22 September 2020

News Flash

Ishita

आता रुबल गुप्ताही शिर्डीच्या भूमिपुत्र!

चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्यासह अनेक चित्रपट तारे-तारकांना शिर्डीतील जागेची भुरळ पडते. प्रशासनातील सनदी अधिकारीही त्याला अपवाद नाहीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता यांनीही शिर्डीत छोटेसे घर असावे म्हणून सव्वा गुंठा जागा खरेदी करून त्याही शिर्डीच्या प्रेमात पडल्या आहेत.

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेला आज प्रारंभ

५९वी शालेय, १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेस शुक्रवारपासून सद्गुरू ओम गुरुदेव विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्टच्या (कोकमठाण, कोपरगाव) इंटरनॅशनल स्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर सुरू होत आहेत.

टोलचा भार कुणावर?

अंतर्गत रस्त्यांची टोलआकारणी रद्द करण्याबाबतचा ठराव महापालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत होणार असल्याच्या पूर्वसंध्येला महापालिकेची गोची झाल्याचे दिसून आले.

टोल नाक्यांच्या सफाईस आयआरबीकडून प्रारंभ

टोलआकारणीस जोरदार विरोध करीत रविवारी शहरातील सर्व नाक्यांची प्रचंड नासधूस करण्यात आली असली तरी गुरुवारी आयआरबीच्या कर्मचा-यांनी टोल नाक्यांच्या साफसफाईस प्रारंभ केला.

कृषिमंत्र्यांची ढसाळ यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाने मराठी दलित साहित्यातील एका सिद्धहस्त लेखकास महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सांगली जिल्हा परिषदेत रिपाइं कार्यकर्त्यांची तोडफोड

कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील पाणीप्रश्नी जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप करीत रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत येऊ न अधिका-यांना घेराव घालत तोडफोड केली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री शेट्टर यांची अण्णा हजारे यांच्याशी भेट

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते जगदीश शेट्टर यांनी बुधवारी सायंकाळी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. समवेत त्यांच्या पत्नी शिल्पा, उद्योगपती राम नाईक होते.

कागल औद्योगिक वसाहतीत प्लायवूड कारखान्याला आग

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत प्लायवूडपासून दरवाजे बनविणाऱ्या कारखान्याला दुपारी आग लागली. आगीमध्ये साहित्य व शेड भक्ष्यस्थानी पडले.

आसिफ पठाण याच्यासह सात जणांच्या टोळीला अटक

खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजीतील मटका किंग व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष आसिफ नसीरखान पठाण याच्यासह सात जणांच्या टोळीला पोलिसांनी बुधवारी अटक केली.

शोभेच्या दारूकामातून जनप्रबोधन

उंच आकाशामध्ये झेपावत फुटणारे औटगोळे, त्यातून प्रकट होऊन काही क्षणात लुप्त होणारे रंगीबेरंगी तारे, तारामंडल, म्हैसूर कारंजे, धबधबे आदी पारंपरिक कृतींबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाची जागृती व्हावी आणि ख-या अर्थाने ‘देशाचा विकास मतदारांच्याच हाती’ यांसारखी नेमकेपणाने प्रबोधनपर संदेश देणारी घोषवाक्ये शोभेच्या दारूकामाद्वारे पाहून लाखो नेत्रांचे पारणे फिटले.

शालेय रिक्षांचा संप सुरूच

जिल्हाधिकारी मुंबईला गेल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या संपात बुधवारी तिस-या दिवशीही कोणताच मार्ग निघू शकला नाही. आक्रमक आव आणलेल्या अॅपेचालकांनी मात्र संयुक्त चर्चेनंतर नरमाईची भूमिका घेत त्यांचे आंदोलन दुपारी मागे घेतले.

बाबरिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ श्रीरामपूरला मोर्चा

औद्योगिक वसाहतीत खोटे दस्तऐवज बनवून भूखंड लाटल्याप्रकरणी व्यापारी शैलेश वसंतलाल बाबरिया यांना केलेली अटक अन्यायकारक असून, त्यांच्यावरील खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा या मागणीसाठी आज श्रीरामपूर र्मचट असोसिएशनने मोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

वाडिया पार्क पुन्हा ताब्यात घेऊ-जगताप

क्रीडा संकुल आणि खेळाच्या विकासासाठी वाडिया पार्क मैदान महानगरपालिकेला पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे लागेल. त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असा गर्भित इशारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार अरुण जगताप यांनी बुधवारी दिला.

कौन्सिल हॉलचे नूतनीकरण बारगळणार?

शहराच्या वैभवशाली परंपरेचा मानबिंदू ठरलेल्या महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील कौन्सिल हॉलचे नूतनीकरण बारगळल्याचीच चिन्हे दिसू लागली आहेत.

महापालिका सभेकडे करवीरवासीयांचे लक्ष

अंतर्गत रस्ते प्रकल्पासाठी आयआरबी कंपनीने केलेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी गुरुवारच्या महापालिकेच्या सभेत नेमका कोणता निर्णय होतो याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत होम प्रदीपन सोहळा संपन्न

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी होम मैदानावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत होम प्रदीपनाचा सोहळा पार पडला.

आंदोलकांकडून ‘आयआरबी’चे श्राद्ध

शहरात पुन्हा टोल आकारणी सुरू होणार असल्याची कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी शहरातील टोल नाक्यांवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. पुन्हा टोल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याबद्दल कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयआरबी कंपनीचे श्राद्ध घातले.

सोलापुरात पैगंबर जयंतीनिमित्त उत्साही वातावरणात शोभायात्रा

अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरसाहेबांची जयंती मंगळवारी सोलापूर शहर व परिसरात मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये मिरजेजवळ किरकोळ आग

अजमेर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी आकस्मिक आग लागली. मात्र प्रवाशांच्या दक्षतेने पुढील अनर्थ टळला. एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यामध्ये ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे.

दिवसभर जल्लोषात पतंगबाजी

कर्णकर्कश स्पीकर जोडीला ‘व्हय काप्या’च्या जल्लोषात नगरकरांना संक्रांतीच्या पतंगोत्सवाचा आनंद लुटला. त्यासाठी शहरातील तमाम तरुणाई मंगळवारी दिवसभर घरांच्या गच्चीवरच होती.

सुटीमुळे दुर्लक्ष, आज निर्णयाची प्रतीक्षा

सरकारी सुटी व सणामुळे कोणत्याही सरकारी यंत्रणांनी मंगळवारी शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या संपाची व अ‍ॅपेचालकांच्या ‘रिक्षा समर्पण आंदोलन’ची दखल घेतली नाही.

आशाताईंची ‘बुगडी’ आणि जावेद परिवाराशी भेट…

बुगडी माझी सांडली गं.., हात नका लावू माझ्या साडीला.. अशा अजरामर लावण्यांचे मुखडे गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी वयाच्या ८१व्या वर्षी तितक्याच झोकात सादर केले. उपस्थित रसिक जनसागराने टाळय़ांच्या गजरात आशाताईंच्या जादुई आवाजाला दाद देत ठेका धरला.

आता पोलिसांनाच ‘मामा’ बनवण्याचे प्रकार

शहरातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, पोलिसांना मामा बनविण्याचे प्रकार जसे वाढले आहेत, तसेच पोलीस असल्याचे सांगून लुटले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांना अटक केली.

राजकीय वादातून एका कुटुंबाला मारहाण

राजकीय वादातून गोंधवणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण फरगडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे मारहाण करणारेही राष्ट्रवादीशी संबंधित आहेत.

Just Now!
X