16 January 2021

News Flash

Minde

यंत्रमागासाठी अश्वशक्तीनुसारचे नवे दर जाहीर

नव्या दरानुसार २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमागधारकांचे नवीन बिल अंदाजे प्रति युनिट ३.३१ रुपये तर २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचे २.९६ रुपये असणार आहे, अशी माहिती प्रताप होगाडे यांनी दिली.

‘भाजपा सरकार सर्वच आघाडीवर अपयशी’

केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार सर्वच आघाडीवर अपयशी ठरले असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाळव्यातील सभेत केली. आम्हीही परदेश दौरे केले मात्र त्यासाठी विमान प्रवास करणाऱ्यांना ताटकळत ठेवण्याचे काम कधी केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘ड्रायपोर्ट’चे ९३ कोटी प्रतीक्षेतच!

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टअंतर्गत जालना शहराजवळ ‘ड्रायपोर्ट’ उभारण्यासाठी १५१ हेक्टर जमीन लागणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या जमिनीसाठी पोर्ट ट्रस्टला महसूल विभागाकडे ९३ कोटी जमा करावे लागणार आहेत. या रकमेची महसूल विभागाची प्रतीक्षा कायम आहे.

दुभाजकाच्या बागेसाठी ५८ लाखांची उधळपट्टी

शहरातील राजीव गांधी चौक ते गरुडचौक या रस्त्याच्या दुभाजकात बागबगीचा करण्यासाठी आमदार अमित देशमुख व माजी खासदार जयवंत आवळे यांच्या निधीतून ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले.

‘संरक्षण खरेदीत ७० उत्पादने भारतीय बनावटीची’

संरक्षणविषयक कारभारात बरीच ‘घाण’ करून ठेवल्याची बोचरी टीका करीत संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी यापुढे संरक्षण खरेदीत ७० उत्पादने भारतीय बनावटीची असतील, असे शुक्रवारी सांगितले. ‘डेस्टिनेशन मराठवाडा’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुनगंटीवारांच्या वक्तव्याने ‘साई’च्या मागणीला बगल!

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र औरंगाबाद येथेच व्हावे, या मागणीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे बगल मिळाली आहे. मंजूर असणाऱ्या कोणत्याही संस्था एका जिल्ह्यातून दुसरीकडे हलविल्या जाणार नाहीत, असे ते शुक्रवारी म्हणाले.

चमकोगिरीसाठी ‘मजुरी’ देऊन रुग्णभरती!

आयुर्वेद महाविद्यालयाची तपासणी करण्यास आलेल्या केंद्रीय चिकित्सा समितीच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी चक्क पसे देऊन मजुरांना दाखल करण्यात आले! प्रत्येकी ५०० रुपये मजुरीचे आमिष दाखवून ९ मजुरांना दवाखान्यातील खाटांवर झोपविले गेले खरे; मात्र, कमी ‘मजुरी’ दिल्यामुळे या मजुरांनी कांगावा केला.

गुट्टे यांच्यासाठी नियमही शिथिल

निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या सुनील हायटेक कंपनीला जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे देण्यात आली. साहजिकच या मोहिमेंतर्गत होणाऱ्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे या जिल्ह्यातील जलस्वराज्यची कामे चच्रेत आली आहेत.

हिंगोलीत पाऊस परतला; केळीच्या बागेला फटका

जिल्ह्यात २२ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळिराजा चिंताग्रस्त होता. परंतु मंगळवारी रात्री औंढा परिसरात काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

अटल पेन्शन योजनेला नगण्य प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या तुलनेत याच योजनेबरोबर लोकार्पण झालेल्या दोन विमा योजनांना तुलनेने बरा प्रतिसाद आहे.

हातभट्टय़ा बंद होत नसल्यामुळे कापडसिंगीकरांचे बहिष्कारास्त्र!

