23 January 2021

News Flash

Minde

तपासणी सुरू झाल्यामुळे वसतिगृहांचा कायापालट!

समाजकल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील वसतिगृहांची बुधवारपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू झाली. त्यामुळे अनेक संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. काही वसतिगृहांचा रातोरात कायापालट झाला.

‘उसवलं गणगोत सारं…आधार कुणाचा नुरला’!

तो गायला लागला की, हृदयाला पान्हा फुटे. काही कळायच्या आत डोळ्याच्या कडा ओलावत. त्याच्या गाण्याने अनेकांना वेड लावले. या गोड गळ्याच्या १४ वर्षीय अनाथ गायकाला आई-वडिलांकडून एचआयव्हीसारखा दुर्धर आजार वारशानेच मिळाला.

‘स्मार्ट सिटी’त नांदेडच्या समावेशास काँग्रेसचा आंदोलन करण्याचा इशारा

गुणवत्ता व स्पर्धेत सरस ठरूनही नांदेडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून डावलण्याचे कुटील राजकारण खेळले गेले. मुख्यमंत्री मराठवाडय़ाच्या हक्काचे उपक्रम नागपूरला हिरावून नेत आहेत.

‘दुष्काळामुळे राज्यभरातील ऊसउत्पादनात ३० टक्के घट’

पावसाअभावी राज्यभर भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, दुष्काळामुळे ऊसउत्पादनात दुष्काळग्रस्त भागात ५० टक्के, तर उर्वरित भागात २५ टक्के घट होण्याची शक्यता असल्याचे खासगी साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

ऊसउत्पादक शेतकरी, साखर उद्योगाच्या अडचणी सोडवणार

साखर दराच्या घसरणीमुळे ऊस शेतकरी व साखर उद्योग संकटात सापडला असून, साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी राज्य व केंद्र सरकारांकडून सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्मा संघटनेचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिली.

परभणी जिल्ह्यामधील ४७९ ग्रामपंचायतींचे आज मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली. आता उद्या (मंगळवारी) जिल्ह्यात ५२४ पकी ४७९ ग्रामपंचायतींसाठी दीड हजार केंद्रांवर मतदान होणार आहे. ६ लाख २९ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

निवडणुकीसाठी तीन हजारावर पोलिस तैनात

जिल्ह्य़ात मंगळवारी होत असलेल्या ६८८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्य़ा बाहेरहूनही पोलीस मदत मागवून घेण्यात आली आहे.

कोल्हापूर, इचलकरंजी दोन्हींना नकारघंटा

महालक्ष्मी देवस्थानाशी निगडित मध्यवर्ती संकल्पना असलेली कोल्हापूर महापालिका आणि टेक्स्टाईल हबशी निगडित संकल्पनेवर आधारित इचलकरंजी नगरपालिका असे कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्मार्ट सीटी चे दोन्हीही प्रकल्प राज्य शासनाच्या नापसंतीस उतरले आहेत.

चोर समजून केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

रात्री गावात सुरक्षिततेसाठी गस्त घालताना चोरांची टोळी समजून गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वऱ्हाडातील महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला. बार्शी तालुक्यातील माळवंडी येथे हा प्रकार घडला.

मंगळसूत्र चोराचा अपघाती मृत्यू

पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटारीवर आदळून एक जण ठार झाला तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धोरण लकव्यामुळे साक्षरता मोहीम कोमात!

‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून गप्प राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण समोर कोणतेच काम नसल्याचा अनुभव सध्या राज्याच्या साक्षरता अभियानातील सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचारी गेल्या दीड वर्षांपासून घेत आहेत.

ध्वनी प्रदूषणाविरोधात आता कडक कारवाई

कार्यक्रम खासगी असो वा सार्वजनिक, त्यामुळे सामान्य माणसाला आवाजाचा त्रास होणार असेल तर सन २००० मधील तरतुदीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकतो.

पीकविमा भरण्यासाठी अखेर मुदत वाढविली

खरीप पीकविमा भरण्यास राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे पीकविम्यापासून वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

एलबीटी भरणा करण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

राज्यातील व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दुष्काळाचा वन्यजीवांना फटका.. आठवडय़ाला दोन हरणांचा मृत्यू!

दुष्काळाच्या वणव्यात वन क्षेत्राची वाताहत होत असून, पाणी व खाद्याच्या शोधात वन्य प्राणी वन क्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. मात्र, त्यामुळेच सैरभैर होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

शेतकरी मारहाणप्रकरणी दोन पोलिसांवर कारवाईची तलवार

पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेसमोर लागलेली रांग तोडल्याच्या कारणावरून तरुण शेतकऱ्याला दोन पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराचे चित्रण शुक्रवारी सार्वजनिक माध्यमासह दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारीत झाले.

ना पावसाचा पत्ता, ना रडारचा!

पाऊस नसल्याने भीषण दुष्काळाचे संकट घोंघावताना दिसत आहे. पीक येणार नाहीच, असे लक्षात येताच गावोगावी पीकविमा भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

पीकविमा भरण्याची मुदत संपली, शेतकरी वंचितच!

एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकांचा असहकार, दुसरीकडे तलाठय़ांची लाचखोरी अशा कात्रीत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची अंतिम तारीख शुक्रवारी संपली. मात्र, अजूनही अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचितच राहिले आहेत.

दुष्काळात शेतकऱ्यांची होरपळ लाचखोरीत तलाठय़ांची चंगळ!

दुष्काळात शेतकऱ्यांची होरपळ सुरू असताना सरकारने दुबार पेरणीसाठी दीड हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. सात-बारावर पेर नोंदविणे, पीककर्जासाठी पतक्षमतेची गरज यामुळे शेतकऱ्यांना तलाठय़ाची मिनतवारी करावी लागत आहे.

‘तुळजापूर पालिकेच्या इंधन खर्चात भ्रष्टाचार’

तुळजापूर पालिकेच्या व भाडय़ाने आणलेल्या वाहनांच्या इंधनावर कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल ६० लाख ६७ हजार १४१ रुपये नियमबाह्य खर्च केल्याचे दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या तुळजापूर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई गंगणे व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी.

बॉम्बस्फोटाची धमकी; माहूरचा तरुण ताब्यात

किनवट रेल्वेस्थानक व कृष्णा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले; पण त्याने अजून कबुली दिली नसल्याचे सांगण्यात आले.

एक हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी प्रमाणपत्रांवरच ३०० रुपये खर्च!

दहावीपर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या वर्षी सक्षम अधिकाऱ्यांचेच उत्पन्न व अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र दाखल करण्याची सक्ती करण्यात आली.

चुकीच्या माहितीची सामान्याला ‘शिक्षा’!

रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी दूरध्वनीनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी उतावीळपणा दाखविला खरा; परंतु त्यामुळेच एका सामान्य नागरिकावर नाहक मनस्तापाची वेळ आली! नांदेड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार घडला.

पावसाअभावी भाज्या महागल्या

पावसाळ्यास प्रारंभ होऊन दोन महिने उलटत आहेत, तरीही पावसाचे म्हणावे असे दमदार आगमन प्रतीक्षेतच असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली असून, त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

Just Now!
X