09 July 2020

News Flash

Ishita

पत्रकारितेतील प्रांतवाद दूर करण्याची गरज- मोकाशी

पत्रकारितेमध्ये वाढत चाललेल्या इंग्रजी-मराठी, शहरी-ग्रामीण स्वरूपाच्या प्रांतवादाला दूर करणे आवश्यक बनले आहे. पत्रकारितेचा खरा धर्म ओळखून त्यादृष्टीने पत्रकारांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक व ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी रविवारी इचलकरंजी येथे केले.

सोलापूर-पुणे महामार्गाचे विकासकाम निकृष्ट दर्जाचे

सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम निकृष्ट पद्धतीने होत असल्याची तक्रार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

भामा-आसखेड धरणाचे पाणी सोलापूरला मिळणे सहज शक्य

सोलापूर जिल्हय़ासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी मिळविण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत असताना प्रत्यक्षात अलमट्टी धरणापेक्षा पुणे जिल्हय़ातील भामा-आसखेड धरणाचे पाणी सोलापूरसाठी मिळणे अधिक सहज सुलभ आहे. परंतु केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोष नको म्हणून त्याविषयी सत्ताधारी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.

सोलापूरचे भूमी अभिलेख कार्यालय आयएसओ नामांकनाच्या अंतिम टप्प्यात

भूमी अभिलेख विभागाच्या सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय आंतरराष्ट्रीय गुणवत्ता आयएसओ नामांकनाच्या अंतिम टप्प्यात असून, प्रथमच जनताभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने आयएसओ नामांकन मिळणारे हे राज्यातील पहिलेच कार्यालय ठरणार आहे.

उच्च शिक्षण संस्थांच्या स्थापनेतूनच छत्रपती शाहूमहाराजांचे खरे स्मारक

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज हे सच्चे शिक्षणप्रेमी असल्याने कोल्हापुरात आयआयएम, आयआयटी, ट्रीपल टी यांसारखी उच्च शिक्षण संस्था स्थापन करावी, यानिमित्ताने त्यांचे पुरोगामी शैक्षणिक धोरण पुढे राहण्याबरोबर जिवंत स्मारक आकारास येईल, अशा आशयाची मागणी शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या शाहूप्रेमींच्या बैठकीत करण्यात आली.

आमदार क्षीरसागरांसह पाच जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा

आमदार राजेश क्षीरसागर यांना धक्काबुक्की करणाऱ्यांना बेदम चोप दिल्याप्रकरणी आमदारांचे बंधू, चिरंजीव, स्विय सहायक व एक शिवसैनिक अशा चौघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आमदार क्षीरसागर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये बंधू संजय विनायक क्षीरसागर, मुलगा ऋतूराज क्षीरसागर, स्वीय सहायक राहुल बंदोडे व शिवसैनिक सुनील शामराव जाधव यांचा समावेश आहे.

स्त्रियांच्या भयमुक्ततेसाठी मानसिकता बदलणे आवश्यक’

समाजामध्ये स्त्रियांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी व त्यांचे पूर्णपणे सक्षमीकरण होण्यासाठी पुरुषांची व कुटुंबांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. लोंढे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

जिद्द, परिश्रमाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात ग्रामीण मुलांना संधी – पाटणकर

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुलांना नावलौकिकाची संधी आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कराडच्या डीलक्स क्लबचा अष्टपैलू खेळाडू ऋषिकेश राजेश पाटील याची महाराष्ट्राच्या वर्षांखालील क्रिकेट संघात झालेली निवड असल्याचे पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.

दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडे अधिकाऱ्यांनी आत्मीयतेने बघावे’

गलेलठ्ठ पगाराकडे आत्मीयतेने बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेकडेही तेवढय़ाच आत्मीयतेने बघावे, असा टोला लगावत राज्याचे ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शासनाकडूनही सोलापूर जिल्हय़ासाठी पुरेसा दुष्काळनिधी मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली.

जलसंकट कोसळले असतानाच लाखो लिटर पाण्याची गळती

सोलापूर शहरात महापालिकेच्या गलथान कारभारामुळे एकीकडे शहरवासीयांना जलसंकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे याच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात (पाणी गिरणी) पाण्याची गळती होऊन लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या समित्यांच्या निवडी जाहीर

कोल्हापूर महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.

