28 February 2020

News Flash

Prashant

महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

महाराष्ट्राने लागोपाठ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवीत ४६व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र गेले दोन वर्षे विजेतेपदापासून वंचित राहणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाला अखेर उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. रेल्वे संघाने त्यांना पराभूत करत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली.

गंभीरविरोधात धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने गमावल्यानंतर भारतीय संघावर होणारी टीका संपता संपत नाहीये. त्यातच आता भारतीय संघाला खेळाडूंमधील वादाचे ग्रहण लागले आहे. गौतम गंभीरची मैदानावरील नीतिमूल्ये आणि वर्तणूक यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाराज असून त्याने गंभीरविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार केल्याचे समजते.

लढाई मालिका वाचवण्याची

दुसरी आणि तिसरी कसोटी गमावल्यामुळे भारतीय संघावर सातत्याने होणारी विखारी टीका.. महेंद्रसिंग धोनीचे धोक्यात आलेले कर्णधारपद.. धोनी आणि गंभीर यांच्यातील वाद.. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीविषयी उठणाऱ्या उलटसुलट चर्चा.. अशा समस्येच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्यासाठी झुंज द्यावी लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला गुरुवारपासून नागपुरातील जामठा

योगेश मोरेला एकलव्य तर प्रियंका येळे राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी

रेल्वेचा अष्टपैलू योगेश मोरे याने राष्ट्रीय स्तरावरील पुरुष गटाचा सर्वोत्तम खेळाडूसाठी असलेला एकलव्य पुरस्कार मिळविला. महिलांमध्ये महाराष्ट्राची कर्णधार प्रियंका येळे हिने राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचा मान मिळविला. प्रियंका येळे हिला यापूर्वी १४ वर्षांखालील गटाचा इला पुरस्कार व १८ वर्षांखालील गटाचा जानकी पुरस्कार मिळाला आहे.

सायनाला पराभवाचा धक्का

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला वर्षअखेरीस सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या टिने बूनने सायनावर २१-१४, ११-२१, २१-१९ अशी मात केली.

खो-खो संघटकांपुढे आव्हान लोकप्रियता टिकविण्याचे!

खो खो खेळाची लोकप्रियता संपत चालली आहे अशी टीका करणाऱ्यांना बारामती राष्ट्रीय स्पर्धेद्वारे चोख उत्तर दिले आहे, असाच प्रत्यय येत आहे. दररोज किमान दहा हजार प्रेक्षक या खेळाचा आनंद घेताना दिसून आले. खो खो खेळावर प्रेम करणाऱ्यांचा उत्साह टिकविण्याचे आणि पर्यायाने या खेळात आधुनिकता आणण्याचेच आव्हान संघटकांपुढे आहे.

तिसरी विश्वचषक कबड्डी स्पर्धा विजयवाडामध्ये

कबड्डी रसिकांना थरारक चढाई-पकडीचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. निमित्त आहे तिसऱ्या पुरुष कबड्डी विश्वचषकाचे. विजयवाडा येथे पुढील वर्षी २७ ते ३१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. जगभरातील २० संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रण पाठवण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ, आशियाई कबड्डी महासंघ तसेच भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांनी सांगितले.

धोनीचे कर्णधारपद श्रीनिवासन यांनी बचावले

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनी याला कर्णधारपदावरून काढून टाकावे, अशी शिफारस या वर्षीच्या जानेवारी महिन्यात निवड समितीने केली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी निवड समितीने एकमताने केलेली शिफारस फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे तत्कालीन सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी केल्यामुळे धोनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नात्यागोत्यांची ‘माया’

राजकारणी व नोकरशहांना व त्यांच्या बगलबच्च्यांना सरकारी कामांत झुकते माप देत उजळ माथ्याने भ्रष्टाचार करणारी व्यवस्था अर्थात ‘क्रॉनी कॅपिटालिझम’ बंद पाडण्याची गरज व उपाय सुचविणारा लेख..

विनोद राय

कुठलीही संस्था सुरळीत चालायची असेल, तर तिला आर्थिक शिस्त ही असावीच लागते, पण ती लावण्याचे अप्रिय काम जे करतात ते काही वेळा अनेकांना सलत राहतात. सध्याचे महालेखापरीक्षक असलेले विनोद राय हे प्रसंगी पदरी कटुता घेऊन काम करणारे अधिकारी आहेत.

मनमोराचा पिसारा.. परतत्त्वाचा नादस्पर्श

सतारीचे सूर कानी पडण्याआधी केशवसुतांची ‘सतारीचे बोल’ ही कविता वाचली आणि अनुभवली होती. त्या सुमारास वर्डस्वर्थची ‘डॅफोडिल्स’च्या फुलांचे रंग मनाला मोहवून गेले होते. निसर्ग आणि संगीतामधल्या जादूची अनुभूती घ्यायला मन सज्ज झालं होतं आणि नंतर कधी तरी पंडितजींच्या सतारीची मैफील ऐकली.

कुतूहल : जोखीम व्यवस्थापन-१

सध्याच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात पावलोपावली धोकेच धोके जाणवत आहेत. या धोक्यांचे किंवा जोखमींचे व्यवस्थापन हा सामान्य माणसापासून ते अगदी उद्योगपतींपर्यंत सर्वाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काही जण ते मान्य करतील, तर काही जण ते मान्य करणार नाहीत, पण ही वस्तुस्थिती आहे हे तितकेच खरे.

