23 January 2021

News Flash

Minde

‘शैक्षणिक प्रमाणपत्राबाबत हेराफेरी वा बनवेगिरी नाही’

आपली तुलना जितेंद्रसिंह तोमर यांच्याशी केली जात आहे. परंतु आपण शैक्षणिक प्रमाणपत्राबाबत कोणतीही हेराफेरी केली नाही आणि बनावट प्रमाणपत्रही तयार केले नाही, असा दावा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे केला.

उमरग्यामध्ये रक्ताचा तुटवडा; लातूर, सोलापूरला धावाधाव

उमरगा तालुक्यातील शासकीय रुग्णालयांत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. उमरगा शहरात शंभरहून अधिक रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी २० ते ३० रक्त बॅगांची गरज भागविण्यासाठी शहरात एक रक्तपेढी, दोन खासगी ब्लड बँका व उपजिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्र उपलब्ध आहे.

कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजाच्या ठिकाणी एक मीटर भिंत बांधणार!

जिल्ह्य़ातील कोल्हापूर बंधाऱ्यांच्या दरवाजांच्या जागी एक मीटर सिमेंट काँक्रीटची भिंत बांधण्याचा प्रस्ताव जलसंधारण विभागाच्या विचाराधीन आहे. दरवाजे बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याने या बंधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही.

‘केंद्र-राज्य सरकारांच्या भूमिकेने निम्मे साखर कारखाने अनिश्चितेत’

नुकत्याच संपलेल्या हंगामात (२०१४-१५) मराठवाडय़ात २३ सहकारी व २० खासगी साखर कारखाने सुरू होते. परंतु केंद्र व राज्य सरकारांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर येत्या हंगामात (२०१५-१६) यापैकी निम्मे कारखाने बंद पडण्याची शक्यता समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष अंकुशराव टोपे यांनी व्यक्त केली.

‘लातूर पॅटर्न’च्या नावाखाली आता होतेय खुलेआम लूट!

शिक्षणक्षेत्रात लौकिकप्राप्त ठरलेल्या ‘लातूर पॅटर्न’ला आता मात्र या पॅटर्नच्या नावाखाली अलिकडे सर्रास होत असलेल्या लुटीमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे! गेल्या २५ वर्षांपासून दहावी-बारावी परीक्षांच्या निकालात लातूर पॅटर्नने सातत्याने आघाडी घेतली. त्यामुळे हा पॅटर्न सर्वदूर पोहोचला.

महाराष्ट्र शुगर्सने थकवले शेतकऱ्यांचे ४४ कोटी

सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर्सने ऊस उत्पादकांचे ४४ कोटी ७८ लाख रुपये थकवले. थकवलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याच्या स्वत:च्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री करून, तसेच आवश्यकतेप्रमाणे कारखान्याने उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री करून वसूल करून घ्यावी, असे आदेश पुण्याचे साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी दिले.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेसाठी जागा मिळेना, भाडे परवडेना!

गतवर्षी डिसेंबरमध्ये नांदेड व कोल्हापूर येथे न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फोरेन्सिक लॅब) मंजूर झाली; परंतु सहा महिने उलटले तरी नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू होऊ शकली नाही.

‘शेतकऱ्यांना ८ दिवसांत मदत न दिल्यास उपोषण’

सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करूनही शेतकऱ्यांपर्यंत ती अजूनही पोहोचली नाही. येत्या ८ दिवसांत शेतकऱ्यांना मदत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता मोठय़ा संख्येने उपोषण सुरू करील, असा इशारा खासदार राजीव सातव यांनी दिला.

वानखेडेनगर, विशालनगरला नवीन जलवाहिनीचे काम सुरू

शहराच्या वानखेडेनगर व विशालनगर भागात युद्धपातळीवर नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. येथे १०० एमएमची नवीन डीआय जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे.

वॉटर युटिलिटी कंपनी कार्यालयास एमआयएम नगरसेवकांकडून कुलूप

शहरातील पाणीपुरवठय़ाचा विस्कळीतपणा बुधवारी पुन्हा वाढला. निम्म्याअधिक शहरात पाण्यासाठी ओरड सुरू असून, एमआयएमच्या नगरसेवकांनी बुधवारी तीव्र आंदोलन करीत वॉटर युटिलिटी कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकले.

