12 July 2020

News Flash

Ishita

माजी सैनिकांनी संघटित व्हावे – झरे

सैन्यदलातील जवान हे सेवानिवृत्त झाले तरी ते जवानच आहेत. त्यामुळे त्यांना समाजात चांगली वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांची ताकद मोठी आहे. मात्र, ते विखुरलेल्या स्थितीत असल्याने त्यांची ताकद कळून येत नाही. सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक एकत्र आल्यास त्यांचा एक दबदबा निर्माण होईल. त्यामुळे शासकीय आणि खासगी कोणतेही काम सहज होऊन जाईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर भानुदास झरे यांनी सांगितले.

लोकवस्ती नसलेल्या भागात पिण्याच्या पाण्यासाठी वाहिनी

जुळे सोलापूर किंवा मजरेवाडीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पिण्याच्या पाण्याची पुरेशा प्रमाणात सुविधा अद्याप झाली नसताना महापालिका स्थायी समितीने त्याकडे लक्ष देऊन सुविधा पुरविण्याऐवजी लोकवस्तीच नसलेल्या भागात जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात संबंधित जमीनमालकाला श्रीमंत करण्याचा हेतू दिसत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.

सहकार महर्षी कारखान्याचा सर्वाधिक गाळपाचा उच्चांक

निरा खोऱ्याबरोबरच राज्यातील सर्व मोठय़ा साखर कारखान्यात अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करून उच्चांक केला आहे.

भारताला ज्ञानशक्तीची लढाई करावी लागणार – निगवेकर

भारताला यापुढे ज्ञानशक्तीची मोठी लढाई करावी लागणार आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षण, राजेशाही, नोकरशाही आणि समाज यांचा संगम घडवून आणला आहे. त्यांनीही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. पुरस्काराच्या रूपाने त्यांना ज्ञानाची तलवार मिळाली आहे.

सोलापूरचा सोनांकुर कत्तलखाना तातडीने बंद करण्याची मागणी

सोलापुराजवळ मुळेगाव तांडय़ात कार्यरत असलेल्या सोनांकुर एक्स्पोर्ट प्रा. लि. या खासगी कत्तलखान्यामुळे दरुगधीयुक्त वायू व जलप्रदूषण निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप

कुर्डूवाडी येथील एका ५५ वर्षांच्या महिलेचा शेतजमिनीच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी भरलेल्या खटल्यात तानाजी मारुती कोळेकर (वय २३, रा. आवार पिंपरी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यास सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर दुय्यम निबंधक कालिदास अभंग यांच्यासह पाचजणांना निर्दोष मुक्त ठरविले.

जागतिक दर्जाची विद्यापीठे तयार करण्याची गरज- माशेलकर

शिक्षणामुळेच देश घडत असतो. ज्या देशाला शिक्षण नाही त्या देशाला भविष्य नाही, असे सांगून आपल्याला जागतिक कसोटीवर उतरणारी विद्यापीठे तयार करायची आहेत, असे उद्गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

कोल्हापूर गोळीबार प्रकरणातील दोघांना पोलिस कोठडी

महाविद्यालयीन वर्चस्वातून गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींना रविवारी न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. युद्धवीर मानसिंग गायकवाड (वय १८, रा. ताराबाई पार्क) व उत्कर्ष उदयशंकर घाटगे (वय १८, रा. उत्तरेश्वर पेठ) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना शनिवारी रात्री बेळगाव येथे अटक करण्यात आली.

अल्पसंख्याकांच्या गारमेंट संस्थेच्या मालमत्तेवर पालकमंत्र्यांचा डोळा

सोलापुरातील अल्पसंख्याक समाजाच्या औद्योगिक विकासासाठी उभारण्यात आलेल्या भारत गारमेंट सहकारी संस्थेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार व फसवणूप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष शफी इनामदार यांच्यासह सर्व संचालकांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरी अद्याप पोलिसांनी इनामदार यांच्यासह कोणालाही अटक केली नाही. उलट, दोषी संचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वादातून कोल्हापुरात गोळीबार

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंच्या वादातून शुक्रवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रसाद सुजित चव्हाण याच्या दिशेने मोटारीवर गोळीबार करण्यात आला. मात्र गोळ्या त्याच्या मोटारीस लागल्या. हा प्रकार युद्धवीर मानसिंग गायकवाड याच्याकडून घडला.

टोलच्या विरोधात तरूणाई आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

राज्य शासन व आयआरबी कंपनीने टोल आकारणीच्या हालचाली गतिमान केल्या असतांना टोलविरोधात शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून टोल आकारणीस विरोध दर्शविला.

यंत्रमागास सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याबाबत बैठक

यंत्रमागास सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याबाबत लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिले. याबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी विनियोजन विधेयकाच्या माध्यमातून विचारणा केली होती. शासनाने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांच्या दरम्यान ज्या विभागांवर चर्चा झाली नाही, अशा विभागावरील हरकतीचे मुद्दे आमदार हाळवणकर यांनी विनियोजन विधेयकाच्या माध्यमातून सादर केले होते.

