06 August 2020

News Flash

Ishita

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास सांगलीत संमिश्र प्रतिसाद

दुष्काळग्रस्त शेतक ऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला रविवारी सांगली जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून दिले. आंदोलनात काही गावांमध्ये कार्यकर्ते तयारीनिशी आंदोलनात उतरले होते. तर काही ठिकाणी मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसत होते. या आंदोलनामध्ये भाजपच्या आमदारांसह कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

सोलापूर जिल्हय़ातील पाणीप्रश्नावर मुंबईत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळी प्रश्नावर सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन चालवले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. नदीत सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठीच असून ते शेतीसाठी वापरता येणार नाही, याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. या धरणे आंदोलनात भजनांचे कार्यक्रम होत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सोलापूर जिल्ह्य़ात ‘रास्ता रोको’

सोलापूर जिल्ह्य़ातील पाण्याच्या गंभीर प्रश्नासह शेतक ऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्य़ात पंढरपूर, टेंभुर्णी, मंगळवेढा, नातेपुते, करमाळा आदी पंधरा ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.

बांधकाम व्यावसायिकाला ५० लाख खंडणीसाठी धमकी

सोलापुरतील ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक भीमराव पाटील-वडगबाळकर यांना त्यांच्या व्यवसायात भागीदार म्हणून घ्या नाही तर पन्नास लाखांची खंडणी द्या, अशी मागणी करून धमकावल्याप्रकरणी अप्पासाहेब मल्लिनाथ पाटील व इतर पाचजणांविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पवनचक्कीस दिलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याने शेतक ऱ्याची आत्महत्या

पवनचक्की उभारणीसाठीची नुकसान भरपाई न दिल्याच्या कारणामुळे निराश झालेल्या शेतक ऱ्याने पवनचक्कीच्या २५ फुटांवरील टॉवरला गळफास लावून आत्महत्या केली. भीमराव सुखदेव नलवडे (वय ५०) असे या शेतक ऱ्याचे नाव आहे. ही घटना समजल्यावर सांगली जिल्ह्य़ातील वायफळे (ता.तासगाव) येथे या शेतकऱ्याचे कुटुंबीय नातेवाईक व ग्रामस्थांनी शनिवारी रात्रभर नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. तरीही कंपनीचे कोणीही अधिकारी गावाकडे न फिरकल्याने अपेक्षाभंग झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी २० तासांनंतर अंत्यविधी केला.

सोलापूर रेल्वेस्थानकात गाडीत अनोळखी बॅग सापडल्याने घबराट

रेल्वेत अनोळखी बॅग सापडली आणि त्या बॅगेतून मोबाइलसारखा येणाऱ्या आवाजामुळे गाडीतील प्रवाशांसह सर्वाची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे या बॅगेत बॉम्ब असण्याची भीती क्षणार्धात पसरायला वेळ लागला नाही. अखेर लोहमार्ग पोलिसांसह सोलापूर शहर पोलिसांचे पथक रेल्वेस्थानकात धावून आले. बॅगेची बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली आणि समाधानाचा सुस्कारा सोडला.

साताऱ्यातील ‘त्या’ मुलीवर अत्याचार झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट

सातारा येथील जानकीबाई झंवर शाळेतील मुलीवर अत्याचार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.
या प्राथमिक शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार संस्थाचालकांनी शुक्रवारी सातारा पोलिसात दाखल केली आहे.

मुलीची छेड काढणाऱ्या युवकास पोलिस कोठडी

बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर संपवून घरी जाणाऱ्या मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
नवी दिल्ली येथील घटनेनंतर नव्याने आलेल्या लैंगिक अपराध व महिला संरक्षण कायदा २०१२ व २०१३ अनुसार झालेली सातारा जिल्ह्य़ातील ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.

यंत्रमागधारक व कामगार यांच्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी

यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नावरून यंत्रमागधारक व कामगार या दोन्ही घटकांनी मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शनाची तयारी चालवली आहे. या प्रश्नात मार्ग काढावा, या मागणीसाठी यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने उद्या सोमवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला जाणार आहे. तर आठ तासांच्या पाळीला विरोध दर्शवण्यासाठी यंत्रमागधारकांच्या वतीने मंगळवारी इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

लवासा’ आणणाऱ्यांचा माज उतरवून राज्यात बदल घडवा- राज ठाकरे

महाराष्ट्राच्या मातीत व मराठी माणसात काहीही कमी नाही. परंतु त्यांच्यात फक्त इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती असेल तर ‘लवासा’ प्रकल्प होतो तर सोलापूरसह महाराष्ट्राचा विकास का होत नाही? तिकडे लवासा प्रकल्पासाठी जीव ओतून काम करता, पण इकडे महाराष्ट्रासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करीत, आम्हीच या महाराष्ट्राचे मालक व राजे असल्याचा माज त्यांना आला आहे. जनतेने हा माज उतरवून राज्यात बदल घडविण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार प्रहार केले.

उजनीचे पाणी बारामतीला; शिवसैनिकांचा उजनी कार्यालयावर हल्लाबोल

सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळाची स्थिती गंभीर बनत असताना पुणे जिल्हय़ातून पाणी न सोडता उलट, सोलापूरच्या उजनी धरणातील उरलेसुरले पाणी बारामतीतील उद्योगांसाठी पळवले जात असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी शुक्रवारी दुपारी येथील उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या वेळी कार्यालयाची तोडफोड झाली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. याप्रकरणी २२ शिवसैनिकांना अटक करण्यात आली.

