09 July 2020

News Flash

Ishita

उजनीने गाठला तळ

सोलापूर जिल्ह्य़ाची भाग्यदायिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी वितरण नियोजनबाह्य़ पद्धतीने होत असून त्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी गाजत असताना व एकूणच या धरणातील पाण्याचा मुद्दा संवेदनशील बनला असताना, सध्या या धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे.

सखी मंडळाचा सोलापुरात द्विवार्षिक आंतरभारती मेळावा

सखी मंडळाच्या वतीने येत्या ५ व ६ जानेवारी रोजी आंतरभारती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू ते इंदूपर्यंत विस्तारलेल्या सर्व शाखांतून दर दोन वर्षांनी सखी मंडळाचा मेळावा घेतला जातो. यंदा २२ वर्षांनंतर हा मान सोलापूरला मिळाला आहे.

डी.के.टी.ई. आणि तैवान विद्यापीठात सामंजस्य करार

डी.के.टी.ई. सोसायटी या टेक्स्टाइल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट व चिनकुओ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, तैवान यांच्यात परस्पर सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत दोन्ही संस्थेमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम चालविणे, दरवर्षी येथील चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह तैवान येथे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी अशा विविध बाबींचा समावेश असणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व डीकेटीई इन्स्टिटय़ूटचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.कडोले यांनी दिली.

काँग्रेस आघाडी दिल्या शब्दाला जागेल?

काँग्रेस आघाडीने अगदी सहजगत्या परिवर्तन घडवून आणले. मात्र आता खरंचच नगर विकास हाच ध्यास राहील की नाही, हे आगामी काळातच दिसेल.

राष्ट्रवादीचे आमदार गावात आक्रमक; अजित पवारांपुढे मात्र सपशेल नांगी..

सोलापूर जिल्हय़ात यंदा कडाक्याच्या थंडीतही पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून, संपूर्ण जिल्हय़ासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याच्या मागणीवर जिल्हय़ातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर आक्रमक होतात. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ब्र न काढता अक्षरश: नांगी टाकतात, असे चित्र दिसून येते.

‘लगान’ची निर्मिती कोल्हापूरच्या मातीच्या गुणामुळेच- गोवारीकर

भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर यांसारख्या दिग्गजांनी ऐतिहासिक पाश्र्वभूमीचे चित्रपट निर्माण केले. कोल्हापूरच्या या मातीचा गुण म्हणूनच माझ्याकडून ‘लगान’सारख्या चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपट महोत्सवातून देश-विदेशातील उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटविषयक जाणीव समृद्ध होते. कोल्हापुरात अतिशय दर्जेदार असा चित्रपट महोत्सव झाला असून, यामुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतामध्ये लौकिक निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी गुरुवारी व्यक्त केले

तिसऱ्या अ. भा. अपंग साहित्य संमेलनाचे कराडात आज उद्घाटन

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सप्तपदी मंगल कार्यालय विटा रोड, कराड येथे उद्या शनिवार (दि. २९) व रविवार (दि. ३०) या दोन दिवसांमध्ये आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते होणार आहे.

पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळा

पंढरपूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे उद्या शनिवारी पंढरपूरला येत आहेत.

विषारी रसायन निर्मिती कारखान्याच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा

निसर्ग संपन्न आणि इको सेन्सीटीव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या एव्हीएच या विषारी रसायनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या विरोधात शुक्रवारी तालुक्यातील सर्व पक्षीय नागरिकांचा प्रक्षोभ उसळून आला. कारखाने निमिर्तीस विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला असता संतप्त आंदोलकांनी कार्यालयाची प्रचंड नासधूस केली.

पोलिसाच्या कन्येचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक

पोलिस कन्येचे लैंगिक शोषण करणारा निलंबित कॉन्स्टेबल कृष्णात पांडुरंग कांबळे (वय २२ रा. कागल) याला शुक्रवारी तब्बल १३ दिवसानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ३१ डिसेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

आजपासून २७वी शैक्षणिक परिषद

महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनाची २७वी शैक्षणिक परिषद येथील शिवाजी विद्यापीठ परिसरात दि.२८, २९ व ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान तब्बल १७ वर्षांनी कोल्हापूरला मिळाला असून, या निमित्ताने १ हजारापेक्षा अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित राहणार आहेत.

दावल मलिक ऊर्सनिमित्त आज बोरामणीत जत्रा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीचे ग्रामदैवत हजरत दावल मलिकसाहेबांच्या ऊर्स महोत्सवाला प्रारंभ झाला असून, उद्या शुक्रवारी ऊर्समधील ‘चिरागा’ (दीपोत्सव) हा मुख्य कार्यक्रम आहे. त्यानिमित्त दर्गाह परिसरात जत्रा भरणार आहे.