कराडच्या इदगाह ट्रस्टने दिशाभूल थांबविण्याचे हिंदुत्ववाद्यांचे आवाहन

येथील इदगाह मैदान केवळ मुस्लिम समाजाच्या मालकीचे नाही, त्या जमिनीवर काही बलुतेदारांचाही अधिकार आहे. मात्र, ते न सांगता केवळ मुस्लिम कब्रस्तान असल्याचे सांगून सगळय़ांचीच दिशाभूल करण्याचा प्रकार इदगाह ट्रस्टच्या विश्वस्तांनी थांबवावा, असे आवाहन शिवसेना, भाजप, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती, शिवप्रतिष्ठानसह विविध संघटनांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

सुशीलकुमारांवरील चित्रपट प्रदर्शनासाठी धरणे आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रीतसर संमती दिल्यानंतरच आपण त्यांच्या जीवनावर ‘घे झेप पाखरा’ हा चित्रपट निर्माण केला. परंतु आता सुशीलकुमार शिंदे यांनी सुचविलेल्याप्रमाणे अनेक बदल करूनदेखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यास त्यांच्याकडून मान्यता मिळत नाही. त्यामुळे आपले मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करीत अभिनेते व दिग्दर्शक रमेश व्हटकर ऊर्फ रॉकसन यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

आजरा तहसील कार्यालय तहसीलदारांच्या प्रतीक्षेत

आजरा तहसील कार्यालय गेले तीन महिने तहसीलदारांविना कार्यरत आहे. यामुळे नागरिकांची कामे लक्षणीय प्रमाणात खोळंबली आहेत. या कार्यालयाला नवीन तहसीलदाराची तत्पर नेमणूक करावी, या मागणीसाठी शुक्रवारी आजरा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात मोर्चा

नवी दिल्लीतील पीडित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते.

सिनेनाटय़ कलावंतांनी पैशासाठी वाट्टेल ती कामे करू नयेत

नाटय़-चित्रपट क्षेत्रात काम करताना कलावंतांनी पैशासाठी वाट्टेल ती कामे करू नये. पैसा कमी पडलाच, तर स्वत:च्या गरजा कमी कराव्यात, असा सल्ला देत, माणूस म्हणून कलावंतांचे पाय अखेर जमिनीवरच असले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका आघाडीच्या अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी येथे मांडली.

पित्याच्या पार्थिवावर मुलींकडून अंत्यसंस्कार

पित्याच्या पार्थिवावर अग्निसंस्कार विधी दोघा मुलींनी केला. राज्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी होत असतांना इचलकरंजीतील सावित्रीच्या लेकींनी हे पुरोगामी कृतीचे पाऊल गुरूवारी टाकले.

फेरी विक्रेत्यांच्या प्रश्नावरून विरोधक, सत्तारूढ गटात वादावादी

इचलकरंजीतील फेरी विक्रेत्यांच्या प्रश्नावरून गुरुवारी इचलकरंजी नगरपालिकेत विरोधक व सत्तारूढ गटात वादावादी झाली. तर मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात फेरी विक्रेत्यांनी गोंधळ घातल्याने मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना गोंधळावर ताबा घालण्यास सुनावले. सुमारे चार तास वादावादीचे चित्र कायम असूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने छोटे व्यापारी व फेरी विक्रेत्यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.

आम आदमी पार्टीचे श्रेष्ठी उद्या सोलापुरात

अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक-सदस्य डॉ. गिरधर पाटील (जळगाव), गजानन खातू (मुंबई) व किरण उपकारे (अहमदनगर) ही श्रेष्ठ मंडळी येत्या शनिवारी, ५ जानेवारी रोजी सोलापूरच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शनिवारी दुपारी तीन वाजता सरस्वती चौकातील पक्षाचे संस्थापक-सदस्य विद्याधर दोशी यांच्या ‘जीवनतारा’ बंगल्यात आयोजित करण्यात आली आहे.

यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या संचालकपदी डॉ. एस. एस. चौगुले

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय संचालकपदी डॉ. एस. एस.चौगुले यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी १ जानेवारी रोजी कार्यभार स्वीकारला. मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेत प्राध्यापक आणि संचालकपदाचा कार्यभार त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे सांभाळला आहे.

पाण्याचे नियोजन असूनही कार्यवाही नसल्याने सोलापूरवर जलसंकट

सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहराची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी धोक्यात आली असून, यात अखेरच्या क्षणी ‘तहान लागली म्हणून विहीर खोदण्याचा’ प्रयत्न महापालिका प्रशासनाने चालविल्याचे दिसून येते. शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी उजनी धरणातील पाणीसाठा राखून ठेवला असून हे पाणी केव्हा सोडायचे याचे नियोजनही झाले आहे.

पंचगंगा प्रदूषणप्रकरणी अहवाल दोन दिवसांत

हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदी व पाणी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटकांची तपासणी करण्यासाठी चार पथके रवाना झाली आहेत. या पथकांचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.

माळढोक प्रश्नावर पालकमंत्र्यांसह प्रशासनाने संभ्रम दूर करावा

सावकर समितीच्या शिफारशींनुसार माळढोक पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२२२ चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित करण्याचा निवाडा दिला. या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर या चार तालुक्यांच्या ३८३ गावांतील हजारो शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. या प्रश्नावर सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे व प्रशासनाने शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी माळढोक अभयारण्य विरोधी कृती समितीने केली आहे.

धूम स्टाईलने गंठण लांबवले

कोरोची (ता. हातकणंगले) येथील महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण धूम स्टाईलने चोरटय़ांनी बुधवारी लांबवले. सायंकाळी गजबजलेल्या इचलकरंजी शहरातील शाहू कॉर्नर परिसरात ही घटना घडली.

Just Now!
X