16 January 2021

News Flash

Minde

अर्थकारणाचे चक्र मंदावले, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी शेती उत्पादनाला मोठा फटका बसल्याने शेतीवर अवलंबून असलेली बाजारपेठ पूर्ण कोलमडली आहे. शेतातील पीक बाजारात न आल्याने शेतकऱ्यांच्या हातात पसा नाही.

औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांना धावपट्टी सापडेना!

एअर इंडियाच्या ना-हरकतीवर औरंगाबाद विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार की नाही, हे ठरणार आहे. ३ खासगी कंपन्यांनी औरंगाबादहून बँकॉक, क्वाललम्पूर, अबुधाबी येथे उड्डाणे करण्याची तयारी दाखवली असली, तरी एअर इंडियाकडून सकारात्मक वा नकारात्मक कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने सगळे घोडे अडले आहे.

अवसायनातील भू-विकास बँकेच्या मालमत्ता ई-निविदेद्वारे विक्री करणार

राज्य सरकारने भू-विकास बँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांची थकबाकी वसुली पूर्णपणे थांबली. परिणामी बँकेच्या कर्मचाऱ्यांसमोर पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला.

‘वादग्रस्त विधानाबद्दल केंद्रीय कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा’

शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमप्रकरणे, व्यसनाधीनतेतून व कौटुंबिक कलहातून होत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केले. हे विधान संतापजनक असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.

स्वतंत्र विद्यापीठाबाबत कुलगुरूंकडून बोळवण

उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीबाबत प्रस्ताव सादर झाला. त्यासाठी दोन बैठका झाल्या आणि आता हा प्रस्ताव चक्क बासनात गुंडाळण्यात आला आहे.

इंदिरा आवासची ३१४ घरकुले हिंगोलीत रद्द करण्याची नामुष्की

इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या आíथक वर्षांत ३ हजार ८६९ घरकुले मंजूर करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या निष्क्रीय नियोजनामुळे २०१४-१५ या आíथक वर्षांतील ३१४ घरकुले रद्द करण्याची नामुष्की जि. प. प्रशासनावर आली, तर २ हजार ९८१ घरकुलांचे काम अजून अपूर्ण असल्याने घरकुलांचे त्रांगडे कसे सुटणार, असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे.

उजनी-सोलापूर योजनेतील पाणी चोरीत धनदांडग्यांचा हात?

उजनी धरण ते सोलापूर थेट पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छिद्र पाडून जमिनीखालून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी पळून नेत शेती फुलविणाऱ्या १९ शेतक ऱ्यांविरुद्ध सोलापूर महापालिका प्रशासनाकडून पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

सांगलीतील १३ हजार व्यापारी करमुक्त होणार

एलबीटी हटविल्यामुळे सांगली महापालिकेतील सुमारे १३ हजार व्यापारी करमुक्त होणार असून ५० कोटींवर वार्षकि खरेदी अथवा विक्री असणारे करपात्र व्यापारी केवळ २० महापालिका क्षेत्रात आढळून येत आहेत.

सांगलीत ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान

किरकोळ वादावादी, मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांचा सर्रास वापर आणि स्थानिक निवडणुकीमुळे अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान पार पडले.

महालक्ष्मी मूर्तीचा वज्रलेप; हिंदुत्ववादी गटात मतभेद

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर अखेर शनिवारपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली असताना दुसरीकडे मूर्ती बदलावरून िहदुत्ववाद्यांच्या दोन गटात मतभेद उफाळून आले

जमिनीचे मूल्यांकन खोटे दाखवून लाखोंची फसवणूक, कुळ-सिलिंग कायद्याचाही भंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक व त्यांचे कुटुंबीय खोटारडे आहे. जमिनीचे मूल्यांकन खोटे दाखवून सरकारची लाखो रुपयांची फसवणूक त्यांनी केली. या बरोबरच कुळ व सिलिंग कायद्याचा भंगही त्यांनी केला आहे.

