23 January 2021

News Flash

Minde

हप्तेखोरीवर वरकडी, महामार्गावर लूटसत्र!

हप्तेखोरीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या पोलिसांनी आता महामार्गावर लूटमार सुरू केली आहे! गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा प्रत्यय येत आहे.

अवैध दारूविरुद्ध मोहीम; नांदेडात ६० जण ताब्यात

मुंबईतील विषारी दारूकांडानंतर सर्वच जिल्ह्यांत अनधिकृत दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ६० जणांच्या मुसक्या आवळताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त केला.

तुंबारी वाऱ्यामुळे पावसाला ब्रेक

मृग नक्षत्राच्या धडाकेबाज सलामीनंतर आद्र्रा नक्षत्राने मात्र निराशा केली. गेल्या तीन दिवसांपासून तुंबारी नावाच्या वाऱ्याचा जिल्ह्यासह मराठवाडय़ात कहर सुरू असल्याने पावसानेही दडी मारली आहे.

रॅडिको कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या जमिनीत स्पेंट वॉश हे रसायन टाकून प्रदूषण करणाऱ्या रॅडिको एनव्ही कंपनीने त्यांची उत्पादने बंद करावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबालंगन यांनी गुरुवारी बजावले.

‘अजित पवारांशी संबंधित डेअरीकडून बारामतीमध्ये दूध उत्पादकांना कमी दर’

बारामतीमधील खासगी दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांना केवळ १९ रुपये दर देते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित डायमंड दूध डेअरीकडून खरेदी होत असल्याने त्यांना मिळणारा दर कमी आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये जि.प. शाळांची दमछाक!

अहमदपूर तालुक्यातील हाळणी गावात जि.प. शाळेचे ११ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. सात-आठ वर्षांपूर्वी प्राप्त केलेल्या या यशामुळे या शाळेचे राज्यात नाव झाले. परंतु पुढे मात्र या शाळेतून एकही विद्यार्थी चमकला नाही.

नेदरलँडचे फुटबॉलपटू रॉन व्लार यांच्या भेटीने कोळवाडी हरखली

नेदरलँडचे आघाडीचे फुलबॉलपटू रॉन व्लार यांनी बुधवारी पालम तालुक्यातील कोळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेस भेट दिली. या भेटीत रॉन यांनी कोळवाडीत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

एलपीजी बचतीच्या प्रयोगाचे परभणीत यशस्वी प्रात्यक्षिक

इंधनाच्या वाढत जाणाऱ्या किमती, महागाईमुळे गृहिणींना करावी लागणारी काटकसर हा नित्याचाच विषय. थोडे जरी गॅसचे दर वाढले की आपले लक्ष इंधन बचतीकडे जाते.

मराठवाडा ऑटो क्लस्टरचा २२३ कंपन्यांना लाभ

मराठवाडा ऑटो क्लस्टरमधील सुविधांचा लाभ घेण्यासाठी तब्बल २२३ कंपन्या पुढे आल्या आहेत. लोखंडी प्लेट्स कापणे, उत्पादनापूर्वी लागणारी यंत्रसामग्रीवरील प्रयोगाला त्यामुळे गती आली असल्याचा दावा क्लस्टरच्या संचालकांनी बुधवारी केला.

मुंबईत पाऊस आणि मराठवाडय़ात वारा!

मुंबईत धो धो पाऊस आणि मराठवाडय़ात गेल्या तीन दिवसांपासून वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला आहे. नक्षत्र बदलल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून मराठवाडय़ाच्या आठही जिल्हय़ांत कोठेही मोठा पाऊस झाला नाही.

परभणी-जिंतूरला जोरदार पाऊस; पावसामुळे खरीप पेरण्यांना प्रारंभ

पावसाने गुरुवारी जिल्हाभर जोरदार हजेरी लावली. परभणी व जिंतूर शहरांत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. पेरणीयोग्य पावसामुळे जवळपास सर्वच भागांत शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. गुरुवारी पावसामुळे शेतकरी सुखावला. सर्वत्र पाणी पाणी झाले.

किनवट, माहूरमध्ये ३ इंचाहून अधिक वृष्टी

गेल्या आठवडय़ात तीन दिवस लहर फिरलेला पाऊस शनिवारपासून परतला. रविवारी जिल्ह्य़ात सर्वदूर हजेरी लावताना किनवट व माहूरमध्ये त्याने कहर केला. किनवटमध्ये ७९.२८, तर माहूरमध्ये ८३.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्ही तालुक्यात ३ इंचांपेक्षा अधिक पाऊस झाला.

