिजमधील पदार्थ, दही, सकस दूध, तेल, तूप, लोण्याचा अकारण वापर, स्ट्राँग चहा, कॉफी व इतर पेये, ज्यूस.

गहू, भात, उडीद, वाटाणा, वाल, हरभरा, मटार, ओट्स, सोयाबीन.

बटाटा, रताळे, शिंगाडा, खोबरे, शेंगदाणे, खसखस, तीळ, सुकामेवा.

हिरव्या सालीची केळी, आंबा, चिक्कू, मोसंब, अननस, कणस. बेकरी व फरसाण, डालडायुक्त मिठाई, आंबवलेले पदार्थ, मीठ व खारट, तेलकट, तुपकट पदार्थ, मांसाहार, कोंदट हवा, वातानुकूलित राहणी, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अतिश्रम, चिंता, ताणतणाव, अपुरी झोप, रागराग करणे, उशी, कृत्रिम धाग्याचे कपडे, अजिबात घाम न येणे, दीर्घकाळ ब्लडप्रेशर औषधे व इतर अ‍ॅस्पिरिन गटांतील औषधे तसेच लॅसिक्सचा अतिरेकी वापर, मलमूत्रवायू यांचे वेग अडविणे, मशेरी तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

रक्तदाबक्षय, काश्र्य, दुबळेपणा, अनिद्रा, चक्कर, भोवळ, मानेचा विकार, मुंग्या, मेंदूस रक्तपुरवठा कमी पडणे, पांडुता, कानाचे विकार, व्हर्टिगो, मुंग्या.

पथ्य :

सुरक्षित व गार पाणी, दही साखर, लोण्यासकट ताक, योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणी, साय, इ. लिंबू, कोकम, कैरी यांची आवश्यक तेवढी, साखर व मीठयुक्त सरबते. खजूर, गूळ व जिरेयुक्त सरबत, ताज्या फळांचे ताजे ज्यूस.

तारतम्याने सर्व धान्ये व कडधान्यांचा वापर. शेंगदाणे, खोबरे, खसखस तीळ व सुकामेवा यांचा सुयोग्य वापर. ओले खोबरे, शहाळे, केमिकलविरहित गूळ, ताडगूळ, खजूर, मनुका, खात्रीचा घरगुती स्वरूपाचा गुलकंद, मोरावळा, च्यवनप्राश, कोहळे पाक, किंवा वडय़ा, दुधांतील आलेपाक, घरगुती भाजलेला टोस्ट. तारतम्याने योग्य तेल तूप वाफारून फळभाज्या व पालेभाज्या. आंबा, सफरचंद, वेलची केळे, अंजीर, चिक्कू, गोड द्राक्षे, अननस, पोपई, पेरू, मोसंबी, डोंगरी आवळा, कोहळा.

मोकळी हवा, गरजेपुरता तारतम्याने माफक व्यायाम, अल्प प्रमाणात प्राणायाम व दीर्घ श्वसन, शवासन, वेळेवर जेवण व पुरेशी झोप, तळपायास, कानशिलास व कपाळास तूप चाळणे, नाकात तूप टाकणे. मलमूत्र वेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

फार गरम पाणी व गरम पेये, अकारण चहा, कॉफी, तीक्ष्ण, उष्ण पेये. खराब पाणी, तहान मारणे. कदन्न, निकस अन्न, शिळे अन्न, सातू, नाचणी, कुळीथ, मटकी.

मुळा, शेपू, करडई, अंबाडी, अळू, अकारण उकडलेल्या भाज्या, सुके व कोरडे अन्न, अकारण तेल तुपाचा अभाव. आंबट, खारट व खूप मसालेदार व तिखट आहार, मिरच्या, लसूण यांचा अतिरेकी वापर. भूक मारणे. अपुरी झोप, फाजील उपवास, कुपोषण, उशिरा जेवण, भूक टळून गेली असता जेवण, जेवताना बडबड, चिंता, रागराग, वादावादी, भांडण, मगजमारी, अकारण डायटिंगचे फॅड, सॅकरिन किंवा वजन कमी करण्याकरिता गोळ्या, सोडा बाय कार्बचा चुकीचा वापर, लॅसिक्स व इतर औषधांचा दीर्घकालीन वापर. अकारण हेळसांड, फाजील श्रम, अतिरेकी व्यायाम, उन्हातान्हात सहनशक्तीच्या बाहेर काम. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.

हृद्रोग, कपाळाला घाम येणे, गळून जाणे, छातीत डाव्या बाजूला दुखणे, श्वासोच्छ्वासाला अडथळा, फांफूं होणे, रक्तवाहिन्यांतील गुठळ्या, रक्तांतील चरबीचे प्रमाण वाढणे.

