22 September 2020

News Flash

Ishita

कोल्हापूर महापालिकेच्या अधिका-यांची ‘निरी’च्या जल तज्ज्ञांकडून कान उघडणी

पंचगंगा प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या ‘निरी’च्या अधिका-यांना मोजकीच ठिकाणे दाखवत कोल्हापूर महापालिका तत्पर असल्याचे चित्र निर्माण करणा-या अधिका-यांची ‘निरी’च्या जलतज्ज्ञ अश्विनी ढगे यांनी चांगलीच कानउघडणी केली.

‘म्हैसाळ’चे पाणी पोहोचण्यापूर्वीच त्यात कपात

म्हैसाळ योजनेचे पाणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कवठेमहांकाळ मतदार संघात पोहोचण्यापूर्वीच शेतक-यांच्या अल्प प्रतिसादामुळे बुधवारी जलसंपदा विभागाने पाण्यात कपात केली.

देहेरे टोलवसुली विरोधात राष्ट्रवादीचा ठिय्या

नगर-मनमाड राज्यमार्गावरील देहेरे येथील टोलवसुली थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आक्रमक आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात या कार्यकर्त्यांनी धरणे धरली, मात्र या दरम्यान अधिका-यांशी त्याची जोरदार खडाजंगी झाली.

आ. कांबळे विधानसभेचेच उमेदवार

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाच मिळेल असे संकेत पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिले आहेत.

चोरटे विक्रेतेच झारीतील शुक्राचार्य- प्रा. घैसास

घरगुती गॅसच्या वापरात सिलिंडरच्या चोरटय़ा विक्रीमुळेच अडचणी येत आहेत. हीच मंडळी झारीतील शुक्राचार्य बनली असून, यात आधार कार्ड योजना व बँक खात्याच्या अनुदानात कोणतीही अडचण नसल्याचा निर्वाळा शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. मुकुंद घैसास यांनी दिला आहे.

म्हैसाळ योजना आजपासून कार्यरत

राजकीय श्रेयवादात सापडेलेली म्हैसाळ योजना मंगळवारपासून कार्यरत होत असली तरी पाणी पट्टी भरण्यास लाभार्थी शेतकऱ्यांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती जिल्ह्य़ातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांची होण्याची शक्यता आहे.

आदिवासी संस्कृतीत स्त्री सुरक्षित

आदिवासी संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो. त्यांना पुरुषांबरोबरचा मान दिला जातो, त्यामुळेच आदिवासी समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत नाहीत असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.

आरोग्य पत्र आहे, पण आरोग्यसेवा नाही

राज्यातील जनतेला मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ प्रशासकीय पातळीवर निर्माण झालेल्या सावळय़ा गोंधळामुळे रुग्ण व नातेवाइकांना मिळताना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद ठेवत विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शहर व परिसरातील हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका व कर्मचारी उतरल्या आहेत.

सोलापुरात प्रशासनासमोर नव्या आव्हानाची भीती

छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचारासाठी विलंब केल्यावरून एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणीमुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघे पोलीस निलंबित झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबीयांची संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभेच्या तोंडावर आंदोलनाचा पवित्रा

प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षांत वेळोवेळी इशारा आंदोलने करूनही राज्य सरकारने दाद न दिल्याने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ऐन लोकसभा निवडणुकीच्याच तोंडावर बेमुदत संपाचा पवित्रा घेतला आहे.

आरोग्यसेविकांचे उपोषण मागे

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १५१ आरोग्यसेविकांना सेवेत नियमित करणे, त्यांना व आरोग्य सहायकांना कालबद्ध पदोन्नती आदी विविध मागण्या २८ फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. डी. हंडाळ यांनी दिल्यानंतर जिल्हाभरातील सुमारे ४५० महिला आरोग्य कर्मचारी (एएनएम) व महिला आरोग्य पर्यवेक्षिकांनी (एलएचव्ही) यांनी जि. प.च्या आवारात सकाळपासून सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.

पत्रकारदिनी बालविवाह विरोधी शपथ

बालविवाह करणार नाही, बालविवाह करू देणार नाही अशी सामुदायिक शपथ घेतानाच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचा आणि स्त्रीजन्माचे स्वागत करण्याचा निर्धार शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी केला.