लातूरजवळ भीषण अपघातात ११ ठार

वर्तमानपत्राची पार्सले घेऊन जाणारी जीप आणि मालमोटारीची समोरासमोर जोराची धडक होऊन जीपमधील ११ जण ठार, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ८ पुरुष, २ महिला व दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे.

मोफत अंत्यविधीसाठी सरणाचा खर्चही झेपेना!

सलग २८ वष्रे शिवसेना-भाजपच्या ताब्यात असणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू असणाऱ्या मोफत अंत्यविधीची योजनेतील सरणाच्या लाकडाची २० लाख २५ हजार रुपयांची देयके प्रलंबित आहेत.

‘अंनिस’ राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिणार

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून तपासात सुरू असलेल्या दिरंगाईबाबत अंनिस राष्ट्रपतींना एक लाख पत्रे लिहिणार आहे, अशी माहिती अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी येथे दिली.

बिनविरोध निवडणुकीबद्दल नालेगावला १० लाख देणार

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध केल्यास १० लाखांचा निधी ग्रामपंचायतीला देणार असल्याची जाहीर घोषणा खासदार राजीव सातव यांनी एका कार्यक्रमात केली होती. ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध केली.

‘कृत्रिम पावसासाठी तातडीने स्फोटक वापर परवाना द्यावा’

कृत्रिम पावसाच्या तयारीसाठी आवश्यक असलेला स्फोटक वापराचा परवाना तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंग यांना दिल्या आहेत.

आईच्या मृतदेहाजवळ चिमुकलीचा रात्रभर टाहो!

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. मृत महिलेची दीड वर्षांची चिमुकली मृतदेहाजवळ रात्रभर रडत असल्याचे गुरुवारी सकाळी निदर्शनास आले.

‘गुन्हेगारी, अपघात कमी करण्यास पोलीस यंत्रणेकडून नवीन योजना’

मराठवाडय़ातील वाढती गुन्हेगारी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे नवीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.

खंडणीखोर महिला गजाआड

बलात्कारासारख्या खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस शहर पोलिसांनी सापळा रचून जिल्हा न्यायालयाच्या आवारात ताब्यात घेतले.

बिबटय़ाच्या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी

किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरात प्रात:र्विधीसाठी गेलेले तीनजण बिबटय़ाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला.
सरासरीपेक्षा कमी पाऊस, तसेच वनविभागाने प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीच व्यवस्था न केल्याने अनेक भागातील प्राणी मानवी वस्तीत खुलेआम येऊ लागले आहेत.

जालन्यात अजूनही २ लाख लोकसंख्येची टँकरवर भिस्त

कमी पावसामुळे जिल्ह्य़ात सध्या १२८ गावे-वाडय़ांना १२९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्य़ातील ७ मध्यम व ५७ लघुसिंचन प्रकल्पांत ५ टक्केच उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्य़ात सध्या दोन लाख लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे.

लाचखोर अधिकारी पसार; बँक खाती-लॉकरला सील

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी ‘टक्केवारी’ मागणारा तालुका कृषी अधिकारी बद्रिनारायण काकडे व पर्यवेक्षक राजेभाऊ दोडे हे दोघे लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले आहेत.

साखर कारखाने बंद पाडण्याचा डाव

केंद्र तसेच राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचा या सरकारचा डाव असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी येथे बोलताना केला.

कराडच्या भाजी मंडईत भीषण हल्यात दोघे ठार

शहराच्या मध्यवस्तीतील भाजीमंडईत आज सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेनऊच्या सुमारास एका गुन्हेगाराने एका व्यापाऱ्यावर केलेल्या गोळीबारात या व्यापाऱ्याचा जागीच मूत्यू झाला, तर नंतर संतप्त जमावाने या गुन्हेगारावर केलेल्या हल्ल्यात या गुन्हेगाराचाही जागीच मृत्यू झाला.

Just Now!
X