राष्ट्रीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक

वसई-विरार महापालिकेने पुरस्कृत केलेल्या ५८ व्या राष्ट्रीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्राने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक मिळविले. या संघात कोल्हापूरच्या विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या अनिश गांधीचा समावेश होता. विरार येथील न्यू विवा ठाकूर कॉलेज मध्ये झालेल्या या स्पर्धेत १४, १७ व १९वर्षांखालील मुले व मुली अशा ६ गटात स्पर्धा घेण्यात येऊन सर्व गटात मिळून २१ राज्यांतून जवळजवळ ६०० बुध्दिबळपटू सहभागी झाले होते.

विजेच्या धक्क्य़ाने पिता-पुत्राचा मृत्यू

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ही दुर्घटना घडली. शेजारच्या शेतक ऱ्याने त्याच्या शेताच्या बांधावर तारेच्या साह्य़ाने विद्युत प्रवाह सोडला होता. रात्रीच्यावेळी शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या दोघा पिता-पुत्राला मात्र त्यामुळे जीव गमवावा लागला.

पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त उद्या संगीत महोत्सव

जयपूर-अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे संगीत महोत्सव शनिवारी (दि. २९) सायंकाळी केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित केला आहे. या मैफलीत पद्मश्री पं. उल्हास कशाळकर व डॉ. भारती वैशंपायन आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती पं. निवृत्तीबुवा सरनाईक संगीत महोत्सव समितीचे सदस्य विनोद डिग्रजकर व राजेंद्र सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नैसर्गिकपणे वाढणा-या रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त

‘आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाज्या, पण आजकाल भाज्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांचा, विषारी कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जात आहे. अशा भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहेत. म्हणूनच आपल्या अवतीभोवती नैसर्गिकपणे वाढणाऱ्या रानभाज्या, निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील,’ असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांनी केले.

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई शाखा व प्रतापगड उत्सव समिती आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ व ठोस कायद्यांच्या मागणीसाठी शहरातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

यंत्रमाग कामगार-मालक संघटनेची बैठक तहकूब

नवीन वर्षांसाठी कामगार संघटना आणि यंत्रमाग मालक संघटना यांच्यामधील नवीन करार करण्यासंदर्भात कामगार सहआयुक्त आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र प्रथम प्रस्ताव कोण देणार, यावरच ही बैठक तहकूब करण्यात आली. करारासंदर्भात बैठक २९ तारखेला कामगार सहआयुक्त आयुक्त कार्यालयात होणार आहे.

पत्रकार महादेव वेदपाठक यांचे निधन

मंगळवेढय़ातील ज्येष्ठ पत्रकार महादेव वामन वेदपाठक (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, दोन कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवेढय़ाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार दयानंद वेदपाठक यांचे ते वडील होत.

‘पंढरपूर अर्बन’च्या शताब्दी महोत्सवाची शनिवारी सांगता

पंढरपूर शहर तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेने शताब्दी पूर्ण केली असून बँकेच्या नवी पेठ येथील नूतनीकरण केलेल्या इमारतीचे अन् वर्षभर विविध उपक्रम राबवलेल्या कार्यक्रमाचा समारोप २९ डिसेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हस्ते होत आहे.

सोलापुरातील २७ सहकारी संस्थांचा उद्या सन्मान सोहळा

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षांची सांगता होत असल्याचे औचित्य साधून सोलापूरचा सहकार विभाग व सिंहगड बिझनेस स्कूलच्या वतीने सोलापूर जिल्ह्य़ातील उल्लेखनीय अशा २७ सहकारी संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पुणे रस्त्यावरील केगाव येथे सिंहगड बिझनेस स्कूलमध्ये हा सन्मान सोहळा आयोजिला आहे.

खेळाडू, क्रीडा संघटकांना रमा-जगदीश क्रीडा पुरस्कार

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पाच खेळाडूंना रमा-जगदीश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदित्य अनिल गिराम, अबोली अजितकुमार संगवे, ओंकार राजेश काळे, सोनिया नितीन देशमुख व नीहार निर्मलप्रसाद कुलकर्णी हे पुरस्काराचे मानकरी ठरले

दर्पण पुरस्कारांचे ६ जानेवारीला पोंभुर्ले येथे समारंभपूर्वक वितरण

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवर प्रतिष्ठेच्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या गावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात येत्या ६ जानेवारी २०१३ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धिपत्रकाने दिली आहे.

कोल्हापूरच्या पॅरालिम्पिक खेळाडूंना ‘साफल्य’ पुरस्कार

कामगार नेते बाळासाहेब मुनिश्वर व स्थल सेवा सुभेदार मोहन मुरलीधर आवळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थनिमित्त महाराष्ट्र स्टेट पॅरालिम्पिक असोसिएशनच्या वतीने ‘साफल्य’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० व २०११ या वर्षांसाठी कोल्हापूरच्या पॅरालिम्पिक खेळाडूंना हा मान मिळाला.

Just Now!
X