09 July 2020

News Flash

Ishita

सनईचे सूर निनादले

गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीच्या वर असलेल्या नगारखान्यातून पहाटेच्या वेळी निघणारे मंजूळ सूर बंद पडले होते. तेच सनई चौघडय़ाचे सूर भल्या पहाटे भक्त, नागरिक यांच्या कानी आता पडणार आहेत. अन् मंदिर परिसरात आजूबाजूस राहणाऱ्यांना या सुरेल सुमधुर सनई चौघडय़ाचे सूर कानी पडले.

खंडणीतून खूनप्रकरणी आरोपी पोलिसांच्या हाती

पंचवीस तोळे सोन्याच्या खंडणीसाठी खून करण्यात आलेल्या दर्शन रोहित शहा या शालेय विद्यार्थ्यांच्या खुनातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र या संदर्भातील तपशील अधिकृतरीत्या उद्या सोमवारी उघड केला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

इचलकरंजीतील रोटरी क्लब तर्फे व्यापार मेळ्याचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘रोटरी ट्रेड फेअर’चे १६ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. उत्पादक व ग्राहक यांच्यात सुसंवाद साधणारे गृहोपयोगी वस्तू, फर्निचर, अत्याधुनिक फोर व्हिलर्स यांचे भव्य प्रदर्शन व विक्री राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे भरविण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील यांनी दिली.

लाखो भाविकांच्या साक्षीने सिद्धेश्वर यात्रेत अक्षता सोहळा साजरा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी उशिरा सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साही आणि मंगलमय वातावरणात नंदीध्वजांचा ‘अक्षता सोहळा’ पार पडला. सुमारे साडेआठशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या या यात्रेत अक्षता सोहळा पार पडताच श्री सिद्धेश्वराच्या जयजयकाराने अवघे आसमंत दुमदुमून गेले.

फुटबॉल सामन्यात भारतीय महिला संघ विजयी

येथील शाहू स्टेडियमवर रविवारी झालेल्या प्रदर्शनिय फुटबॉल सामन्यात भारतीय महिला संघाने स्थानिक कोल्हापूर संघाचा १२ विरुध्द शून्य असा सहजरीत्या पराभव केला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व राहिले असले तरी स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय संघाविरुध्द लढत देण्याचा अनुभव मिळाला. आता १७ जानेवारीला हॉलंड व भारत यांच्यातील महिला संघात होणाऱ्या सामन्याकडे फुटबॉलप्रेमी करवीरकरांचे लक्ष वेधले आहे.

सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदी शहाजी पवार यांची निवड

भाजपच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे शहाजी पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी तथा पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की यांनी पवार यांच्या निवडीची घोषणा केली.

जयसिंगपूरच्या शाहू महोत्सवात यंदा नामवंत कलाकारांचा समावेश

जयसिंगपूर येथे होणाऱ्या यंदाच्या राजर्षी शाहू महोत्सवामध्ये हिंदी, मराठी चित्रपटातील नामांकित कलाकारांचा समावेश आहे. यावर्षीचा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार संगीतकार अजय-अतुल यांना तर राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार अभिनेत्री केतकी माटेगावकर यांना जाहीर झाला आहे. १९ व २० जानेवारीला दसरा चौक स्टेडियम मध्ये होणारा हा कार्यक्रम ‘लेक वाचवा अभियानाला’ समर्पित केला आहे, अशी माहिती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, शिरोळ तालुका सांस्कृतिक संघाचे संस्थापक मिलिंद शिंदे, पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टोलविरोधात शिरोली नाक्यावर धरणे आंदोलन

टोलविरोधातील महामोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त बुधवारी शिरोली नाक्यावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात छत्रपती शाहूमहाराज, खासदार सदाशिवराव मंडलिक, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पुढारीकार प्रतापसिंह जाधव, आमदार चंद्रदीप नरके, कॉ. गोविंद पानसरे, धनंजय महाडिक यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. जोरदार घोषणाबाजी करीत सुमारे तासाहून अधिक काळ आंदोलन सुरू राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.

शेतजमिनीच्या वादातून वृद्धाचा खून

शेतजमिनीच्या भाऊबंदकीच्या वादातून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. पुनाळ (ता.पन्हाळा) येथे चुलत भावांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये आनंदा गणपती पाटील (वय ७२) या व्यक्तीचा मृत्यू झाला

आम आदमी पार्टीची जिल्हा कार्यकारिणी स्थापन

अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यात विद्याधर दोशी व चंदूभाई देढिया यांच्यासह पंधराजणांचा समावेश करण्यात आला आहे. राजकीय पक्षांमध्ये असलेली प्रचलित पदे आम आदमी पार्टीत नसून केवळ कार्यकारिणी सदस्यांच्या सहभागातून पक्षाचे कार्य चालणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

सोलापूर विद्यापीठात डॉ. धनागरे यांचे व्याख्यान

सोलापूर विद्यापीठ व डॉ. अनंत व लता लाभसेटवार चॅरिटेबल ट्रस्ट (नागपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनंत व लता लाभसेटवार व्याख्यानमालेंतर्गत येत्या २४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सोलापूर विद्यापीठात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचे व्याख्यान आयोजिले आहे.

सांगोल्यात ९० लाखांचे सोने-चांदीचे दागिने जप्त

सांगोल्याजवळ सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून स्कॉर्पिओ गाडीतून सुमारे ९० लाख रुपये किमतीचे दीड किलो सोने व ८३ किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. गाडीतील तिघाजणांना रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील राहणारे आहेत.

