16 January 2021

News Flash

Minde

पंधरा लाख छात्रांचा ‘योग’ लिम्का बुकमध्ये झळकणार

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (२१ जून) ५२ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे चार जिल्ह्यांतील सुमारे ३ हजार छात्र विविध १३ ठिकाणी योग करणार आहेत. देशभरातील १५ लाख छात्र एकाच वेळी योग करतील.

यशाच्या गुरूकिल्लीत जाहिरातदारांची रेटारेटी!

हमखास यशाची गुरूकिल्ली पटवून देताना बारावीतील एका गुणवंत विद्यार्थ्यांची छबी तब्बल तीन शिकवणी वर्गानी आमचाच विद्यार्थी म्हणून झळकावली! मात्र, या जाहिरातबाजीनेच जाहिरातदारांचे हसू झाले; परंतु विद्यार्थी-पालकांचीही करमणूक झाली. लातूर शहरात शंभरावर शिकवणीवर्ग चालविले जातात.

गुणकारी जांभळाला २०० रुपये भाव!

‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या प्रसिद्ध गाण्याचे शब्द कानावर पडले तरी जीभ आपोआप ओली होते. गाण्यातील सहज कानावर पडणारे शब्द बाजारात मात्र चांगलेच वधारले आहेत. आंबटगोड चव देणाऱ्या या रानमेव्याने यंदा मोठा भाव खाल्ला आहे.

बोडखीमधील बांध फुटल्याने ५० एकरांतील पीक भुईसपाट

हिंगोली तालुक्यातील बोडखी येथील गट क्रमांक १७५मधील कृषी विभागाने बांधलेला मातीनाला बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने सुमारे ५० एकर शेतातील पीक भुईसपाट झाले.

महिला सबलीकरणात छळाचे प्रमाण वाढतेच!

महिला सबलीकरणाची कितीही धोरणे असली, तरी महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. दिवसेंदिवस कौटुंबिक छळाच्या घटना वाढतच आहेत. जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत एकाच दिवशी चार विवाहितांनी आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध छळाच्या तक्रारी दिल्या.

रामपुरी शाळेस तिसऱ्या दिवशीही कुलूप; ‘शाळा बंद’ बाबत ठराव

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथील ग्रामस्थांनी बुधवारी तिसऱ्या दिवशीही शाळा बंद आंदोलन केले. नियुक्त्या असतानाही शिक्षक हजर होत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, शिक्षक हजर होत नाहीत, तोपर्यंत शाळेला कुलूप राहील, असा ठराव विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला.

आठ दिवसांत दुसऱ्यांदा कयाधूला दुथडी पाणी

जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांत िहगोलीची कयाधू नदी दोन वेळा दुथडी भरून वाहिली. जिल्ह्याच्या काही भागांत मात्र शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

विविध समित्यांवरील नावे मुनगंटीवार निश्चित करणार

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सत्ताप्राप्तीनंतर ‘गोची’ करताना पक्षात नव्याने आलेल्या ‘उपऱ्यां’ना संधी मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या.

इंग्रजी शाळांची दुकानदारी, सरकारी शाळांची धावाधाव!

शहरापासून गावपातळीपर्यंत मोठय़ा प्रमाणात इंग्रजी शाळांची दुकानदारी सुरू झाल्याने सरकारी शाळांना विद्यार्थी मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

महापौर शेख मिस्त्री यांचे जात प्रमाणपत्र बनावट

लातूरचे महापौर शेख अख्तर जलालसाब मिस्त्री यांनी जातीची बनावट कागदपत्रे जोडून निवडणूक लढविल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार बैठकीत केले.

औरंगाबाद जिल्ह्य़ात ५१ ग्रामपंचायतींकडून ‘मिनरल वॉटर’!

औरंगाबाद जिल्ह्य़ातील ५१ ग्रामपंचायतीत केवळ ५ ते ८ रुपयांत २० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रत्येकाच्या दारापर्यंत केला जातो. बाटलीबंद पाण्याची ही योजना एवढी लोकप्रिय आहे की, नावीन्यपूर्ण योजनेतून आणखी ३३ गावांमध्ये शुद्ध पाण्याचे प्रकल्प उभे केले जाणार आहेत.

