16 January 2021

News Flash

Minde

निवडणुका आणि जुगार बनावट नोटांचे ग्राहक

निवडणुकांसाठी छुप्या पद्धतीने वाटले जाणारे पैसे आणि जुगारासारख्या धंद्यातून बनावट नोटा व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

उसाला ‘एफआरपी’ देण्यास खासगी साखर उद्योग असमर्थ

गतवर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी साखरेच्या दरात ४० टक्के घट झाली असून २७०० रुपये क्विंटल साखरेचा दर आता १९०० रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांत साखरेच्या उत्पादनात अतिरिक्त वाढ झाली आहे.

पीकविम्याच्या गदारोळावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

गेले १५ दिवस पीकविमा रकमेवरून सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळानंतर अखेर जिल्हा बँकेने विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याचे ठरविले आहे.

पत्नी-मुलासह मोठय़ा भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शेतकऱ्याने पत्नी, मुलगा, तसेच मोठय़ा भावाची निर्घृण हत्या केली. हत्याकांडानंतर मारेकऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले.

ऑनलाईन पद्धतीचा बोजवारा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सुरू केलेल्या ऑनलाईन उमेदवारी अर्ज स्वीकृतीबाबत संगणक प्रणालीपासून अनभिज्ञ व सुविधा नसल्याने पुरता बोजवारा उडाला! १२० ग्रामपंचायतींच्या जवळपास ७००पेक्षा जास्त जागांसाठी ५ दिवसांत एकही ऑनलाईन अर्ज आला नाही.

‘मुख्यमंत्र्यांचे मराठवाडय़ाकडे दुर्लक्ष’

नागपूर येथे महत्त्वाच्या संस्था नेण्यास आक्षेप आहे असे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांचे मराठवाडय़ाकडे लक्ष नाही, असे दिसून येत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

निरीक्षकाचे वाहन जाळून घराची नासधूस; पोलिसांचा हवेत गोळीबार

सोनपेठमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळे युवकाने आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. जमावाने सहायक पोलीस निरीक्षकांचे शासकीय वाहनही जाळले, तसेच शासकीय निवासस्थानातील सामानाची नासधूस केली.

तटस्थ मतदारांवर उमेदवारांची मदार!

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळ निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. प्रस्थापितांना प्रारंभी सोपी वाटणारी व परिवर्तनाचा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या दुसऱ्या गटाला आवाक्यात वाटणारी ही लढाई आता मात्र अनेक तटस्थ, चोखंदळ आणि चिकित्सक मतदारांच्या कलावर जुन्या-नव्या उमेदवारांचे भवितव्य ठरवेल, असे चित्र आहे.

उर्दू शायरीचे कोंदण बशर नवाज यांचे निधन

शायरीवर भाषण करण्याऐवजी असा शेर ऐकवावा की थेट हृदयापर्यंत भावना पोहोचतील, असे स्वत:च्या शायरीचे वर्णन करणारे व ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ अशी गजलसाद घालून आपल्या शायरीची भुरळ उर्दू जगताला, म्हणजे भारत-पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतील चाहत्यांना घालणारे बशर नवाज खान यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले.

मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

राज्यातील संकटग्रस्त शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तसेच त्यांची पत्नी आमदार अमिता चव्हाण गुरुवारी रस्त्यावर उतरले.

भूमी अधिग्रहण लोकजागृती; आज राहुल गांधी संदेशयात्रा

भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हय़ात उद्यापासून (गुरुवारी) शनिवापर्यंत तीन दिवस राहुल गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज देशमुख यांनी ही माहिती दिली.

भाजप आमदार निलंगेकर गोत्यात!

धान्यापासून मद्यार्क निर्मिती करण्यास व्हिक्टोरिया अॅग्रो फूड्स प्रोसेसिंग प्रा. लि. या कंपनीस ४० कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी राज्याच्या पंचायत राज्य समितीचे अध्यक्ष तथा भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी गहाणखताची कागदपत्रे बदलल्याचा ठपका ठेवून सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले आहे.