कोल्हापुरात दोन बागा भाडे तत्त्वावर देण्याचे प्रयोजन

कोल्हापूर शहरामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अगोदरच उद्याने, बगिचे कमी असताना, नवीन बगिचा उभा करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसताना अस्तित्वात असलेल्या दोन बागा भाडे तत्त्वावर देण्याचे प्रयोजन सुरू आहे. यापूर्वीचे अनुभव लक्षात घेता या बगिच्यांचे रूपांतर ठेकेदारांच्या खाजगी मालमत्तेमध्ये अॅडव्हर्टाइजचे ठिकाण, व्यापारीकरणाचा अड्डा, लग्न व तत्सम समारंभासाठी लॉनमध्ये मेजवान्या व पाटर्य़ा झोडण्यासाठी तर होणार नाही ना? अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे.

द्रविड हायस्कूल शताब्दी महोत्सव समारंभ उद्या

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूलचा शताब्दी महोत्सवाचा मुख्य समारंभ शनिवारी (दि. २२) पद्मभूषण रघुनाथ माशेलकर व पद्मश्री लिला पुनावाला यांच्या उपस्थितीत होणार आहे.

बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे ३६ दिवसात विक्रमी ऊस गाळप

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याने चालू गळीत हंगामातील ३६ दिवसात २०५० मेट्रीक टन उसाचे उच्चांकी गळीत केले आहे. गाळप क्षमतेच्या १६४ टक्क्याने हे ३६ दिवसातील विक्रमी गाळप आहे. जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन २५०० रुपयांप्रमाणे पहिली उचल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित सर्व शाखांमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर वर्ग केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

दत्त शेतकरी कारखान्यास ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार

शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास बुधवारी राष्ट्रीय पातळीवरील उच्च साखर उतारा गटातील ऊसविकासाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री के. व्ही. थॉमस यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. सा. रे. पाटील व मुख्य शेती अधिकारी एम. आर. कोरिया, स्वीय सहायक अशोक शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड बुधवारी करण्यात आली. महासंघाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन त्यामध्येही निवड करण्यात आली. हुपरी (ता.हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे आवाडे हे संस्थापक अध्यक्ष आहेत. इचलकरंजी शहराला राष्ट्रीय पातळीवरील प्रथमच असा बहुमान मिळाल्याने शहरातील विविध संघटना, संस्था आणि कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आजषबाजी करून निवडीचा आनंद व्यक्त केला.

अर्थकारणावर आधारित शिक्षणामुळे माणूस अस्तित्व हरवतोय-भय्यू महाराज

माणसात एवढे सामथ्र्य आहे की, देवही त्याला गुरू मानतात, याची उदाहरणे आहेत. दगडातून माणूसपण, देवपण निर्माण करण्याची ताकद असलेला माणूस मात्र,अलीकडे स्वत:च दगड बनत चालला आहे. तो केवळ पोटासाठी जगत असल्याची खंत व्यक्त करताना, सात्त्विक जीवनासाठी माणसांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असून, ती ताकद कीर्तन, प्रवचनात असल्याचे राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख ऊर्फ भय्यूजी महाराज यांनी सांगितले.

खासगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांबाबत मंत्र्यांचे आश्वासन

खासगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत दिले असल्याचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पर्धेचे वडणगेत आयोजन

ग्रामीण भागात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पर्धा आयोजित करून त्या यशस्वी करण्याचा मान वडणगे(ता.करवीर) येथील जयकिसान तरूण मंडळाने पटकाविला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या ६० किलोखालील मॅटवरील कबड्डी स्पर्धेत सडोली येथील शाहू क्रीडा मंडळाने विजेतेपद मिळविले. तर, यजमान जयकिसान क्रीडा मंडळास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

भारनियमनमुक्तीचे राज्यकर्त्यांचे दावे खोटे- होगाडे

राज्य भारनियमन मुक्त करण्याचे राज्यकर्त्यांचे दावे पूर्णपणे खोटे आणि फसवे आहेत. विजेची गळती व वीज बिलांच्या थकबाकीचे मुद्दे सांगून भारनियमन मुक्त राज्य करण्यास अपयशी ठरलेली महावितरण कंपनी अपयशावर पांघरून घालण्यासाठी ग्राहकांवर खापर फोडत आहे, असा आरोप महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

पाणीउपसा बंदी मागे घेण्यास शिवसेनेने भाग पाडले

चिकोत्रा धरणातील पाणीउपसा बंदीचा निर्णय पाटबंधारे विभागास मागे घेण्यास शुक्रवारी शिवसेनेने भाग पाडले. शिवसेनेच्यावतीने पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे रास्तारोको आंदोलन केले.

नृसिंहवाडीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणार – सतेज पाटील

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी श्री क्षेत्र नृसिंहवाडी (ता.शिरोळ) शनिवारी बोलतांना केले.

तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

समाधीपूजन, कार्यकर्त्यांनी गावागावांतून प्रेरणा ज्योतीसह सद्भावना दौडने येऊन वाहिलेली आदरांजली आणि विविध उपक्रमांनी येथील श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचा स्मृतिदिन संपन्न झाला.
सहकार रत्न तात्यासाहेब कोरे यांच्या १८ व्या स्मृतिदिनी वारणा समूहाचेअध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते समाधीचे विधिवत पूजन झाल्यानंतर वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फुलांनी आकर्षकरित्या सजविलेल्या समाधीस्थळी येऊन श्रध्दांजली वाहिली.

Just Now!
X