पालकमंत्री लोणीकर यांना नोटीस बजावण्याचे आदेश

जालना जिल्हय़ामधील मंठा व परतूर तालुक्यांतील रेशन दुकानांवर राजकीय आकसातून कारवाई करण्यास पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी भाग पाडले, असा आरोप करीत दाखल झालेल्या याचिकेत लोणीकर यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

तुळजापूर नगरपालिकेचा संपूर्ण दारूबंदीचा ठराव

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विषारी दारूमुळे मुंबईत अनेकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार ताजा असतानाच तुळजाभवानी नगरीत घेतलेला हा ठराव राज्यातील अनेक गावांसाठी पथदायी ठरेल, असा विश्वास पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मराठवाडय़ात लाखो साधकांची योगसाधना

वर्षांतील सर्वात मोठा दिवस, मृग नक्षत्रातील पावसाने आल्हाददायी बनलेले वातावरण, रविवारची सुट्टी आणि एकाच वेळी सर्वानी एकत्र जमून करावयाची साधना असा सुवर्णमध्य साधून मराठवाडय़ात सर्वत्र जागतिक योगदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.

दारूच्या व्यसनापायी पतीकडून पत्नी व दोन चिमुकल्यांचा खून

पत्त्याचा जुगार व दारूचे व्यसन जडलेल्या पतीने पत्नीसह आपल्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केली. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव येथील हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

सर्वपक्षीय युतीविरोधात मेटेंचे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पॅनेल

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना शेवटच्या काळात बन्सीधर सिरसाट यांनीही त्रास दिला. २७ वर्षांपासून सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून सिरसाट यांनी मजूर सहकारी संस्था ताब्यात ठेवली.

दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईचे आदेश

जि. प.चे शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील शाळांना अचानक भेट दिली असता ५ शाळांमध्ये विदारक स्थिती समोर आली. बहुतांश शाळांमध्ये शिक्षक दांडीयात्रेवर होते, तर एका शाळेत बनावट विद्यार्थीसंख्या दाखवून शिक्षकांनी आपली पदे वाचविण्याचा सपाटा लावल्याचे आढळून आले.

भगव्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महालक्ष्मीला साकडे

असंख्य माता भगिनी आणि शिवसनिकांनी लक्षवेधी शोभायात्रा काढून भगव्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले. िहदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ५० वष्रे पूर्ण झाली. भगवा आजही दिमाखात राज्यभूमीवर फडकतोय.

‘माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत लूट’

माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतील सत्ताधारी सभासदांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करीत विरोधी परिवर्तन मंडळाने सत्ताधारी संचालकांचा निषेध करण्यासाठी संस्थेच्या नगर शहरातील मुख्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन केले.

उळे दंगलीत दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर आजारामुळेच

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना याच प्रकरणात न्याय वैद्यक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार त्या दलिताचा मृत्यू मारहाणीतून नव्हे तर शारीरिक आजारामुळे झाल्याचे उघड झाले आहे.

तीन महिन्यांची हमी न मिळाल्याने मुंबई विमानसेवा अखेर बारगळली

यापूर्वी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळूनदेखील अचानकपणे बंद झालेली मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चिकाटीने प्रयत्न केले व त्यानुसार ही विमानसेवा सुरू होण्यासाठी मेहर एअरलाईन्स कंपनीने सकारात्मक पाऊल उचललेदेखील.

‘लघुशंके’विना शिक्षण!

शिक्षणाच्या बाबत विद्यार्थ्यांच्या सर्व शंका एक वेळ दूर केल्या जातील. मात्र, लघुशंकेचे निराकरण करण्याची यंत्रणा पुरेशी नसल्यामुळे ‘लघुशंकेविना शिक्षण’ घेण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येत आहे.

पेरलेले पीक उद्ध्वस्त; बंधाऱ्याचा निधी पाण्यात

जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा जिल्ह्यात गाजावाजा झाला, मात्र अनेक ठिकाणी तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय आयुक्तांनी लोहगाव येथील बंधाऱ्यास भेट देऊन निकृष्ट कामाबद्दल कंत्राटदारासह यंत्रणेला खडसावले.

Just Now!
X