इमारत दुरुस्ती कामात अपहार; माजी सभापतींविरुद्ध गुन्हा

सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या इमारत सुशोभीकरण तथा दुरूस्ती कामात १२ लाख २६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी शिक्षण मंडळाचे तत्कालीन सभापती सुनील रसाळे व प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्यासह तिघा कर्मचा-यांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेवासे येथे सत्र जिल्हा व सत्र न्यायालय

नेवासे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याची माहिती नेवासे वकील संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब टेमक यांनी दिली.

साडेचार कोटींचा प्रकल्प २८ कोटींवर

तालुक्याच्या दक्षिण भागातील पळसुंदे लघुपाटबंधारे तलावाच्या २८ कोटी रुपये खर्चाच्या कामास शासनाने नुकतीच द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी तातडीने ८ कोटी रुपयेही वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या सुमारे एक तपापासून रखडलेला हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे.

उमेदवारी लवकरच जाहीर करण्याचे पवारांचे आश्वासन

लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या वाढत चालल्याचे आज मुंबईत झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. या वेळी जिल्हय़ातील नेत्यांनी उमेदवारीबाबत एकवाक्यता दाखवावी, अशी समज देतानाच पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येत्या आठ-दहा दिवसांत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल, असे सांगितले.

आयुक्त गुडेवारविरोधात सत्ताधा-यांचा आकस अखेर बाहेर आलाच…

गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर महापालिकेवर वर्चस्व ठेवणा-या व मनमानी कारभार करून शहराची वाट लावणा-या कारभा-यांविरुद्ध आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईचा हातोडा उचलताच त्यांना पालिकेतून हुसकावून लावण्याचा घाट घालण्याचे छुपे प्रयत्न होत आहेत.

न्यायव्यवस्था प्रगत तंत्रज्ञानाने गतिमान करण्याचा प्रयत्न- पृथ्वीराज चव्हाण

समाजाला ज्या व्यवस्थांबद्दल आदर आहे. त्यातीलच एक न्यायव्यवस्था असून, न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास व आदर वृद्धिंगत करण्याची जबाबदारी सर्वच घटकांची असल्याचे सांगताना न्यायव्यवस्था सहज, सोपी व गतिमान करण्यासाठी मूलभूत सेवासुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

वीज घोटाळय़ाबाबत राजू शेट्टींचा आरोप महानिर्मितीने फेटाळला

राज्यात लवकरच राष्ट्रवादीचा वीज घोटाळा उघडकीस येणार असून, यात कोळसा निर्यातीत राष्ट्रवादीचे हात काळे झाल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्टीकरण महानिर्मिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी महेश आफळे यांनी केला आहे.

बलात्कारप्रकरणी देवऋषी अटकेत

करणी झालेली असल्याने कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आहेत, अशी भीती दाखवत त्यातून बाहेर पडण्यासाठी शारीरिक संबध ठेवण्याचा एकच मार्ग असल्याचे सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी खंडाळा येथील देवऋषी दादा श्रीपती गायकवाड (वय ५८)याला खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे.

उपअभियंत्यांसह २० शाखा अभियंत्यांना नोटिसा

सांगली जिल्ह्यातील २८६ पकी अवघ्या ७१ नळपाणी योजना पूर्ण झाल्या असून अन्य योजनांचे काम रखडल्याप्रकरणी पाणी पुरवठय़ाच्या पाच उपअभियंत्यांसह २० शाखा अभियंत्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत.

स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता कोठे आहे?

खंडाळा तालुक्यातील कवठे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाच्या दारातच मृतदेह आणून ठेवल्याने तणाव निर्माण झाला.

न्यायप्रक्रिया गतिमान होण्यासाठी वकिलांनी योगदान देण्याची गरज – न्या.मोहित शहा

जनतेचा न्यायालय व वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, पण संथ न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते समाधानी नाहीत. यासाठी न्यायप्रक्रिया गतिमान होण्यासाठी वकिलांनी योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी रविवारी येथे बोलताना केले.

Just Now!
X