07 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

‘मराठी रीडर’ अ‍ॅपला वाचकांकडून वाढता प्रतिसाद

मराठी रीडरवरील एका वाचकाने गेल्या तीन आठवडय़ांत १२ ते १४ पुस्तके डाऊनलोड केली

राहा फिट : कॅफीन आणि बरंच काही..

तरतरी आणणारे हे कॅफीन ताणतणाव आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकते.

बाजारगप्पा :  तांबा-पितळय़ाचा ४०० वर्षांचा इतिहास

भट्टीत तांबे वितळवून त्याच्या पट्टय़ा पाडल्या जात आणि त्या पट्टय़ा जोडून भांडी तयार केली जात असे.

बाइकरॅलीसाठी माणशी १५०० रुपये अन् टाकी फुल्ल!

निवडणुकांच्या काळात दर वेळी पक्षाकडून बाइकरॅलीचे आयोजन केले जाते.

निश्चलनीकरणाने मारले, निवडणूक आयोगाने तारले!

या निवडणुकीत समाजमाध्यमांवरील प्रचाराला अधिक पसंती दिली जात आहे.

राहा फिट : योगासने

लोम-विलोम नाडीशोधन किंवा नाडीशुद्धी प्राणायाम असेही म्हटले जाते.

रक्ताचे नाते!

माणसांमध्ये शरीराच्या वजनाच्या प्रमाणात आठ टक्क्यांएवढे रक्त असते.

सेवा शुल्क आकारणाऱ्या हॉटेलांवर बहिष्कार !

ऑनलाइन सर्वेक्षणात सेवा शुल्क आकारणीस ९३ टक्के ग्राहकांचा विरोध

समाजाच्या पुरुषी मानसिकतेला स्त्री चळवळीने उत्तर

women movement against men mentality
women movement, men mentality
समाजाच्या पुरुषी मानसिकतेला स्त्री चळवळीने उत्तर
बंगळुरूच्या घटनेनंतर ‘आय विल गो आऊट!’चा आवाज अधिक बुलंद
मीनल गांगुर्डे, मुंबई
बंगळुरूमधील नववर्ष स्वागताच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या तरुणीवर ओढवलेला अतिप्रसंग आणि त्यानंतर या मुलीच्याच चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणारी समाजाची पुरुषी मानसिकता यांना चोख उत्तर देण्यासाठी देशभर एक नवी चळवळ निर्माण झाली आहे. महिलांच्या मुक्त भटकंतीचा आग्रह धरणाऱ्या ‘आय विल गो आऊट!’ या चळवळीच्या माध्यमातून देशात नवीन आंदोलन उभे राहत असून येत्या ८ मार्च रोजी याबाबतचा अहवाल केंद्र व राज्य सरकारांना सादर करण्यात येणार आहे.
या किंवा या प्रकारच्या घटनांनंतर अनेकदा मुलींच्या रात्री-अपरात्री फिरण्याबाबत, त्यांच्या पेहरावाबाबत प्रश्न उपस्थित करून मूळ प्रश्नाला बगल दिली जाते. समाजाच्या या पुरुषप्रधानतेला उत्तर म्हणून देशभरात ‘आय विल गो आऊट’ ही चळवळ मूळ धरू लागली. परंतु आता समाजमाध्यमांपुरती मर्यादित असलेली ही चळवळ आंदोलनात रूपांतरित होऊ लागली आहे. नुकतेच म्हणजे २१ जानेवारीला दिल्ली, बंगळुरू, मुंबईसह ३० शहरांमध्ये एकाच वेळी कानाकोपऱ्यातील मुलींनी आंदोलन केले. दादरच्या कोतवाल उद्यानात झालेल्या आंदोलनात महाविद्यालयीन मुलींबरोबरच नोकरदार महिलाही सहभागी झाल्या होत्या. या वेळी मुलींकडून त्यांचे अनुभव लिहून घेण्यात आले. आता ८ मार्चला महिना दिनानिमित्ताने महिलांची मुक्तपणे फिरण्याबाबतची मते जाणून घेऊन त्याचा एक अहवालच केंद्रासह राज्यभरातील विविध सरकारांना सादर करण्याची मोहीम या आंदोलनाने हाती घेतली आहे.
‘महिला स्वत:च्या घरातही सुरक्षित नाहीत. त्यामुळे ही चळवळ फक्त या एका घटनेपुरती न राहता सरकारी पातळीवर याची दखल घेण्याची गरज आहे. या चळवळीला आसाम, मध्य प्रदेश या राज्यांतील ग्रामीण भागातील महिलांनीही पाठिंबा दिला आहे,’ असे आय ‘विल गो आऊट’ चळवळीच्या मुंबई समन्वयक श्रुती कुट्टी यांनी सांगितले. तर ‘रात्रीच नव्हे तर दिवसाही मुलींना पुरुषांच्या अश्लील नजरेचा सामना करावा लागतो. अशा पुरुषांच्या भीतीने महिलांना एकटे बाहेर फिरणे शक्य होत नाही. रात्री फिरणाऱ्या महिलेकडे वाईट नजरेनेच पाहिले जाते. ही नजर बदलण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा ‘मजलिस’च्या अन्ड्रे डिमेलो यांनी या मोहीमेच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त केली.
पुरुषांनाही ‘त्याच’ नजरा झेलाव्या लागल्या
मुंबईतील नेहा सिंग या महिलेने ‘वॉक लाइक अ वुमन’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटात रात्री भटकंती करणाऱ्या मुलींसोबत पुरुषांनीही भाग घेतला होता. यासाठी मुलींना नेमक्या कुठल्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे अनुभवण्याकरिता ध्रुव लोहोमी, सचित पुराणिक आणि अक्षत निगम या पुरुषांनी मुलींचे कपडे घालून भटकंती केली. त्यांनाही महिलांच्या कपडय़ात वावरताना इतर पुरुषांकडून नको नको ती शेरेबाजी ऐकावी लागली. ‘सुरुवातीला मुलीचे कपडे घालून फिरणे अवघड वाटत होते. तसेच यापूर्वी आमच्याकडे इतके लक्ष कुणी दिले नव्हते,’ असे आपले अनुभव ध्रुव लोहोमी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘पुरुषांच्या नजरेतूनच महिलांना होणाऱ्या मानसिक त्रासाविषयी आतापर्यंत फक्त ऐकून होतो. मात्र अशा नजरा झेलणे हे खूप भयावह असल्याचे यानंतर कळून चुकले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

