News Flash

Minde

२६ कोटींच्या गौण खनिजाची चोरी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

महसूलमंत्र्यांच्या आदेशामुळे कापूरवाडी परिसरातील तब्बल आठ क्रशर चालकांविरुद्ध अखेर महसूल विभागाने बेकायदा गौण खनिज उत्खननाबद्दल भिंगारच्या कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

‘प्रवरा’सारख्या संस्थाच मोदींचे स्वप्न पूर्ण करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडिया व डिजिटल इंडियाचे स्वप्न देशातील प्रवरेसारख्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थाच पूर्ण करू शकतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

निवडणुकीतील खर्चाच्या हिशोबावरून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अपात्र

निवडणुकीतील खर्चाचा हिशोब दिला नाही या कारणावरून जतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ९ जणांना आपले पद गमावण्याची वेळ आली आहे.

वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय

उत्पादन खर्चातील वाढ आणि सूत बाजारातील मंदीच्या परिस्थितीमुळे वाई सूतगिरणीचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बाधित क्षेत्राच्या भरपाईसाठी बीडमध्ये ५०० कोटी हवेत

जिल्ह्य़ात दुष्काळामुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पहिल्या पावसावर लागवड केलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. जिल्ह्यात ६ लाख ३९ हजार ६१८ हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाले.

‘शेतकऱ्यांना वेठीस धरल्यास बँकांविरोधात तीव्र आंदोलन’

हक्काचे कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांनी काँग्रेस संस्कृतीतून बाहेर पडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी दिला.

टँकरवाडय़ात टंचाई खर्चाचा आलेखही वाढताच!

टँकरवाडा अशी ओळख दरवर्षी अधिक गडद करीत जाणारा दुष्काळ मराठवाडय़ात पुन्हा दाखल झाला आहे. या वर्षी ऑगस्टच्या मध्यात १ हजार ८९० टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, टंचाई कालावधीत आतापर्यंत ४२ कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

उजव्यांचे मंत्र्यांसह!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी व विदर्भ या चार विभागांतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक उद्या (शनिवारी) व रविवारी येथे होणार आहे.

जुगारी मुख्याध्यापकासह सहा शिक्षक निलंबित

शाळेच्या खोलीमध्ये जुगार खेळत असताना अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकासह सहा शिक्षकांना शिक्षण विभागाने निलंबित केले.

लातूर, बीड, उस्मानाबादेत चारा छावण्यांना परवानगी

लातूर, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्य़ात चारा छावणीला परवानगीचे आदेश सरकारने बुधवारी जारी केले. चारा छावण्यांमध्ये किमान ५०० व कमाल ३ हजार जनावरे ठेवताना शेणाचा घोटाळा होऊ नये, या साठी स्वतंत्र सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन महिन्यांची प्रतीक्षा संपवून उस्मानाबादेत पाऊस बरसला

मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आठवडाभरात पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावली. लोहारा तालुक्यात सर्वाधिक, तर भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांपासून ते आजतागायत पावसादरम्यान वीज खंडित होऊ नये, म्हणून झटणाऱ्या महावितरण कंपनीच्या नियोजनाचे किरकोळ पावसात वाभाडे निघाले आहेत.

वेळापत्रकापूर्वीच प्रश्नपत्रिका!

जिल्ह्यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचण्यांसाठीच्या प्रश्नपत्रिका वेळापत्रक जाहीर नसताना दाखल झाल्या. त्यामुळे गुरुजींसह विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे वेळापत्रकासाठी शिक्षण विभागाकडून टोलवाटोलवी सुरू आहे.

माजी कुलगुरू प्रा. मूर्ती यांचे निधन

प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या त्रिसदस्यीय ‘नॅक’ समितीचे प्रमुख माजी कुलगुरू टी. सी. शिवशंकर मूर्ती यांचे मंगळवारी येथे आकस्मिक निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

पाण्यासाठीच पावसाकडे लक्ष

खरीप हंगाम हातचा गेला. आता गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र, पाऊस आला तरी तो सडा टाकल्यासारखाच येतो, असे चित्र आहे. रेणापूर व चाकूर तालुक्यांत काही भागांत मंगळवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना आपचा दिलासा

नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे आलेल्या आíथक दुष्टचक्रातून आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतमजुरांचे स्थलांतर

खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर चाडय़ावर मूठ धरणारा शेतकरी पावसाने उघडीप दिल्याने पुरता हवालदिल झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे.

कोल्हापुरात भाजपची निदर्शने

संसदेचे कामकाज रोखून धरण्याऱ्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात रविवारी जिल्ह्य़ात पडसाद उमटले. कोल्हापूर व इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत काँग्रेसचा निषेध नोंदविला.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपची निदर्शने

काँग्रेस पक्षाने संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी शहराच्या बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली.

‘वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय लवकरच सुरू करणार’

सातारा शहराचा आणि जिव्हाळ्याचा विषय असलेले वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल; तसेच जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जिहे-कटापूर योजना लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, अशी घोषणा राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व सातार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.

लाखभर बोगस सहकारी संस्था बंद करण्याचे शासनाचे लक्ष्य

राज्यात सुमारे २ लाख ३० हजार सहकारी संस्थांपैकी लाखभर संस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे मतदार होण्यासाठी केवळ कागदावरच असून, पिशवीतल्या या सर्व बोगस सहकारी संस्था बंद करण्याचे लक्ष्य आहे.

महिन्याभराने जेल भरो आंदोलनाचा शरद पवार यांचा सरकारला इशारा

सारं शिवार होरपळून निघालं आहे. ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, ते सरकार तोंड फिरवत आहे. आता केवळ मोर्चा काढून भागणार नाही. आपल्या मागण्या मान्य न करणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी अजून आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल.

पवारांचा दुष्काळी दौरा; बीडमध्ये चर्चा मात्र अंतर्गत कुरबुरीची!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी जिल्ह्यातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करून परळीत मुक्काम करणार आहेत.

लालूप्रसाद आणि नीतिशकुमार यांच्या पाठीशी शरद पवार

बिहार विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय बदलाचा पहिला संकेत नक्की मिळेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालूप्रसाद यादव आणि नीतिशकुमार यांच्यामागे शक्ती उभी करणार असल्याचे सांगितले. तिसऱ्या आघाडीची चाचपणी ते काही दिवसांपासून करत होते.

‘अमरावती विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतरच बाबा भांड यांची नियुक्ती’

साक्षरता अभियानाच्या खडू-फळा योजनेतील अपहारप्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही केवळ अमरावती विभागीय आयुक्तांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती केल्याचा दावा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी येथे केला.

Just Now!
X