23 January 2021

News Flash

Minde

सोलापुरात व्यापाऱ्यांच्या ‘बंद’ ला संमिश्र प्रतिसाद

स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी महासंघाने पुकारलेल्या ४८ तासांच्या ‘व्यापार बंद’ ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अप्पाशा म्हेत्रे पुन्हा राष्ट्रवादीत

माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी स्वागत केले.

मातेने विष पाजल्याने चिमुरडय़ा मुलीचा मृत्यू

घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मनस्ताप करून घेत मातेने आपल्या दोन्ही मुलांना विषारी औषध पाजले व नंतर स्वत:देखील विषारी औषध घेतले. यात एका चिमुरडी मुलीचा अंत झाला.

गौरव समितीसाठी गणित विभागातील शिक्षकांकडून सक्तीने निधी वसूल?

पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातील एका माजी प्राध्यापकांच्या पंचाहत्तरीसाठी गौरव समिती स्थापण्यात आली असून त्या समितीसाठी सक्तीने निधी वसूल केला जात असल्याची तक्रार विभागातील काही शिक्षकांनी केली आहे.

डॉ. आंबेडकर जयंती उत्सवाची मिरवणुकीने उत्साहात सांगता

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी सोलापुरात भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणूक सोहळ्यावर प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

पाचशे रुपयांसाठी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल

दोन वर्षांपूर्वी घेतलेले पाचशे रुपये परत दिले नाही म्हणून आपल्या भावाला मारहाण होत असताना त्यास वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाणीत स्वत:चा जीव गमवावा लागला.

प्रत्येक गोष्टीसाठी पोलीसच जबाबदार कसा- प्रकाश मुत्याल

अलीकडे फिर्यादी, साक्षीदार फितूर होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: लातूर, बीडमध्ये त्याचे प्रमाण खूपच आहे. मात्र, करणार काय, त्यासाठी यंत्रणेत सुधारणा हवी.

सांगोला तालुक्यातील यंदाचा दुष्काळ शेवटचा ठरावा- आर. आर.

सांगोला तालुक्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या म्हैसाळ व टेंभू योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे ही कामे मार्गी लागणार असल्याने यंदाचा सांगोला तालुक्यातील दुष्काळ हा कदाचित शेवटचाच ठरावा

मुंबई, बोरीवली, ठाण्यासाठी पुण्याहून एसटीच्या २६७ गाडय़ा

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुंबई, बोरीवली व ठाण्यासाठी पुण्याहून एसटीच्या दररोज २६७ गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. शिवनेर व हिरकणी या गाडय़ांचा त्यामध्ये समावेश आहे.

जावयाच्या अंत्यविधीसाठी जाताना जीपला अपघात; सासू-सासऱ्यासह चार ठार

जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या सासरे, सासूसह अन्य नातेवाइकांच्या जीपला अपघात होऊन सासू-सासरे व सून यांच्यासह चार जण मरण पावले, तर नऊ जण जखमी झाले.

उजनी धरणात ५१ हजार कोटींचे काळे सोने!

सध्या सोलापूरचा दुष्काळ ज्या उजनी धरणाभोवती केंद्रित आहे, त्याच उजनी धरणाच्या माध्यमातून सोलापूरचा हा दुष्काळ एका प्रकारे इष्टापत्ती ठरू पाहत आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ असून त्याचा उपसा झाल्यास शासनाला सुमारे ५१ हजार कोटींचा महसूल मिळू शकतो.

राजा माने व भरत दौंडकर यांना कवी रा. ना. पवार स्मृती पुरस्कार

कवी रा. ना. पवार प्रतिष्ठानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार राजा माने व कवी भरत दौंडकर (पुणे) यांच्या साहित्यकृतींची निवड झाली आहे.

सोलापुरात भूमी अभिलेखतर्फे भूमापन स्मरणिकेचे प्रकाशन

सोलापूरच्या जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयातर्फे भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूमापन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी भूमी अभिलेख कार्यालयातील गुणवंत कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले, तसेच कर्मचाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली.

दक्षिण सोलापूरच्या गावांसाठी एक कोटीची पाणी योजना मंजूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी भागातील मुस्ती येथील बसवण्णा वस्ती तांडा व हरनार वस्तीसाठी ४६ लाखांचा निधी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झाला.

आत्मक्लेश करणाऱ्या माणसाचा आत्मा अगोदर साफ असावा

आत्मक्लेश करायला अगोदर माणसाचा आत्मा साफ हवा, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.

प्राणघातक हल्ल्यात अडकलेला राष्ट्रवादी नगरसेवक अद्याप फरारीच

महापालिका निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून दोघा बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक पीरअहमद शेख हे ७ एप्रिलपासून अद्याप फरारी आहेत.

कोल्हापुरातील रस्तेप्रश्नी भाजपचे घंटानाद आंदोलन

नगरोत्थान योजनेतील रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत, या मागणीसाठी शहर भाजपाच्यावतीने गुरूवारी महापालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ‘सरस्वती आहार’ला दोन वर्षे पूर्ण

सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाहेरगावच्या गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी सरस्वती एज्युकेशन अॅन्ड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सरस्वती आहार योजना राबविली जाते.

आगामी निवडणुकात युवक काँग्रेस महत्त्वाची ठरणार – विश्वजित कदम

राज्यात युवक काँग्रेसचे कौतुकास्पद कामकाज सुरू असून, कराड उत्तर भागातही काँग्रेस बळकटीकरणासाठी युवक काँग्रेसची फळी उभी करू तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत युवक काँग्रेसचा सहभाग महत्त्वपूर्ण राहणार असल्याचा विश्वास युवक काँगेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

सोलापुरात दुष्काळी ४०१ गावांना पाचशे टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळाची झळ चांगलीच बसत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील तहानलेल्या ४०१ गावे व दोन हजार वाडय़ा-वस्त्यांना सुमारे पाचशे टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागत आहे.

Just Now!
X