06 August 2020

News Flash

बबन मिंडे

दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

नोकरदारांचे वेतन आणि बोनस वेळेत मिळाल्याने या वर्षी दिवाळीपूर्वी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षण कृती बचाव समितीचा घंटानाद

महाराष्ट्रातील शिक्षणाची दुरवस्था टाळण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, यासाठी महाराष्ट्र, राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आज शनिवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन केले.

ग्रामपंचायतींच्या रणमैदानात नांदेडात प्रस्थापितांना धक्का!

जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी विशेषत: भोकर विधानसभा क्षेत्रात धक्कादायक निकाल लागले.

शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी आता समान नियमावली

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये शिक्षकेतर पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीत असलेली भिन्नता आता असणार नाही.

सीमाप्रश्नी शिवसेना आमदार-खासदार पंतप्रधानांना भेटणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिवसेना पुन्हा सरसावली असून, सेनेचे ६३ आमदार, तसेच २२ खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

बस-मालमोटारीची धडक; २२ जखमी

एस. टी. बस आणि ऊसतोडणी कामगारांना घेऊन येणारी मालमोटार यांची समोरासमोर धडक होऊन २२ जण गंभीर जखमी झाले.

खासदार खैरेंविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा

वाळूज येथील ५ अतिक्रमित धार्मिक स्थळांवर कारवाईदरम्यान तहसीलदार रमेश मुनलोड यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर सोमवारी अखेर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठवाडय़ात राष्ट्रवादीची भाजपला धोबीपछाड

लोकसभा-विधानसभांच्या रणमैदानात मराठवाडय़ात काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड करून पराभवाची धूळ चाखावयास लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाला वर्षभरातच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

‘औद्योगिकरणाच्या हव्यासाने निसर्गाचे ऋतूचक्र बिघडले’

परदेशी विद्यापीठात जगाच्या ज्ञानात भर घालणारे संशोधन असेल तरच पीएच. डी. मिळते. पण आपल्याकडे संकलन करून पीएच.डय़ा. मिळवल्या जातात.

घनसांगवी-जाफराबादमध्ये राष्ट्रवादी, मंठय़ात शिवसेना

जिल्ह्य़ातील चार नगरपंचायतींच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. घनसावंगी, जाफराबादमध्ये राष्ट्रवादीने, तर मंठा नगरपंचायतीत शिवसेनेने निर्विवाद बहुमतासह झेंडा फडकावला.

भेदरलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण?

राज्यातील नामवंत अशा राजर्षी शाहू महाविद्यालयात भरदुपारी शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांच्या समोर प्रचंड मारहाण झाली.

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला ‘ताज’चे कोंदण

नापिकी व कर्जबाजारीपणाचा अतिशय संवेदनशील विषय सोमवारी शहरातील ‘ताज’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चेत येणार आहे.

अडचण महापारेषणाची; खोळंबा महावितरणचा!

राज्यात २ हजार मेगाव्ॉट अतिरिक्त वीज असतानाही मागील काही दिवसांपासून अतिरिक्त भारनियमनाच्या (फोर सी) प्रमाणात वाढ झाली आहे.

अनंतराव भालेराव पुरस्काराने राजेंद्रसिंह राणा यांचा गौरव

मराठवाडय़ातील राजकीय नेतृत्व थोडे समंजसपणे वागले असते, तर त्यांनी हा भाग ऊसक्षेत्र होऊ दिला नसता, या शब्दांत टीका करीत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी दुष्काळ मुक्तीसाठी प्रवाहाचा वेग कमी करणे हे सोपे उत्तर असल्याचे सांगितले.

रविवारी रात्रीतून जायकवाडीला पाणी सुटणार!

पोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले.

एकता दौडीमध्ये करवीरनगरी धावली

देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा संदेश कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी शनिवारी करवीरनगरी एकता दौडीमध्ये मनापासून धावली.

कोयनेतून उसासाठी पाणीबंदीचे नियोजन

कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाच्या हंगामापर्यंत पुरविण्यासाठी उसासारख्या बारमाही पिकाला पाणीच न देण्याचे जलसिंचन विभागाचे नियोजन सुरू आहे.

कोल्हापुरात छायाचित्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

येथील छायाचित्रकाराने स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी निदर्शनास आला. आनंदराव दत्तात्रय चौगुले असे या छायाचित्रकाराचे नाव आहे.

निवडणुकीतील गैरप्रवृत्तीवर विडंबनात्मक फटकारे

कोल्हापूर महापालिकेतील नव्या सभागृहातील सत्तासूत्रे घेणाऱ्या नगरसेवक आणि त्यांच्या नाठाळ प्रवृत्तीवर विडंबनात्मक फटकारे मारणारा कोल्हापुरी फटका हा चित्रकारितेचा उपक्रम मतदारांचे प्रबोधन करण्याबरोबरच नगरसेवकांनाही कामाची जबाबदारी करून देणारा ठरला.

ट्रॅक्टर ट्रॉलीने बस कापली; बीडमध्ये सहा ठार, ४ गंभीर

पुण्याहून अंबाजोगाईस येत असलेल्या बस व ट्रॅक्टरची धडक होऊन सहा प्रवासी जागीच ठार, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावरील डिघोळअंबा पाटीजवळ घडली.

मुंडे-पाटील लवादाचा करार बेकायदा – ढाकणे

ऊसतोडणी किंवा कोणताही कामगार हा विषय मुख्यमंत्री, कामगार मंत्री, आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्या अखत्यारीत येतो.

सीमाभागातील मराठी भाषकांसाठी सेनेचा बेळगावला उद्या काळा दिन

बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे.

भाईकट्टींना मारहाणीच्या प्रकाराचा लातुरात निषेध

माहिती अधिकार कार्यकत्रे मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात नेऊन शिवसनिकांनी केलेल्या बेदम मारहाणीचा लातूरकरांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

पाणीप्रश्नाच्या चक्रात लातूरकरांची घुसमट

महिन्यातून जेमतेम तीनदा होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून लातूरकरांची सुटका व्हावी, या साठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू असले तरी सातत्याचा आणि ध्योयधोरणाचा अभाव या चक्रात कधी भंडारवाडी, तर कधी उजनी असा लातूरचा पाणीप्रश्न हेलकावे खात आहे.

Just Now!
X