रेल्वेत नोकऱ्या लावण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी टोळी जेरबंद

मानवी हक्क संघटनेच्या नावाखाली बेकार तरुणांना आकर्षित करून रेल्वेत नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या पाचजणांच्या टोळीला शासकीय विश्रामगृहात मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या पथकानेच छापा टाकून पकडले. या टोळीविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टोळीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

कोल्हापूरमध्ये बिग बझारला आग

पार्वती चित्रमंदिराजवळ असलेल्या बिग बझारमध्ये शुक्रवारी किरकोळ स्वरूपात आग लागली. वातानूकुलीत यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेवून आग आटोक्यात आणली.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

डंपर व दुचाकीची धडक होवून दुचाकीस्वार महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रणजित नंदकुमार घाटगे (वय २२ रा.मंगळवार पेठ) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज जवळ घडला.

‘जयप्रभा’बाबत महामंडळाचा दावा फेटाळला नसल्याचा दावा

जयप्रभा स्टुडिओ वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्या कामी महामंडळाचा दावा फेटाळण्यात आला. अशा प्रकारचे एकांकी वृत्त प्रसिद्ध झाले असून, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उच्च न्यायालय कोणतेही अंतिम मत प्रदर्शित करीत नसून, शासन व लता मंगेशकर यांनी सर्व मुद्यांवर मत मांडावे, असा आदेश न्यायालयाने केलेला आहे.

आडम मास्तर-प्रणिती शिंदे यांच्यात शीतयुध्द सुरूच

सोलापूरच्या राजकीय आखाडय़ात एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यात सुरू असलेले शीतयुध्द पुन्हा उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. विशेषत: या राजकीय साठमारीमध्ये कामगारांची शक्ती आपापल्या बाजूने उभी करण्यासाठी शिंदे व आडम हे दोघे ताकद पणास लावून प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

‘डीकेटीई’च्या कार्यक्रमात नवनव्या ‘फॅशन’ची झलक

देश-विदेशातील विविध वस्त्रप्रावरणे आणि देशातील नावीन्यपूर्ण संस्कृतीची झलक ‘झेनित २ के १३’ या कार्यक्रमात पाहावयास मिळाली. इचलकरंजी येथील डीकेटीई इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित फॅशन शो स्पर्धेतील या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कल्पकतेने तयार केलेली वस्त्रप्रावरणे आणि त्याचे सादरीकरण प्रभावी ठरले. या स्पर्धेत वर्मा ग्रुप विजेता तर एक्स्ट्रा वॅगन झा ग्रुप उपविजेता ठरला.

आचार्य किशोर व्यास, बावस्कर, नाईक श्रीगुरुजी राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र प्रांत रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या श्रीगुरुजी राष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी आचार्य किशोर व्यास, डॉ. हिंमतलाल बावस्कर व चंद्रकांत नाईक यांची निवड झाली आहे. रविवारी ३ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरात होणार आहे.

ग्रामस्वच्छता अभियानमध्ये वाई पंचायत समिती प्रथम

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वाई पंचायत समितीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्राम विकास व जलसंधारण विभागातर्फे आयोजित संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. रुपये चार लाख व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, पंचायत समितीच्या सभापती मनीषा शिंदे, उपसभापती शंकरराव शिंदे, सदस्य व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.

महालक्ष्मी मंदिरातील अतिक्रमण समस्येची सुनावणी पूर्ण

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील अतिक्रमण समस्येची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. पुरातत्त्वखाते व देवस्थान समितीचे म्हणणे आज ऐकून घेण्यात आले. आता या निकालाकडे भक्तगण व नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ – डोंगळे

दूध उत्पादक कर्मचाऱ्यांनी साथ दिल्यास ‘गोकुळ’ला पहिल्या क्रमांकावर नेऊ असा विश्वास ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी ९ लाख लिटर दूध संकलन कलश पूजन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. लवकरच ११ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचे उद्दीष्ट साध्य करू अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंच्या सोलापुरातील आजच्या सभेविषयी उत्सुकता

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा उद्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूरच्या नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून त्यासाठी मनसेचे १२ आमदार शहरात दाखल होऊन सभेच्या नियोजनाची सूत्रे ताब्यात घेतली आहेत. कोल्हापूर व खेडप्रमाणे सोलापूरच्या सभेसही उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून सभेची तयारी होत आहे

महिला श्रमिक शक्तीचा यलगार

केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातील कामगार आंदोलनात उतरले होते. गुरुवारी या आंदोलनात महिला श्रमिक शक्तीचा यलगार पाहायला मिळाला. मोलकरीण कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडीसेविका यासह विविध क्षेत्रांतील सुमारे पाच हजारांवर महिला कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुख्य मोर्चाने जात जोरदार निदर्शने केली. दरम्यान राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून बँकेसमोर निदर्शने केली. सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली.

तीन लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत रंगला माघी यात्रेचा सोहळा

तब्बल तीन लाख वारक ऱ्यांच्या उपस्थितीत पंढरीत आज माघी यात्रेचा सोहळा रंगला. वारक ऱ्यांच्या मोठय़ा उपस्थितीने दर्शन रांग गोपाळपूर पुणे रोडपर्यंत गेली होती. दुष्काळ, महागाई याच्या पाश्र्वभूमीवर यंदाच्या माघी यात्रेला वारक ऱ्यांची उपस्थिती लक्षणीय मानली जात आहे.

Just Now!
X