16 January 2021

News Flash

Minde

‘चिक्की’ ते ‘चप्पल’!

दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सोनपेठ तालुक्यातील दौऱ्यात त्यांच्या चपलेचे कवित्व गाजले. मुंडे यांची चप्पल गाळात फसल्याने एका कार्यकर्त्यांने ती धुवून पुन्हा त्यांच्यासमोर आणून ठेवली.

पथकाच्या धावत्या दुष्काळी दौऱ्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

जिल्ह्यातील पडेगाव, रूमणा, दैठणा व चिकलठाणा शिवारात रस्त्याकडेला शेतातील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथकाने धावता दौरा पूर्ण करून जालन्याकडे प्रयाण केले.

तब्बल ३५ वर्षांनंतर शरद पवार रस्त्यावर

तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळप्रश्नी मोर्चा काढण्यात येणार असून त्याचे नेतृत्व खुद्द पवार करणार आहेत.

गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमातून डॉ. आंबेडकर यांचे पुस्तक काढले

भारताला वैदिक हिंदू राष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक काढून टाकणे, हे त्याचेच द्योतक आहे.

चारा छावण्यांसाठी आपचे धरणे, उपोषणाचा इशारा

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह होत असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांसाठी वाचक शिफारस मागविण्याचा प्रयोग

सरकारी किंवा विविध संस्थांतर्फे साहित्य कृतींसाठी दिले जाणारे पुरस्कार, तसेच साहित्य-संस्कृतीशी संबंधित वेगवेगळ्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शीपणा टाळून भलतेच ‘विनोद’ राज्यात होत असताना, अमेरिकास्थित महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेने आपल्या विविध पुरस्कारांच्या मानकऱ्यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे ५०० जाणकार-वाचकांकडून शिफारशी मागविल्या आहेत.

प्रतिष्ठेच्या अंबड बाजार समितीत भाजप-शिवसेना युतीचा पराभव

अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवला. भाजप-शिवसेना-राष्ट्रीय समाजवादी पक्ष आघाडीला केवळ २ जागा मिळाल्या.

कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना रजावेतन मिळणार

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सक्तीने कमी केलेल्या कामगारांची रजा वेतनाची रक्कम त्वरित देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

माजी महापौर नायकवडी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न असफल

माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्यावर रविवारी सकाळी घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष साजिद अली पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तलवार, सत्तूर, काठय़ा घेउन हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे नायकवडी यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही सहभाग

महापालिका निवडणुकीत िरगणात उतरलेल्या भाजप-ताराराणी आघाडीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली आहे, याची घोषणा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

गुंडांच्या मारहाणीत हॉटेलमालकाचा मृत्यू

इचलकरंजी येथे बिलाच्या कारणावरून गुंडाने दमदाटी करत केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा मृत्यू झाला. सुंदर चंदू मुल्या (वय ६०,रा. हत्ती चौक) असे मृताचे नाव आहे.

बाबा भांड यांच्या नियुक्तीवरून मराठवाडय़ात अळीमिळी गुपचिळी!

राज्य सरकारकडून साहित्य व संस्कृती मंडळावर बाबा भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना मराठवाडय़ातील साहित्यिक व प्रकाशकांनी मात्र त्यावर अळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारले आहे.

जालन्यातील स्टील उद्योगाला मंदीचा तडाखा

उत्पादनास मागणी नाही आणि वीज दरवाढ यामुळे जालना औद्योगिक वसाहतीतील ५१पैकी ३१ रिरोलिंग मिल्स बंद पडल्या असून लोखंडी सळ्यांचे उत्पादन करणाऱ्या ज्या २० रिरोलिंग मिल्स सुरू आहेत त्याही पूर्ण क्षमतेने चालू नाहीत.

गंगा नदीवर मराठीतील पहिले पुस्तक नांदेडमधील लेखकद्वयांच्या नावावर

गोदाकाठी वसलेल्या नंदिग्रामनगरातील चंद्रकला व एल. के. कुलकर्णी या निवृत्त शिक्षक दाम्पत्याने तीन-चार वर्षे अभ्यास करून व वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे पूरक माहिती जमवून संयुक्तपणे लिहिलेल्या, तसेच राजहंस प्रकाशनाने साकारलेली लेखनकृती गंगा नदीवरील मराठीतील पहिले परिपूर्ण पुस्तक असा मान मिळवला आहे.

कृत्रिम पावसासाठी दोन टप्प्यांत फवारणी

पर्जन्यरोपणासाठी आवश्यक असणारे सी डॉप्लर रडार गुरुवारी सकाळी औरंगाबाद येथे दाखल झाले. दुपापर्यंत ते उभारण्यासाठी हवामानशास्त्र विभागातील तज्ज्ञ आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती.

निवडणुकांच्या नगाऱ्यात दुष्काळी झळांचा विसर!

पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाची छाया असली, तरी परभणी जिल्ह्यात मात्र ४७९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मात्र निवडणुकांचे नगारे वाजत असल्याने लोकही वेगळ्याच राजकीय धुंदीत होते.

निष्पाप तरुणाला आधी कोठडी, नंतर ‘सुटका’!

नांदेड रेल्वेस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात जिल्हा पोलिसांकडून चुकीची पुनरावृत्ती घडली! गंगाखेडच्या १९वर्षीय निष्पाप तरुणाला त्यामुळे हकनाक त्रास सहन करावा लागला.

‘बीडमध्ये चारा छावण्या सुरू करा’

दुष्काळी स्थिती लक्षात घेता जिल्ह्य़ातील सर्व ११ तालुक्यात जनावरांसाठी चारा डेपो किंवा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, तसेच पशुधन असणाऱ्या ठिकाणी अधिकचा पाणीपुरवठा करावा.

तुळजापूरमध्ये कृत्रिम पाऊस बरसला, लातूरमध्ये अपयश

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रडारची उभारणी औरंगाबाद शहरात युद्धपातळीवर सुरू असून, उद्या (शनिवार) दुपापर्यंत याचे काम पूर्ण होईल.

‘देवांचे’ आयुष्य वाढविणारा ‘माणूस’!

आयुष्याची दोर हातात ठेवणाऱ्या देवाचे आयुष्य कोण वाढवेल? असा माणूस आहे. त्याचे नाव मॅनेजर सिंग. पुरातत्त्व विभागात रासायनिक प्रक्रिया विभागाचे अधीक्षक असणाऱ्या या व्यक्तीने तुळजाभवानी, पांडुरंग आणि अलीकडेच महालक्ष्मीच्या मूर्तीचेही संवर्धन केले.

हिंगोलीत २७३ मिमी पाऊस; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात मृगाचा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची कामे आटोपली आणि नंतर दीड महिन्यापासून पावसाने रुसवा धरला.

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वर्चस्वाचा दावा; भाजपचा पराभव

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.

दुष्काळी मराठवाडय़ात मासेमारीसाठी भलामण!

गोडय़ा पाण्यात एक किलोचा मासा वाढण्यास १० महिने लागतात. मराठवाडय़ातील बहुतांश धरणांत चांगला पाऊस झाल्यानंतर ६ महिने पाणी कसेबसे टिकते.

आषाढी वारीच्या फेऱ्यांमधून एस. टी.ला ४९ लाख उत्पन्न

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाकडून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. नऊ दिवसांत हजारो भाविकांनी एस. टी. बसने प्रवास केला. यातून बीड विभागाला ४९ लाख उत्पन्न मिळाले.

Just Now!
X