04 August 2020

News Flash

दया ठोंबरे

संवेदना यात्रेचे प्रमुख योगेंद्र यादव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

२०० कोटींच्या बोगस कामाची चौकशी होणार- ऊर्जामंत्री बावनकुळे

सुमारे २०० कोटींची बोगस कामे केल्याच्या तक्रारी आहेत. या कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

निकाल लागतात, न्याय मिळतो का – न्यायमूर्ती अंबादास जोशी

न्यायव्यवस्थेतमार्फत खटल्यांचे निकाल लागतात. मात्र त्यातून न्याय किती जणांना मिळतो, यावर गंभीर विचार करण्याची गरज न्या. अंबादास जोशी यांनी व्यक्त केली.

शारदीय नवरात्र महोत्सव भाविकांची काळजी घ्या- पालकमंत्री डॉ. सावंत

तुळजापूर येथील नवरात्रात भाविकांची गरसोय होणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, उद्धव ठाकरे बीडमध्ये

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कोटी मदतीचे वाटप होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन होत आहे.

आदित्य ठाकरेंच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना ६५ लाखांचे वाटप

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८ योजनांच्या लोकवाटय़ाची ६५ लाख रुपयांची रक्कम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थीना देण्यात आली.

उस्मानाबादची दोन गावे आता जगाच्या नकाशावर

उस्मानाबाद तालुक्यातील उपळा आणि पाडोळी या नावाने पोर्तुगालमध्ये जरबेरा फुलाचे वाण विकसित करण्यात आले आहे.

‘काळ्या यादीतील कंत्राटदारास प्रशस्तिपत्र कशासाठी?’

काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला प्रशस्तिपत्र कशाच्या आधारे दिले, ६० कोटींची कामे वेळेत न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका.

परभणीत रब्बीची पाच टक्केच पेरणी

खरिपाकडून दारुण निराशा आणि परतीच्या पावसानेही हात आखडला या पाश्र्वभूमीवर सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.

तेरच्या जागतिक वारशाला आंतरराष्ट्रीय मत्रीचे कोंदण!

सुमारे अडीच हजार वर्षांहून अधिक काळाचे अवशेष तेरनगरी आजही अभिमानाने मिरवत आहे. या वारशाला आता जागतिक मत्रीचे कोंदण मिळणार आहे.

सलग तिसऱ्या दिवशी मराठवाडय़ात पावसाची हजेरी

मराठवाडय़ात ठिकठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

हैदराबाद-औरंगाबाद विमानास हवेत आग; प्रवासी सुखरूप

हैदराबादहून औरंगाबादकडे येणाऱ्या ‘टू-जेट’ या विमानाला हवेत आग लागली. त्यामुळे विमानाचे एक इंजिन बंद करून वैमानिकाने ते पुन्हा हैदराबादला वळविले.

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

साडेतीन शक्तिपीठापकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस रविवारी प्रारंभ झाला.

ऑक्टोबरपासून पीक कर्जास बंदी

गंगाजळीत आलेली तूट, कर्ज आणि ठेव रक्कम यातील झालेली वाढ यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीक कर्ज देण्यास मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.

सत्तेच्या वाटय़ासाठी रिपाइंच्या मेळाव्यात घटक पक्षांचा नाराजीचा सूर

बीड येथे पंचशीलनगर भागातील खुल्या मदानावर शनिवारी सायंकाळी खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रिपाइंचा ५८ वा वर्धापनदिनाचा महामेळावा झाला.

अवैध वाळू वाहतूकदारांना अडीच लाखांचा दंड

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून २ लाख ६१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधी जयंतीनिमित्त शहरात स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांतर्फे शुक्रवारी शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पक्षाची बदनामी होईल असे निर्णय पालिकेत घेऊ नका- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी होईल असे निर्णय पालिकेत घेऊ नका, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या नगरसेवकांना योग्यप्रकारे काम करण्याचा सल्ला दिला.

तळेगावात सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट

तळेगाव दाभाडे येथे कमला ज्वेलर्स या दुकानावर दहा ते बाराजणांच्या टोळीने शुक्रवारी संध्याकाळी सशस्त्र दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट केली.

‘एफटीआयआय’बद्दल पुढील बैठक ७ ऑक्टोबरला मुंबईत

‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर होणाऱ्या माहिती व प्रसारण मंत्रालयाची बैठक मंगळवार ऐवजी बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईतच होणार आहे.

‘एसआरए’चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव याला लाच घेताना अटक

२५ लाख लाचेची मागणी करून त्यातील पाच लाखांचा दुसरा हप्ता स्वीकारताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष रामचंद्र यादव याला रंगेहाथ पकडण्यात आले.

पीएमपी ठेकेदारांच्या साहेसहाशे गाडय़ा अचानक बंद

कोणतेही कारण न देता तसेच पूर्वकल्पना न देता पीएमपीला भाडेतत्त्वावर गाडय़ा पुरवणाऱ्या ठेकेदारांनी गुरुवारी त्यांच्या ६५३ गाडय़ा अचानक बंद केल्या.

खासगी प्रवासी वाहतूकदारांचाही आज मध्यरात्रीपासून बंदमध्ये सहभाग

वाहतूकदारांनी दिलेल्या पर्यायावर शासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने मालवाहतूकदारांनी गुरुवारपासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू केले.

बनावट नोटा आणणाऱ्या टोळीला अटक

बनावट नोटा घेऊन येणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली. शंभर रुपयांच्या ४९१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

Just Now!
X