‘जैतापूरप्रश्नी विरोध कायम, परंतु चर्चा शक्य’!

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीच केंद्र सरकारने बोलणी करावी. तशी चर्चा घडवून आणण्यासाठी कोणी दूरध्वनी केला तर त्यासाठी मध्यस्थी करू, अशी भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.

मनोहर जोशी यांच्या खैरेंना कानपिचक्या!

शिवसेनेचा इतिहास सांगत-सांगत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिलेल्या कानपिचक्यांमुळे शिवसेनेचा ३१ व्या वर्धापनदिनाचा मेळावा चांगलाच रंगतदार ठरला.

औरंगाबाद विभागात बीड यंदाही अव्वल

दहावीच्या निकालात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९५.०२ टक्के निकालासह बीड जिल्ह्याने बाजी मारली. सलग ३ वर्षांपासून बीडने ही किमया साध्य केली. मुलांपेक्षा मुलीच पुढे असून, गुणवंतांची यादी नसली तरी अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन गुणांची स्पर्धा कायम ठेवली.

‘संपूर्ण कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरू’

सध्याचे सरकार हे झोपेचे सोंग घेतलेले सरकार आहे. या सरकारला कसे जागे करणार? काँग्रेस पक्षाला भविष्यात सरकारविरुद्ध आक्रमक संघर्ष करावा लागेल. संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोवर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.

कर सहायक पदाच्या परीक्षेत ‘गोंधळच गोंधळ’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या कर सहायक पदासाठीच्या परीक्षेची बनावट प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन लाखो रुपयांना गंडविणाऱ्या सात जणांच्या टोळीसह १४ जणांना पोलिसांनी अटक केली, तर एक जण फरार आहे.

अवैध वाळूउपशावर कारवाईचा बडगा

अवैध वाळूउपसा आणि वाहतूक यावर कडक नजर ठेवण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांनी गावपातळीवर पथकांची स्थापना केली असून, गेल्या तीन दिवसांपासून प्रशासनाने मोठय़ा प्रमाणात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाई केली.

बीड जिल्ह्य़ात वरुणराजाने साधला मुहूर्त

वरुणराजाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ७ जूनचा मुहूर्त साधत पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. बीड शहरासह परळीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

हिंगोलीत अण्णा भाऊ साठे महामंडळात १ कोटींचा अपहार

राज्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळात झालेल्या घोटाळ्याची राज्यभर चर्चा असताना जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गोपाळ गायकवाड व लिपीक सुजित शंकर पाटील या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध १ कोटींचा अपहार केल्याची तक्रार हिंगोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

नांदेडजवळ अपघातात ९ ठार

मुखेड तालुक्यातील बारड येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बस व मालमोटारीची समोरासमोर धडक होऊन नऊ जण ठार, तर १२ जण जखमी झाले.

शिरीष देशमुख मराठवाडय़ात पहिला

वैद्यकीय पूर्वपरीक्षेत रिलायन्स लातूर पॅटर्न संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शिरीष बाळासाहेब देशमुख २००पकी १९६ गुण घेऊन राज्यात तिसरा, तर मराठवाडय़ात पहिला आला.

सराफा व्यापाऱ्याची आत्महत्या; २ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुण सराफा व्यापारी रवी टेहरे याच्या आत्महत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी सखाराम टेकुळे व रेल्वे पोलीस अधिकारी चिंचाणे या दोघांविरुद्ध शुक्रवारी रात्री पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

‘आंबेडकर’ गोदामाचे पत्रे उडाल्याने साखर भिजली

उस्मानाबाद तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे कारखान्याच्या दोन गोदामांवरील पत्रे उडाल्याने पावसात साखर भिजून मोठे नुकसान झाले.

‘चौकशीतून अजित पवारांना सवलतीचा कांगावा चुकीचा; दोषींना सोडणार नाही’

राज्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या जलसिंचन घोटाळय़ामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांना सोडण्यात येणार नाही, असे सांगत अजित पवारांना चौकशीसाठी न बोलावता त्यांना चौकशीतून सवलत दिली जात असल्याचा कांगावा चुकीचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत सोमवारी पोखर्णीत काँग्रेसचा मेळावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोमवारी (दि. ८) येथे येत असून, त्यांच्या उपस्थितीत पोखर्णी येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीत येत आहेत.

Just Now!
X