06 August 2020

News Flash

Ishita

पंचगंगेच्या प्रदूषणावर व्यापक बैठक घेण्याचा निर्णय

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कोल्हापूर महानगरपालिका कितपत जबाबदार आहे हे सत्य आता सामोरे आले असून लोकांच्या जिवाचा खेळ मांडणाऱ्या नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्वच घटकांच्या विरोधात शासनाने ठोस कारवाईची पाऊले उचलावीत, अशी मागणी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजाराम माने व प्रदूषण नियंत्रण मंडळांचे प्रादेशिक अधिकारी सु. सं डोके यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत केली आहे.

वेण्णा लेक परिसरात गोठले दवबिंदूचे मोती

गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून वेण्णालेकवर नौकाविहारासाठी बांधलेल्या जेटींवर दवबिंदू गोठून हिमकण तयार झालेले दिसत होते. यंदाच्या मोसमात प्रथमच हिमकण पाहायला मिळाले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारी महाबळेश्वर येथे १३.३ अंश सेल्सियस व शुक्रवारी १४.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. वेण्णालेक परिसरात मात्र तापमान आणखी कमी होते.

विविध सामाजिक उपक्रमाद्वारे पित्याची एकसष्ठी साजरी करण्याचा उपक्रम

सामाजिक युवक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी आपले वडील धनराज नागणसुरे यांच्या एकसष्ठीनिमित्त उद्या, शुक्रवारपासून १८ डिसेंबपर्यंत पाच दिवस विविध शैक्षणिक, आध्यात्मिक व्याख्यानमाला, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथ वाटप, धान्य तुलाभार व हास्यधारा आदी भरगच्च कार्यक्रम आयोजिले आहेत.

प्रसिध्द कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मोहन कंटक यांचे निधन

प्रसिध्द कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मोहन मंगेशराव कंटक (वय ६५) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. कंटक यांच्या पत्नी व तिन्ही मुलीही डॉक्टर असून, त्या पुणे येथे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. डॉ. मोहन कंटक यांच्यावर कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापुरात उद्यापासून तीन दिवस ‘विजयाबाई आणि आपण’ महोत्सव

ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़दिग्दर्शक लेखिका ‘विजया मेहता आणि आपण’ महोत्सव येत्या १३, १४ व १५ डिसेंबर रोजी सोलापूरच्या हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्वत: विजया मेहता यांचा सहभाग राहणार असून यात विविध भरगच्च कार्यक्रम सादर होणार असून ही सोलापूरच्या नाटय़रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

धनगर समाजाचे टक्कर मोर्चाचे आयोजन

धनगर समाजाचा अनुसूचित जातीजमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी १९ डिसेंबर रोजी लाखो धनगर नागपूर अधिवेशनात टक्कर मोर्चाचे आयोजन केल्याचे धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.

राज्य सहकारी बँकेची थकबाकीदारांसाठी योजना

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे थकबाकीदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी ‘राज्य बँक अनुत्पादित वर्गवारीमधील कर्जासाठी सामोपचार परतफेड योजना-२०१२’ संमत करण्यात आली असून या योजनेव्दारे थकीत कर्जदारांच्या पुस्तकी येणे बाकी व व्याज यामध्ये धोरणातील वर्गवारीनुसार राज्य बँक सूट देणार आहे.

सोलापूर एसटीतर्फे अष्टविनायकासह काशी-गंगासागर सहलीचे आयोजन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराच्या वतीने यंदा अंगारकीनिमित्त शास्त्रोक्त पध्दतीने अष्टविनायक दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय काशी-गंगासागर-पशुपतिनाथासह गया दर्शन सहलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

एड्सबाधितांचा आधार बनण्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण व्हावी’

भारतासह संपूर्ण जगभरात होत असलेला एड्स रोगाचा प्रसार चिंताजनक असून एड्स बाधितांचा आधार बनण्यासाठी सामूहिक इच्छाशक्ती निर्माण होणे अपेक्षित आहे, असे मत स्नेहालय संस्थेच्या सचिवा ब्रह्मकुमारी प्रमिलाबेन जाधव यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपतींच्या सोलापूर-पंढरपूर संभाव्य दौऱ्यासाठी आढावा बैठक

येत्या २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सोलापूरच्या संभाव्य दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी आयोजिलेल्या एका आढावा बैठकीत या दौऱ्याशी निगडित संबंधित विभागप्रमुखांवर आपापली जबाबदारी गांभीर्याने व चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी दिल्या.

कोल्हापुरात कामगार मेळाव्याचे १२ डिसेंबर रोजी आयोजन

कोल्हापूर ११ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्त कामगार कृती समिती स्थापन केली असून, या समितीच्या वतीने १२ डिसेंबर रोजी दैवज्ञ बोर्डिग येथे सायंकाळी ५ वाजता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

अनुभवातून व्यक्त झालेले लेखन महत्त्वाचे – डॉ. दाभोळकर

जीवनाला समृद्ध करणारे अनुभव हे साहित्यात उतरणे गरजेचे आहे. अशा अनुभवातून व्यक्त झालेले लेखन हे समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केले.

