16 January 2021

News Flash

Minde

आव्हाडांच्या निषेधार्थ सांगली बंद

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आज पुकारलेल्या बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. तासगावमध्ये आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सोलापुरात ७०० कोटी खर्चाचे दोन उड्डाणपूल उभारणार

सोलापुरातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न सतत चर्चेत विषय ठरला असताना सोलापूरची ही बदनामी दूर करण्यासाठी, पर्यायाने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अखेर शहरात दोन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत.

वरुणराजा रुसल्याने राज्यात पावसाळय़ातही तीन हजार टँकर

राज्यावर दुष्काळाचे सावट असून पावसाळय़ातही राज्यात तीन हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी येथे सांगितले.

सांगा कसे जगायचे?

दोन वेळचा चहा आणि जेवण एवढीच ६५ वर्षांच्या जगदीश निंगप्पा बेडगे यांची गरज. ६ जणांचे कुटुंब. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. शेती एके शेती. ४ एकर शेतीत या वर्षी २५ हजारांचे कर्ज काढून बियाणे पेरले.

‘पोलिसांवर गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही’

महाराष्ट्रातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा धाक राहिला नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यस्था राहिली नाही, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सोनपेठ येथे पत्रकारांशी बोलताना केले.

कृष्णा खोऱ्यात पावसाच्या मध्यम सरी

कोयना धरण क्षेत्रासह कृष्णा, कोयना काठांवर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या, भारी सरी कोसळू लागल्या आहेत. तीन आठवडय़ांच्या सलग विश्रांतीनंतर कोसळू लागलेला हा पाऊस खरीप हंगामाला जीवदान देणार का, हे त्याच्या सातत्यावर अवलंबून राहणार आहे.

सांगली, मिरज शहरात ईदनिमित्त सामूहिक नमाज

सांगली व मिरज शहरासह जिल्ह्यात आज रमजान ईद मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो मुस्लिम बांधवानी सकाळी इदगाह मदानावर ईदची नमाज अदा केली.

चांदोबाचा लिंबमध्ये रंगले माउलींचे पहिले उभे रिंगण

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध उभी रांग..माउलींच्या अश्वांनी घेतलेली दौड..दिंडीतील वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका..टाळ-मृदंगांच्या दाटीत रंगलेल्या फुगडय़ा अन हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाला आळवीत भारावलेल्या वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारीच्या वाटेवारील पहिले उभे रिंगण सोहळा चांदोबाचा लिंब येथे उत्साहात पार पडले.

संजय ससाणे यांची गोळी झाडून आत्महत्या

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांचे थोरले बंधू संजय मुरलीधर ससाणे (वय ६१) यांनी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली.

‘भाजपच्या अन्य घोटाळेबाज मंत्र्यांचीही नावे जाहीर करणार’

भाजप सरकार बहुजनविरोधी, उद्योगपती व सावकारधार्जिणे असून, शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची मानसिकताच नाही. आठ महिन्यांतच दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले.

माजी खासदार सावे यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी पुष्पनगरी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे चाहते, सर्व क्षेत्रांतील मंडळी जमली होती.

राज्यातील ९१ लाख हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात

राज्यातील १३५ लाख हेक्टर खरीप क्षेत्रापकी ९१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ६८ टक्के पेरणी होऊनही पावसाअभावी पिके माना टाकत आहेत. आणखी ४ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास गंभीर स्थिती ओढवण्याची भीती आहे.

जायकवाडी शून्यावर!

पावसाने दडी मारल्याने मराठवाडय़ाच्या कृषिक्षेत्रात अक्षरश: हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. पिके वाया गेलीच आहेत, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

गजाननमहाराज पालखीचे उस्मानाबादमध्ये स्वागत

मुखी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी शुक्रवारी शहरात दाखल झाली.

‘ज्यांच्याकडून आपण जीवन घेतो, त्यांच्याच जीवनावर घालाही घालतो’

आज प्रत्येकजण स्वत:चे हक्क जपण्यासाठी आग्रही दिसून येतो; परंतु नदी, पर्यावरणाच्या हक्काचे काय असा प्रश्न उपस्थित करतानाच ज्यांच्याकडून आपण जीवन घेतो, त्यांच्याच जीवनावर घाला घालतो, अशी खंत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केली.

‘अजित पवारांच्या सूचनेमुळेच १८९ प्रकल्प वादग्रस्त’

राज्य जलआराखडय़ाची प्राथमिक अट डावलून १८९ प्रकल्पांना तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या सूचनेमुळे मंजुरी देणे भाग पडले, असे अतिरिक्त शपथपत्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सचिव सुरेश कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवारी दाखल केले.

विज्ञानानंतर वाणिज्यला पसंती; कला शाखेला मुलेच मिळेनात!

दहावीच्या परीक्षेतील भरभक्कम गुणांच्या स्पध्रेनंतर बहुतांशी मुलांचा विज्ञान शाखेकडेच ओढा आहे. ७० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांची पहिली पसंती लातूर पॅटर्नच्या महाविद्यालयांना असून, त्यानंतर जिल्हा व तालुका पातळीवरील महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो.

औरंगाबाद शहरासह उद्योगांच्या पाणीपुरवठय़ात १० टक्के कपात

जायकवाडी जलाशयात केवळ ७.५८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्य़ांतील जायकवाडी जलाशयावर अवलंबून असलेल्या औद्योगिक आणि घरगुती पाणीवापरात १० टक्के कपात करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी सोमवारी घेतला.

आयुक्तालयाच्या मागणीसाठी आयुक्तांची भेट

नवे महसूल आयुक्तालय परभणीला स्थापन करण्यात यावे, या मागणीने आता जोर धरला असून, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने आयुक्त उमाकांत दांगट यांच्याशी शनिवारी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

नागरिकांना जाळपोळ करण्यास भाग पाडणाऱ्या सोनपेठ पोलिसांकडून आता निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. ६०० लोकांवर गुन्हे दाखल करून शनिवारच्या पहाटे तीन वाजल्यापासून घरात घुसून अटकसत्र सुरू केले आहे.

महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस दुटप्पीपणाची

भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या एकूण कार्याविषयी एवढा आदर वाटत असेल तर राज्यात शालेय शिक्षण सक्तीचे आणि मोफत करा.

‘अच्छे दिन’साठी व्यवस्थेच्या बळकटीची गरज – गिरीश कुबेर

व्यवस्था जोपर्यंत व्यक्तिकेंद्रित्व सोडत नाही तोपर्यंत ती बळकट होत नाही. जोपर्यंत व्यक्तीऐवजी व्यवस्थांना प्राधान्य मिळत नाही तोपर्यंत अच्छे दिन येणार नाही, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने वाटचाल

पालकांना आपल्या पाल्याची शालेय प्रगती आता एका ‘क्लिक’वर समजणार आहे. पाल्याला कोणत्या विषयाला कोण शिक्षक आहे, विषयवार अध्यापनाची सद्य:स्थिती काय आहे आदी माहितीही समजणार आहे.

विनाअनुदानित शिक्षकांचे १३ पासून आंदोलन

राज्यातील कायम शब्द काढून अनुदानास निकष पात्र झालेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे या मागणीसाठी मुंबई येथे सोमवारी, १३ जुलपासून आझाद मदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शनिवारी दिली.

Just Now!
X