सोलापुरात एकाच वेळी चार मोटारसायकलींच्या चोरी

शहरात एकाच वेळी चार मोटारसायकलींच्या चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. मोटारसायकलींच्या वाढत्या चोऱ्यांच्या गुन्हय़ांवर आळा घालण्याचे पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.

पालखी व झेंडा मिरवणुकीने सेवागिरी यात्रेस उत्साहात प्रारंभ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील ब्रम्हलीन तपोनिधी सिद्धहस्त योगी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या ६५व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेस श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंडय़ाच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. मिरवणुकीतील श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, ढोल-ताशा, लेझीम, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठय़ा भक्तिमय व उत्साही वातावरणात पुसेगावनगरी दुमदुमून गेली.

निर्वाचन क्षेत्रानुसार मतदार यादी प्रसिद्ध

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीसाठी निर्वाचन क्षेत्रानुसार मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ग्रामीण, लहान नागरी व मोठे नागरी या क्षेत्रांनुसार ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा हरकत, आक्षेप, चूक या संबंधाचा तपशील द्यावयाचा असेल तर त्यांनी १० जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरूपात म्हणणे सादर करावयाचे आहे, असे जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांनी कळविले आहे.

आवाडेंच्या निवडीमागे ज्येष्ठत्वाचा गौरव की पक्षबांधणी

राजकीय क्षेत्रातील मैत्र दुरावले तरी सहकारातील आपुलकी कायम राहिली. चार दशकांहून अधिक काळातील केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे संबंध हे असे कटूगोड राहिले. राजकारणाच्या पलीकडे पाहण्याचा पवार यांच्या गुणग्राहकतेचा परिचय म्हणूनच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी आवाडे यांच्या झालेल्या निवडीकडे पाहिले जाते.

विवाहितेच्या पार्थिवावर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या माहेरच्या लोकांनी तिच्या पतीच्या घरासमोर तिचे अंत्यसंस्कार केले.

महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ही ‘मोफत अन्नदान’ करीत असताना दरवर्षी प्रकाशित करीत असलेली दिनदर्शिका ही सर्व जनतेसाठी मार्गदर्शक ठरेल, असे उद्गार श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांनी येथे काढले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मधुरिमाराजे छत्रपती, हर्षदा मेवेकरी, विक्रम जरग, नगरसेवक बनछोडे व माजी महापौर हरिदास सोनवणे उपस्थित होते.

कोल्हापुरातील महाविद्यालयात आज जीन्स डे साजरा होणार

कोल्हापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या मंगळवारी ‘जीन्स डे’ साजरा करणार आहेत. नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण व स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या प्रकारांना महिलांचा पोशाख कारणीभूत आहे, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलली जावी, यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी उद्या जीन्सचा पेहराव करणार आहेत. ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.

पत्रकारांनी प्रामाणिक लिखाणातून जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा – विश्वास मेहेंदळे

प्र.के.अत्रे यांच्या उद्याच्या अग्रलेखात काय येणार याची त्यावेळच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला धास्ती असायची. अत्रे, जांभेकर, टिळकांच्या काळातील पत्रकारिता जाणून घ्या, आता तशी पत्रकारिता करता येणार नाही. परंतु, जनता हीच परमेश्वरस्वरूप असून, आपण या जनतेचे वकील आहोत हे विसरू नका. थोर पुरूषांच्या विचाराने पत्रकारिता करून देश पुढे न्या. सध्या जनतेचा न्यायालय अन् पत्रकारांवरच असलेला विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी केले

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेस १२ जानेवारीपासून प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची गेली साडेआठशे वर्षांपासूनची परंपरा लाभलेल्या यात्रेस येत्या १२ जानेवारी रोजी प्रारंभ होणार आहे. पाच दिवसांच्या या यात्रेत नंदीध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा, होमप्रदीपन, शोभेचे दारूकाम आदी कार्यक्रम होणार आहेत. या यात्रेत महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होणार आहेत. यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती सिध्देश्वर देवस्थान यात्रा समितीचे सभापती रुद्रेश माळगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाबळेश्वरमध्ये पारा घसरला

तीनचार दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून काल (रविवार) रात्री व आज सकाळी भल्या पहाटे येथील वेण्णा लेक परिसरात थंडीचा पारा भलताच खाली उरला होता.

टोलआकारणीविरोधात ९ जानेवारीला कोल्हापुरात महामोर्चा

कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर आयआरबी कंपनीकडून आकारणी केल्या जाणाऱ्या टोलविरोधात गतवर्षी ९ जानेवारीला काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय महामोर्चाची वर्षपूर्ती होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जिल्हय़ातील खासदार, आमदार, सर्वपक्षीय नेते, नागरिक, विद्यार्थी यांचे शिरोली टोलनाका येथे धरणे आंदोलन होणार आहे.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून बावीसशे कोटी मिळवण्याचे प्रयत्न- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडून २२०० कोटी रुपये मिळावेत, यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी सांगली जिल्हय़ातील दुष्काळ दौरा पाहणीवेळी व्यक्त केले. म्हैसाळ व ताकारी या पाणी योजना मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून आठवडय़ाभरात २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

Just Now!
X