पै. संदीप वाळकुंजे यांनी दाखवले पै. जितेंद्र कदम यांना अस्मान

मोतीबाग तालीम कोल्हापूरचा मल्ल पै. संदीप वाळकुंजे याने बाराव्या मिनिटातच एकलंगी डावावर न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर पै. जितेंद्र कदम यास अस्मान दाखविले. श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरसानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडले.

बोगस अर्ज भरणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी

इचलकरंजी शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या निविदेवेळी बोगस अर्ज भरणाऱ्यांची पोलिसांमार्फत चौकशी करुन दोषींवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी आरोग्य समितीचे सभापती जहाँगीर पटेकरी यांनी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी उपमुख्याधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भुईंजच्या सरपंचपदी बाळासाहेब कांबळे; तर उपसरपंचपदी अनुराधा भोसले

भुईंज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाळासाहेब कांबळे, तर उपसरपंचपदी अनुराधा भोसले यांची बिनविरोध निवड झाली.

सात कर्तृत्ववान महिलांना शरद प्रतिष्ठानचा पुरस्कार

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूरच्या शरद प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे शरद पुरस्कार यंदा संघर्षमय व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कार्यकर्तृत्व गाजविलेल्या सात महिलांना जाहीर झाला आहे.

‘विजय दिवस’ यंदा २० ते २३ डिसेंबरला

भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या बांगलादेश युद्धातील निर्णायक विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेले एक तप कराडच्या शिवाजी स्टेडियमवर यशस्वी रीत्या भरविण्यात येणारा विजय दिवस समारोह १४ ते १७ डिसेंबर ऐवजी यंदा २० ते २३ डिसेंबर या कालावधीत परंपरेनुसार भरगच्च कार्यक्रमाने साजरा होत आहे.

करमाळा कृषी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी बागल गटाने कंबर कसली

करमाळा कृषी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून बाजार समितीच्या १९ संचालकांच्या जागांपैकी पणन मतदारसंघाची एक जागा वगळता उर्वरित १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या बाजार समितीवर काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप गटाची अबाधित सत्ता आहे.

यशवंतरावांचे विचार राष्ट्र विकासास आजही प्रेरणादायी – अभ्यंकर

यशवंतराव चव्हाण हे आजच्या पिढीला समाजसेवेचा खरा आदर्श असून, त्यांचे विचार देशाला तारणारे आहेत. संरक्षण मंत्रिपदाची धुरा त्यांनी सांभाळली म्हणून देश मोठय़ा अडचणीतून सहीसलामत बाहेर आला. महाराष्ट्राची निर्मिती करणारा स्वच्छ चारित्र्याचा हा नेता राष्ट्र विकासासाठी आजही प्रेरणादयी ठरला असल्याचा गुणगौरव करताना, यशवंतरावांच्या साहित्य प्रेमाचे अनुकरण आजच्या विद्यार्थ्यांनी करावे अशी अपेक्षा निवृत्त नौसेना अधिकारी विनायकराव अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापूरला २० डिसेंबरपासून

चालू वर्षीचा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २० ते २७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या वतीने देण्यात आली.

छात्रसेना दिनानिमित्त जनजागरण फेरी

राष्ट्रीय छात्रसेना दिनानिमित्त कोल्हापूर गट मुख्यालयातर्फे आयोजित विविध उपक्रमांची सांगता मंगळवारी सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.ने संयोजन केलेल्या छात्रसैनिकांच्या जनजागरण फेरीने झाली. या फेरीत छात्रसैनिकांनी उत्साही सहभाग नोंदविला. या फेरीमध्ये कॉमर्स, राजाराम, महावीर, शहाजी, गोखले, न्यू, के.एम.सी. कॉलेजचे विद्यार्थी व विविध महाविद्यालयांतील शाळांचे एकूण ७०० छात्रसैनिक उपस्थित होते.

‘वाईमध्ये शैक्षणिक विश्व उभारावे’

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने वाई परिसरात मोठे शैक्षणिक विश्व उभारावे. या परिसरात शिक्षणाला पोषक वातावरण आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

यावर्षी राष्ट्रीय पर्यावरण जागृती महिना देशभर साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सामाजिक वनीकरण, कोल्हापूर (हरितसेना), निसर्गमित्र, जीवनमुक्ती व पर्यावरणप्रेमी संस्थेतर्फे ‘सह्य़ाद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

आठवे जलसाहित्य संमेलन १९, २० जानेवारीला कोल्हापूरमध्ये

भारतीय जलसंस्कृती मंडळामार्फत आठवे जलसाहित्य संमेलन कोल्हापूर येथे १९ व २० जानेवारी, २०१३ रोजी दहा विभागांत घेण्यात येणार आहे. संमेलनासाठी देशातील ५०० जलसाहित्याचे लेखक, अभ्यासक, निरनिराळ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, संमेलन पूर्णपर्ण शैक्षणिक आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल जगदाळे यांनी दिली आहे.

Just Now!
X