13 July 2020

News Flash

Ishita

इचलकरंजी स्वतंत्र तालुका निर्माण करण्याचा विचार

तालुका विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी कोकण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हातकणंगले तालुक्याचे विभाजन करून इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्याच्या मागणीचा विचार करण्यात येईल असे पत्र महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना दिले आहे.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी मुख्य सचिवांचीच समिती नेमावी

‘थेट जलवाहिनी योजने’ला खो घालणारे मुख्य सचिव व अन्य सर्व संबंधित अधिकाऱ्यांचीच पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी खास नियुक्ती करावी तसेच त्यांच्यावर पंचगंगेचे पाणी पिण्याचे बंधन घालावे,’ अशी मागणी लोक आंदोलन समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी केली आहे.

कोल्हापूर शहरात कचरामुक्त अभियान सुरू

कोल्हापूर शहराची कचरापूर अशी झालेली प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीने सोमवारपासून शहर कचरामुक्त अभियान दणक्यात सुरू झाले. या निमत्ताने मंत्री, महापौर, नगरसेवक, अधिकारी, कामगार, विद्यार्थी यांनी शहरात प्रबोधन मिरवणूक काढली. शहर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली. शून्य टक्के कचरा करण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल लक्षवेधी ठरले.

कोल्हापूरचे महापौर, उपमहापौर आज राजीनामे देणार

वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर कादंबरी कवाळे या सभेसमोर, उपमहापौर फराकटे हे महापौरांकडे राजीनामा देणार आहेत.

शासनाचे आदेश खुंटीला टांगून टँकर व चारा छावण्या सुरूच

सोलापूर जिल्ह्य़ात नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात सरासरी ७२ टक्के पाऊस झाला तरीही शासनाचे आदेश झुगारून दुष्काळी भागातील जनावरांसाठीच्या ११७ चारा छावण्या तसेच २१८ पाणी टँकरची सेवा अद्याप सुरूच आहे.

दीपावलीच्या कार्यक्रमात कोल्हापुरात मराठीची शपथ

दीपावलीच्या उत्सवाबरोबरच एक प्रतिज्ञा करू या, मी मराठी आहे, माझी जात, धर्म, व्यवहार, माय, सर्वस्व मराठी आहे, असे मत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी नगरपालिका नगराध्यक्षपदी गोंदकर

इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुप्रिया सुरेश गोंदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी या पदासाठी गोंदकर यांचा एकमात्र अर्ज उरल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

Just Now!
X