11 August 2020

News Flash

दया ठोंबरे

सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

अकरावी प्रवेशाची पाहणी करणारी भरारी पथके कागदोपत्री?

नियमबाह्य़ प्रवेश सापडल्यास पथकावरच कारवाई करण्याच्या मागणीमुळे प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयातील प्रवेशांची तपासणी झालीच नसल्याचे दिसत आहे.

महिला अधिकाऱ्याविरुद्ध पुन्हा तक्रार

महिला अधिकाऱ्याच्या विरोधात विवेक वेलणकर यांना सोमवारी रात्री ई मेल करून तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा तसाच प्रकार डॉ. परदेशी यांनी केला.

फटाका स्टॉलच्या परवानगीत पक्षनेत्यांनी कारस्थाने केली

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानच्या रस्त्यावर फटाका स्टॉलना परवानगी देताना पक्षनेत्यांनी कारस्थाने केली, असा थेट आरोप सभेत बुधवारी करण्यात आला.

लोहगाव विमानतळावर चार किलो सोने पकडले

दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल चार किलो वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे लोहगाव विमानतळावर पकडली. दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

‘एफटीआयआय’चा संप तोडग्याविनाच मागे!

तब्बल पाच बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे अखेर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

टँकरवाडय़ात ऊस ‘पितोय’ तब्बल १७२ टीएमसी पाणी!

ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे.

साठेबाजांविरोधात छापेसत्र; ७ कोटींचा धान्यसाठा जप्त

दरवाढीला आळा घालण्यासाठी साठेबाजीवर टाकलेल्या छाप्यांत तब्बल ७ कोटींच्या धान्यसाठय़ाला लगाम घालण्यात प्रशासनाला यश आल्याचा दावा केला जात आहे.

नवगण राजुरीतील जि. प. शाळेचा संकल्प

शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना राजुरी येथील शाळेतील शिक्षकांनी मात्र यास छेद देत विविध उपक्रम राबवताना शाळेला रोल मॉडेल बनवले आहे.

महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक

विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार लक्षात आला.

कलाकार, सर्व भाषिक लेखक, कवींना नवे व्यासपीठ

पाचगणीत पर्यटनाच्या माध्यमातून जगभरातून येणारे त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,

‘फडणवीस सरकार नापास’

एक वर्षांतील कामकाज पाहता राज्यातील सरकारला ग्रेस मार्क देऊनही असंवेदनशील असल्याने फडणवीस सरकार नापास असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

रविवारचा लाभ घेत प्रचाराला जोर

कोल्हापूर महापालिका निवडणूक येत्या रविवारी होणार असून प्रचारासाठी आजचा एकमेव रविवार सुटीचा लाभ उठवत उमेदवारांनी अवघे शहर प्रचारासाठी िपजून काढले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही टॅब वाटप करणार- आदित्य ठाकरे

कोल्हापुरात टॅबचे वाटप करण्यात येईल, अशी घोषणा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली.

विविध आश्वासनांसह प्रचारदौरा

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ातील भाजपा-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी िशदे यांचा रविवारी झंझावाती प्रचारदौरा झाला.

हक्काच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींची एकजूट

लोकप्रतिनिधी हक्काच्या पाण्याच्या बाबतीत गंभीर नाहीत. या लढय़ाला आकार देण्यासाठी बठक घेण्याचे ठरविण्यात आल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.

नवगण राजुरी जिल्हा परिषद शाळेचा ‘दप्तर मुक्ती’ संकल्प!

सेमी इंग्रजी सुरू करणारी ही पहिली शाळा आता दप्तरमुक्त होणार असून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती आता टॅब दिसणार आहे.

शिळे अन्न खाल्ल्याने ५१ जणांना विषबाधा

घरगुती कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी शिळे अन्न खाऊन विषबाधा झाल्याने ५१ जणांना किनवटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बीडमध्ये सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा थाळीनाद

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तू महागल्याने जनतेचे दिवाळे निघत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

लातूर-उस्मानाबादच्या पाणीपुरवठय़ासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र प्रस्ताव

उस्मानाबाद, लातूरमध्ये केवळ दीड टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे भविष्यात या दोन शहरांच्या पाणीपुरवठय़ासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रस्ताव सादर केला आहे.

घटोत्थापनाने तुळजाभवानी नवरात्र उत्सवाची सांगता

तुळजाभवानी मंदिरातील होम कुंडावर धार्मिक विधीने (अजाबळी) शारदीय नवरात्र उत्सवाचे घटोत्थापन झाले आणि नवरात्रोत्सवाच्या प्रथम चरणाची सांगता झाली.

पर्यटकांच्या मदतीला आता ‘टूरिझम पोलीस मोबाईल’!

पर्यटनाचा आनंद द्विगुणित व्हावा, या उद्देशाने पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून टूरिझम पोलीस मोबाईल सेवेस गुरुवारी विजयादशमीचे मुहूर्त साधून प्रारंभ करण्यात आला.

मुहूर्ताच्या खरेदीला उत्साहाचे कोंदण!

विजयादशमीनिमित्त पर्यटनाच्या राजधानीत वाहन खरेदीचा उत्साह वर्षांगणिक वाढत असल्याचे चित्र गुरुवारी बाजारपेठेत दिसून आले.

‘मराठवाडय़ात क्रीडा संस्कृती रुजत नाही’

राज्य सरकारने आपणास २०१३-१४ साठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. माझ्यासाठी ही बाब आनंदाची असली, तरी मराठवाडय़ात अजूनही क्रीडा संस्कृती रुजत नाही याची खंत वाटते, अशी भावना गणपतराव माने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. राज्यात अजूनही खेळाकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. खेळासाठी, शाळांसाठी पुरेशी व चांगली मदाने नाहीत. क्रीडासाहित्य नाही. […]

Just Now!
X