देशपांडेंच्या घबाडात वाढ

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्यासमवेत गुन्हा दाखल झालेले माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घबाडात आणखी दीड किलो सोन्याची वाढ झाली आहे.

हिंगोलीत जोरदार पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. सेनगाव, कळमनुरी व वसमत तालुक्यांतील काही भागांत शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला प्रारंभ केला. काही भागांतील शेतकऱ्यांना मोठय़ा पावसाची अपेक्षा आहे. गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची सोमवारी सकाळी घेतलेली एकूण नोंद ६५.५४ मि.मी. इतकी आहे.

माहिती आयुक्त देशपांडेंकडे घबाड

महाराष्ट्र सदन आणि अन्य गैरव्यवहारांत राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह या विभागाचे माजी सचिव व राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्यासह १७ जणांवर गुन्हे दाखल झाले.

कारखान्यांची धुरा मुंडे मायलेकीकडे

गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुलगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची निवड मागील महिन्यात झाल्यानंतर पानगाव येथील खासगी पनगेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांची अविरोध निवड झाली.

घरच्या बियाण्यातून ९० कोटींची बचत!

जिल्ह्य़ातील ८३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे कंपन्यांकडून घेण्याचे टाळून घरगुती बियाणे वापरले. यामुळे शेतकऱ्यांची सुमारे ९० कोटी रुपयांची बचत झाली. शेतकऱ्यांकडील सोयाबीनची किंमत प्रतिकिलो साधारण ३२ ते ३५ रुपये असते.

अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांची परवड

अंगणवाडीसेविका, मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांची भाऊबीज ओवाळणी देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र दिवाळी होऊन आठ महिने लोटले तरी शासनाची ओवाळणी महिला कर्मचाऱ्यांच्या पदरात पडलीच नाही.

छताची कौले काढून दरोडेखोरांचे पलायन

तहसील कार्यालयाच्या आवारातच असलल्या पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून चार दरोडखोरांनी येथून सिनेस्टाईलने पलायन केले. त्यांना पकडण्यासाठी तीन पथके पोलिसांनी रवाना केली आहेत.

खरिपाच्या पेरण्यांना जिल्ह्य़ात सुरूवात

जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या पावसावर खरिपाच्या बियाणे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

उत्कृष्ट मराठी साहित्यसेवेसाठी ‘लोकमंगल’कडून दोन पुरस्कार

सोलापुरातील लोकमंगल उद्योग समूहाअंतर्गत लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाच्या वर्षांपासून लोकमंगल साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे.

सोलापुरात आधारकार्ड नोंदणी; केंद्रचालकांचा ‘गोरख धंदा’

प्रत्येक बाबीसाठी आधारकार्ड अत्यावश्यक ठरले असून आता आगामी नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना आधारकार्ड बनवून घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची आधारकार्ड नोंदणी केंद्रांवर झुंबड उडाल्याचे दिसत असताना नेमक्या याच परिस्थितीचा लाभ घेत आधारकार्ड नोंदणी केंद्रांकडून नागरिकांची सर्रास लूट केली जात असल्याचे दिसून येते.

वैरागजवळ बारा इमाम देवस्थानातून ३५ किलो चांदी व १४ तोळे सोने लंपास

बार्शी तालुक्यातील पिंपरी आर येथील ग्रामदैवत बारा इमाम देवस्थानातून अज्ञात चोरटय़ांनी १४ तोळे सोने व ३५ किलो चांदीचे साहित्य लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

‘आदिवासी शेतक ऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ कार्य करील’

आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे ही अविरत प्रक्रिया आहे. विद्यापीठाने वाई हे आदिवासी गाव दत्तक घेऊन दीड वर्षांत आदिवासी उपयोजनेतंर्गत शेतीउत्पादन वाढीसाठी अनेक कार्यक्रम घेतले.

मराठवाडय़ातील बँकांकडून पीककर्जात हात आखडताच!

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मराठवाडय़ात २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्यांची कारणे शोधण्याचा अभ्यास सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर आहे, अशी वक्तव्ये नेते करीत आहेत.

Just Now!
X