पथ्य :

उकळून गार केलेले ताजे पाणी, बिनसायीचे दूध, ताजे ताक, नारळपाणी, मध, तांदळाची पेज किंवा पातळ चहा, लिंबू पाणी, सुंठ पाणी.

ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू, मूग, कुळीथ यांची आमटी किंवा कढण. तारतम्याने तूर वा मसूर. भात, राजगिरा व ज्वारीच्या लाह्य़ा. एरंडेल तेल, चपाती, मेथीपूडयुक्त चपाती.

उकडलेल्या सर्व फळभाज्या व पालेभाज्या. डोंगरी आवळा, कोहळा, ताडफळ, पोपई, गोड द्राक्षे, संत्रे, बोरे, करवंदे, कलिंगड, खरबूज. वाफारून सफरचंद. मिरी, सुंठ, आले, लसूण, पुदिना, धने, जिरे, ओली हळद, मेथ्या, एरंडेल.

कोरडी व मोकळी हवा, संयमी जीवन, सायंकाळी लवकर व कमी भोजन, दीर्घ श्वसन, प्राणायाम व शवासन. तारतम्याने माफक हालचाल व व्यायाम. मलमूत्र व वायुवेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

गार पाणी, खराब व शंकास्पद पाणी, कोल्ड्रिंक, फ्रिजमधील पदार्थ, दही, कसदार दूध, लोणी, तूप, तेल, ज्यूस, स्ट्राँग चहा, कॉफी, इ.

गहू, मका, उडीद, वाल, वाटाणा, हरभरा, चवळी, पोहे, चुरमुरे, भणंग, फरसाण, मिठाई व बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ. जेवणावर जेवण, भूक नसताना जेवण, चमचमीत व मसालेदार डालडायुक्त पदार्थ. मांसाहार. बटाटा, रताळे, शिंगाडा, हिरव्या सालीची केळी, चिक्कू, पेरू, मोसंब, आंबा, फणस.

मीठ, खारट पदार्थ, लोणची पापड, इडली, डोसा, ढोकळा, व्हिनेगार, फ्रुटसॅलड, शिकरण.

कोंदट हवा, जिने चढ-उतार, चढावरचे चालणे, फाजील बोलणे व ताकदीबाहेर श्रम, बैठे काम, व्यायामाचा अभाव, कृत्रिम धाग्याची वस्त्रे, वातानुकूलित राहणी, चिंता, सतत ताणतणाव, अपुरी झोप, रागराग, दुपारी झोप, रात्रौ जागरण, राक्षसकाली जेवण, तंबाखू, मशेरी धूम्रपान, मद्यपान.

उर:शूल, छातीत दोन्ही बाजूंस किंवा उजव्या बाजूस व डाव्या बाजूस वायूमुळे दुखणे, फिरून फिरून कुठेही दुखणे.

पथ्य :

गरम पण ताजे उकळलेले पाणी. जिरेयुक्त ताक, लिंबू गरम पाणी, पातळ व फिका चहा, सुंठ पाणी, दही व मिरेपूड.

ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, कुळीथ, तूर व मसूर माफक प्रमाणांत, ज्वारी, भात व राजगिरा लाह्य़ा. मुगाची खिचडी.

सर्व फळभाज्या व पालेभाज्या उकडून खाणे.

डोंगरी आवळा, गोड संत्रे, इडलिंबू, लिंबू, पोपई, अननस, ताडफळ, बोरे, गोड द्राक्षे, गोड जांभूळ, कोकम व जिरे.

ओली हळद, पुदिना, आले, लसूण, जिरे, मिरी, मीठ, लिंबू, चिंच, कैरी, धने यांचा तारतम्याने वापर.

मोकळी हवा, वेळेवर व दोन घास कमी जेवण, सायंकाळी लवकर जेवण, रात्रौ जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरणे. वेळेवर झोप. मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

शिळे व शंकास्पद पाणी, कोल्ड्रिंक, फ्रिजमधील पदार्थ, सकस दूध, तूप, ज्यूस.

गहू, मका, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, मटकी, वाल, पोहे, चुरमुरे, भणंग, रव्याचे पदार्थ, जेवणावर जेवण, जडान्न, फरसाण, मिठाई, डालडायुक्त व बेकरीचे पदार्थ.

बटाटा, रताळे, कोबी, फाजील बिया असलेली वांगी, टमाटू, काकडी, मांसाहार, कोरडे कोरडे जेवण. कोंदट हवेत राहणी, बैठे काम, व्यायामाचा अभाव, दुपारी झोप, रात्रौ जागरण, दमा, रक्तदाब, हृद्रोग, झोपेकरिता दीर्घकाळ औषधे घेणे. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com