राहा फिट : चरबी – आवश्यक आणि अनावश्यक

सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असे दोन प्रकार मानले जातात.

प्रचार साहित्याच्या बाजारात नवनव्या वस्तूंना बहर!

मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

बाजारगप्पा : कातडीपासून पर्सपर्यंत..

अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली.

दम्याचा त्रास

श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा निर्माण होतो.

मूत्रपिंडरहित गर्भ!

या महिलेलाही गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागणार असल्याचे संकेत आहेत.

सेवा शुल्काला कायद्याचे अधिष्ठान नाही!

परिपत्रकातील ही संदिग्धता गोंधळांना व वादविवादांना कारणीभूत ठरणार आहे.

राहा फिट : धावण्याचे नियम

धावण्याचा व्यायाम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.

बाजारगप्पा : आद्य मासळीबाजार

रात्री समुद्राची मोहीम फत्ते करून हजारो लहान-मोठय़ा बोटी ससून डॉकच्या किनाऱ्याला लागलेल्या असतात.

नव्या हृदयामुळे जुन्या आशापंखांची नवी भरारी

ऑगस्ट २०१५ मध्ये बदलापूरमधील २१ वर्षांच्या अन्वर खानवर हृदयरोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली

पुरुषांसाठी बॅटबॉल, मोबाइल तर महिलांसाठी म्हाळसा पिन

पुरुषांसाठीच्या दागिन्यांमध्ये मर्यादा असतात.

व्यायामाचा श्रीगणेशा

सध्या थंडीचा आणि त्यामुळे हौसेने व्यायाम सुरू करण्याचा ऋतू आहे.

महिलांनो, ‘डेट रेप’पासून सावधान!

नवीन वर्षांच्या पाटर्य़ानिमित्त या पदार्थाची परदेशातून मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते.

बाजार सावरता सावरेना!

एरवी १२ महिने सदैव गजबजलेल्या मुंबईतील क्रॉफर्ड, मंगलदास आणि मनीष मार्केटमध्ये सोमवारीही गजबज होती.

उदरभरण नोहे.! हे ‘जीवन’ किती महत्त्वाचे?

शरीरातील ७० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे. शारीरिक गरजेनुसार पाण्याच्या प्रमाणात बदल होतो.

आबालवृद्ध : वृद्धांमधील झोपेची समस्या

झोपेतून सतत जाग येणे किंवा अनेक कारणाने झोपेत अडथळे येणे यातून झोपेचे आजार निर्माण होतात.

Just Now!
X