22 September 2020

News Flash

Ishita

महापौरांची आजपासून दुसरी इनिंग

नवे महापौर संग्राम जगताप उद्यापासून (बुधवार) महापालिकेच्या नियमित कामकाजाला सुरुवात करणार आहेत. अपूर्ण योजना शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी या कामांना तातडीने गती देणार असल्याचे त्यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

अल्पवयीन मुलाकडून छोटय़ा मुलीवर अत्याचार

सायकलवरून चक्कर मारून आणण्याच्या नावाखाली साडेपंधरा वर्षीय मुलाने चार वर्षांच्या छोटय़ा मुलीवर बलात्कार केला. तालुक्यातील गोगलगाव येथे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

लिंगदेव येथे शेतक-याच्या घरावर दरोडा

तालुक्यातील िलगदेव येथे एका शेतक-याच्या घरावर आज पहाटे पडलेल्या दरोडय़ात चोरटय़ांनी केलेल्या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले. घरातील महिलांच्या अंगावरील सुमारे ५५ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेले.

आज पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यालये खुली

‘थर्टी फर्स्ट डिसेंबर’ साजरा करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यालय आणि पहाटे १ वाजेपर्यंत मद्यविक्री सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र १ दिवसाच्या परवान्यासाठी पाच व दोन रुपये फी मोजावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यात या एका दिवसात सुमारे ७० हजार लिटर मद्याची विक्री होण्याचा अंदाज आहे.

महाबळेश्वर सजले!

नव्या वर्षांचे स्वागत गुलाबी थंडीत करण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईत शंभरावर हॉटेल, फार्म हाऊस सज्ज झाले आहेत. मागील दोन दिवसांत थंडीचा जोर वाढला असून, नववर्षांच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणी हाऊसफुल्ल झाले आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी करवीरनगरी सज्ज

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. मावळत्या वर्षांला निरोप देण्यासाठी शहरातील सर्वच हॉटेल्स मध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येस ‘अंनिस’ स्मशानात घेणार ‘भुताचा शोध’

नववर्षांच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्मशानभूमीत जाऊन ‘भुताचा शोध’ घेणार आहे. अंधश्रद्धेच्या मूळ संकल्पनेलाच छेद देण्याचा प्रयत्न या उपक्रमापाठीमागे असल्याचे डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले.

सांगलीत ड्रेनेज योजनेच्या फेरनिविदेचे आदेश

शहरातील विस्तारित भागासाठी हाती घेण्यात आलेली १७९ कोटींची ड्रेनेज योजना फेरनिविदा काढून सुरू करावी असे महापौरांनी महासभेत आदेश दिले असतानासुद्धा याच योजनेचा शुभारंभ करण्यामागील गौडबंगाल काय? असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.

चार वर्षांपूर्वीच्या घटनेचे सोलापूरकरांना स्मरण

ऐन निवडणुकीच्या प्रचारात घडलेल्या शेगाव खूनखटल्यातून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह सर्व २९ आरोपींची मुक्ततेच्या निकालाने संपूर्ण जिल्हा आज ढवळून निघाला. या निकालाने चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे पुन्हा एकदा स्मरण झाले.

महापौर-उपमहापौर निवडीचा जल्लोष

महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांची निवड जाहीर होताच आघाडीच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. महापौरांची शहरातून उघडय़ा जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

महापौरपदी जगताप, कोतकर उपमहापौर

नगरच्या महापालिकेत अपेक्षेप्रमाणे सहजगत्या राजकीय परिवर्तन झाले. महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर हे दोघेही बारा मतांनी विजयी झाले. दोघांना ६८ पैकी ४० मते मिळाली.

कर्मचा-यांमुळे बीएसएनएल प्रगतिपथावर

दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धेतही बीएसएनएलमधील कर्मचारी कर्तव्य व सचोटीच्या जोरावर कंपनीस पुढे नेत आहेत, असा गौरव खासदार दिलीप गांधी यांनी केला.

वाहतूक पोलिसांची कर्जतला मनमानी

शहरातील रहदारीला मदत तर दूरच राहिली, वाहतूक पोलिसांचा नागरिकांना त्रासच अधिक होऊ लागला आहे. विशेषत: व्यापारीवर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नव्या वर्षात कांद्याचा नीचांकी भाव?

केंद्र सरकारने निर्यातमूल्य कमी करूनही कांद्याच्या दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. निर्यातमूल्याची अट रद्द केली नाही, तर नवीन वर्षांत कांद्याच्या भावाचा नीचांक होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

महापौर व उपमहापौरपदाची आज निवडणूक

महापौर व उपमहापौर निवडीसाठी उद्या, सोमवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेची सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

मनसेचा काँग्रेस आघाडीलाच पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरच्या महापालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष धुरी यांनी देतानाच, मनसेला सत्तेत एक समिती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

राज्याचे विभाजन करणारे नेतृत्व नको- थोरात

धोरण ठरवणारे राज्यकर्ते व त्याची अंमलबजावणी करणारी प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा हे दोघेही पुरोगोमी विचारांचे असतील तरच राज्य ताकदवान होईल, राज्याचे किंवा देशाचे विभाजन करणारे नेतृत्व नको यासाठी वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी ‘कास्ट्राईब’ने स्वीकारावी, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केली.

‘आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी कायदा करावा लागणे हे दुर्दैवी’

वृद्धाश्रमाची कल्पना आपल्याला मान्य नसून आई-वडिलांची सेवा, त्यांचा सांभाळ करणे यासाठी सरकारला कायदा करावा लागला हे दुर्दैवी आहे. म्हणूनच बालकांना आधात्मिक सुसंस्काराची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

सोलापूर जिल्हा बँकेने नवीन कर्जे न देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

बँकेने यापूर्वी दिलेल्या बेकायदेशीर कर्जाची वसुली न झालेल्या व कर्जाला तारण नसलेल्या संचालकांच्या संबंधित कर्ज खात्याबाबत यापुढे कोणतेही कर्ज देण्यास खंडपीठाने मनाई केली.

नगरसेविकेचे दागिने चोरटय़ांनी ‘धूम स्टाईल’ने लुटले

केंद्रीय गृहमत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून घराकडे परत निघालेल्या भाजपच्या नगरसेविका रोहिणी तडवळकर यांना वाटेत ‘धूम स्टाईल’ने दोघा चोरटय़ांनी अडवून सहा तोळे सोन्याचे दागिने हिसका मारून लुटून नेले.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिक्रमणांवर रविवारी हातोडा

कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिक्रमणांवर रविवारी हातोडा घालण्यात आला. तेथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात बाजार समितीच्या प्रशासनाने हटविले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते व गूळ व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हा गेली अनेक दिवस चर्चेचा विषय होता.

हरयाणाच्या शिक्षणमंत्र्यांकडून हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस

हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राळेगणसिद्घीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शिवाजी मखरे यांचा मृत्यू अपघाती की घातपाती?, नातेवाइकांना संशय

श्रीगोंदे तालुक्यातील मखरेवाडी येथील शिवाजी संभाजी मखरे यांचा कर्जत-श्रीगोंदे रस्त्यावर अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली होती. मात्र पोलिसांना आलेल्या एका निनावी दूरध्वनीने मखरे यांचा मृत्यू ट्रॅक्टरच्या धडकेने झाल्याचे उघड झाले.

काँग्रेसच्या श्रीगोंदे तालुकाध्यक्षपदी भोईटे

श्रीगोंदे तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्रीगोंदे साखर कारखान्याचे संचालक धनसिंग भोईटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Just Now!
X