जिल्ह्यात अवैध दारूच्या हातभट्टया बंद कराव्यात, या साठी महिलांनी वारंवार तक्रारी दिल्या. पोलीस विभागाने काही ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले. मात्र, अजूनही जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूचा महापूर वाहत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कुंभकर्णी झोपेतून जाग येत नाही.

‘महिला आयोगांचे अधिकार वाढवा’

विविध राज्यांतील महिला आयोगांचे अधिकार वाढविण्याची सूचना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केंद्र सरकारला केली आहे. काही राज्यांमध्ये जलदगती न्यायालयाची गरज आणि महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी, अशीही सूचना केल्याचे त्यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

‘सगळे नागपूरलाच, मराठवाडा कशाला’?

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र औरंगाबादऐवजी नागपूर येथे हलविण्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली. मात्र, शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खरे यांनी यास तीव्र आक्षेप घेतले आहेत.

पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ भाजप-रासपचे ‘रास्ता रोको’

चिक्की व साहित्य खरेदीच्या ऐतिहासिक निर्णयाला कथित घोटाळ्याचे स्वरूप देऊन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सुरू असलेल्या बदनामीच्या निषेधार्थ सोमवारी भाजप व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करीत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे पुतळे जाळून संताप व्यक्त केला.

उमरगा शहरात डान्स बारवर छापा; ७ बारबालांसह १९ जणांना अटक

शासनाने ग्राहकांच्या मनोरंजनासाठी दिलेल्या ऑर्केस्ट्राच्या परवानगीच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा मागील दोन वर्षांपासूनचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

जालना येथे आज मराठवाडा रेल्वे परिषद

मराठवाडय़ासाठी असलेला दक्षिण-मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मुंबई येथील मध्य रेल्वेस जोडण्यात यावा यासाठी सोमवारी येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात सकाळी १० वाजता मराठवाडा रेल्वे परिषद आयोजित करण्यात आली आहे.

शिक्षिकेचा अनोखा उपक्रम; जुन्या-नव्या पुस्तकांचा ‘मेळ’!

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या वर्गात ठेवलेली आणि नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी. एका विद्यार्थ्यांसाठी दोन संच, असा प्रयोग उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी सुरू केला आणि दप्तराचे ओझे कमी ही भानगडच संपली.

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला असला तरीही जमिनीतली ओल आटल्याने आता उगवलेल्या अंकुरांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

टँकर – प्रवासी रिक्षा अपघातात उस्मानाबादजवळ १० ठार

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर शहराजवळ तुरोरी गावाजवळ टँकरने सहा आसनी रिक्षाला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षातील दहा जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

चिक्की खरेदी प्रकरण; मुंडेसमर्थक अस्वस्थ!

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात चिक्की खरेदी प्रकरणावरून आरोप व आंदोलन सुरू झाल्यानंतर जिल्ह्य़ातील मुंडेसमर्थक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘पोषण आहार योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा’

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टीच्या काळात विद्यार्थी नसताना पोषणआहार देण्यात आला. तसेच पोषण आहारातील तांदूळ व डाळींचे वजन कमी आणि मालही निकृष्ट दर्जाचा असल्याने पोषण आहारात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला, असा आरोप शिवसेनेचे आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केला.

‘कथित स्टिंग ऑपरेशनमुळे भाजपमधील खदखद बाहेर’

चिक्की खरेदी प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांबद्दल ‘छोटय़ा छोटय़ा विषयांवर मी काय बोलणार’ अशी ‘बोलकी’ प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिली.

टंकलेखन परीक्षेतील गैरहजेरीचे गौडबंगाल!

निलंगा येथील जि. प. प्रशालेच्या केंद्रावर नुकत्याच घेतलेल्या टंकलेखन परीक्षेत १ हजार ५०१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. मात्र, ३५० विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही! एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय, याची चर्चा आता होत आहे.

चिक्की खरेदीवरून बीडमध्ये पडसाद; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर

मंत्री पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण विभागाने एकाच दिवशी २०० कोटींच्या चिक्की व इतर साहित्य खरेदी केल्याच्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने परळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Just Now!
X