‘शिफारशींना फाटा देऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण’

राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी फसवी आहे. कृती गटाच्या शिफारशी डावलून, तसेच सदस्यांची दिशाभूल करून सर्वेक्षण केल्याचा आरोप राज्य कृती गट समितीचे सदस्य दीपक नागरगोजे यांनी केला. ४ जुलस केलेले सर्वेक्षण रद्द करून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुन्हा शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याची मागणीही नागरगोजे यांनी बुधवारी येथे केली.

एकनाथ-भानुदासाच्या जयघोषात पैठणहून पालखीचे पंढरपूरला प्रस्थान

एकनाथ-भानुदासाचा जयघोष आणि पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन हजारो वारकऱ्यांसह एकनाथ महाराजांच्या पालखीने बुधवारी पंढरपूरला प्रस्थान ठेवले. भागवत धर्माची गुढी पंढरपूरला नेण्यासाठी आसुसलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हय़ांतील सुमारे १० हजार भाविक बुधवारच्या पालखी सोहळय़ात सहभागी झाले.

जलयुक्त शिवार योजनेत कंत्राटदारांचे ‘पीछे मूड’!

सिंचन प्रकल्पात बेसुमार नफा मिळवणाऱ्या कंत्राटदारांनी जलयुक्त शिवार योजनेतील तब्बल ३४८ निविदा ५ ते २५ टक्के कमी दराने भरल्या आहेत. म्हणजे जे काम करण्यास सरकारी यंत्रणेला १०० रुपये लागतात असे म्हणतात, ते काम कंत्राटदार आता ७५ रुपयांतच करून द्यायला तयार आहेत.

१८६ सिंचन प्रकल्पांबाबत राज्यपालांच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह!

राज्यात सिंचन घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच्या काळात महाराष्ट्र जलसिंचन प्राधिकरणाने जलआराखडय़ाची प्राथमिक अट डावलून तब्बल १८९ प्रकल्प मंजूर केले. या प्रकल्पांची किंमत ५ हजार ६४० कोटी रुपये असून, यातील केवळ तीन प्रकल्पांना राज्यपालांची पूर्वमंजुरी घेण्यात आली.

वाढत्या परीक्षा शुल्कामुळे गरीब विद्यार्थी मेटाकुटीला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे वरचेवर अवघड बनू लागले आहे.

‘लोकांच्या प्रश्नांसाठी सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणार’

विधिमंडळाचे अधिवेशन १३ जुलपासून सुरू होत आहे. नव्या सरकारला ६ महिन्यांची संधी आपण दिली. मात्र, या काळात त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांसाठी काहीही केले नाही.

पन्नास लाख अपहारप्रकरणी बीडचे ३ अभियंते निलंबित

जि. प. अंतर्गत स्थानिक निधीत अनियमितता-गरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर विशेष लेखा परीक्षण करण्यात आले. या तपासणीत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक व लेखा परीक्षण पथकाला वेळोवेळी मागणी करूनही दस्ताऐवज उपलब्ध केला नाही.

पीकविम्याचे पैसे वाटण्याऐवजी व्याजासाठी इतर खासगी बँकेत!

जिल्हा सहकारी बँकेला शेतकऱ्यांना देण्यासाठी २५१ कोटी रुपये विमा कंपनीकडून प्राप्त झाले. मात्र, बँकेने हे पैसे शेतकऱ्यांना न देता स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:च्या नावावर एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकांमध्ये जमा केले.

बीडचे रेशन दुकानदार, रॉकेल विक्रेते ४ दिवसांपासून संपावर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील स्वस्त धान्य दुकानदारांसाठी हमालमुक्त द्वारपोच योजना सुरू करावी, किरकोळ रॉकेल विक्रेत्यांसाठी एक रुपया कमिशन द्यावे व मार्जीन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील अडीच हजार स्वस्त धान्य दुकानदार, तसेच दोन हजार हॉकर्स विक्रेत्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

यूपीएससी परीक्षेमध्ये लातूर पॅटर्न तळपला

यूपीएससी परीक्षेत जिल्हय़ातील सहा विद्यार्थ्यांनी दणदणीत विजय मिळवून लातूर पॅटर्न गाजवला.

शिर्डीत यापुढे मोर्चाना बंदी घालावी

शिर्डी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने शहरात यापुढे मोर्चास बंदी घातली पाहिजे यासाठी प्रशासनास विनंती करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या वैशाली डकरे

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

Just Now!
X