सफर काल-पर्वाची : सेन्ट जॉन ऑफ आर्क

फ्रान्सचे व्हालोई घराणे आणि इंग्लंडचे प्लान्टाजेनेट घराणे यांच्यामध्ये इ. स. १३३७ ते १४५३ या काळात वारसाहक्काच्या वादातून झालेल्या युद्धात पराभूत होत चाललेल्या फ्रान्सला जोन या तरुणीने अद्भुत असे नेतृत्व देऊन लढायांमध्ये विजय मिळविले. फ्रान्सच्या मूळ व्हालोई घराण्याचा पदच्युत राजा चार्ल्स सातवा याला १४२९ मध्ये रेहम्स कॅथ्रेडल येथे परत राज्याभिषेक केला गेला, पण बरगंडी या

इतिहासात आज दिनांक.. १३ डिसेंबर

१६४२ युरोपियन संशोधक एबल ऊर्फ अ‍ॅबल यानझून टासमन यांनी न्यूझीलंड बेटांना जगासमोर आणले. ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या बेटाला टास्मानिया हे नाव त्यांच्याच कर्तृत्वावरून देण्यात आले. १६०३ ते १६५९ अशी त्यांची कारकीर्द होती. त्यांचा जन्म ल्यूटजिजॉस्ट येथे झाला.

स्वानंदी सतारिया

वाद्य आणि वादक यांचा स्वभाव जेव्हा मिळतो तेव्हा रविशंकर यांच्यासारखा कलाकार तयार होतो. मुळात सतार हे वाद्यच मोकळे आणि प्रसन्न. सरोद हेदेखील तंतुवाद्यच. सतारीची बहीण म्हणावे असे. पण सरोदच्या स्वराला एक प्रौढतेची किनार असते. व्याकूळ करणारी. सतारीचे तसे नाही. ती आजन्म नवतरुणीच. जगात सर्वत्र फक्त आनंदच भरून राहिलेला आहे

लोकमानस

शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचे स्मारक दादर भागातील कोहिनूर मिलच्या जागेत व्हावे, अशी मनोमन इच्छा शिवसनिकांची आहे व ती योग्यच आहे. या मिलसमोर हमरस्ता असल्याने ते कुणालाही सहज पाहाता येईल. शिवाय सेनाभवन नजीकच आहे. परंतु यावर मनोहर जोशी यांची प्रतिक्रिया न समजण्यासारखी आहे. कोहिनूर मिलची जागा माझी नाही आणि ती जागा स्मारकासाठी योग्य नाही असे त्यांनी पुणे येथील मुलाखतीत सांगितले, ते अनाकलनीय आहे.

विळखा.. भूजल प्रदूषणाचा

भूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा कर्करोग बेमालूमपणे आपल्याला विळखा टाकतो आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील दौंड तालुक्यातील कुरकुंभ गाव आणि तिथे असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) क्षेत्र प्रसिद्ध आहे. तिथे अनेक मोठय़ा कंपन्या आहे, विशेष म्हणजे त्यात रासायनिक कंपन्यांचासुद्धा समावेश आहे.

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक:२७४. दोन बिया

अपने मरने की खबर न जाना, असं विचारताना कबीरांचा हेतू हा आहे की, मृत्यूनंतर उपयोगी पडेल याच हेतूनं केवळ दान आणि पुण्य करणारे जगताना स्वतच्या ‘आनंदा’साठी स्वार्थानं दुसऱ्यांची लुबाडणूकही करतात आणि पापही बेलाशक करतात! मंदिरं उभारण्यासाठी मोठय़ा देणग्या देऊन ‘पुण्य’ साठवणारे उद्योगपती आपल्या भरभराटीसाठी ‘पापकृत्यं’ही करीत नाहीत का? मग पाप आणि लुटमारीचं फळ भोगण्यासाठी जसं जन्मावं लागतंच त्याचप्रमाणे दान आणि पुण्याचं फळ

योग्य सूचना

ध्वनिप्रदूषणाच्या वाढत्या घटना ही शहरवासीयांची डोकेदुखी असते. शहरात रोज, कुठे ना कुठे, ध्वनिवर्धक लावून धिंगाणा सुरू असतो. धार्मिक कार्यक्रमाबरोबर कौटुंबिक कार्यक्रमासाठीही ध्वनिवर्धकांची भिंत उभी केली जाते आणि पोलिसांकडे कुणी तक्रार केल्याशिवाय हा आवाज स्वत:हून कोणीही थांबवीत नाही.

मुंबईची निवाराकोंडी!

‘मुंबईत नोकरी करणारे ९० टक्के लोक येथे जागा घेऊ शकत नाहीत. येथे घरांचे भाव इतके प्रचंड आहेत की मलाही घर घेता आले नाही,’ असे विधान देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष ओ. पी. भट्ट यांनी निवृत्तीपूर्वी काही दिवस आधी केले होते.

सतारीने जग जिंकणारे पं.रविशंकर यांचे निधन

पौर्वात्य आणि पाश्चिमात्य जगाला आपल्या स्वर्गीय संगीताच्या सेतूने जोडणारे ख्यातनाम सतारवादक पंडित रविशंकर यांचे बुधवारी अमेरिकेतील रुग्णालयात वद्धापकाळ तसेच आजारपणाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. या अवलिया कलावंताने भारतीय शास्त्रीय संगीताची पताका पाश्चिमात्य जगात डौलाने फडकाविली होती.

मणिनगरमध्ये मोदींना भीती नाही?

सलग तिसऱ्यांदा गुजरातची सत्तासूत्रे हाती घेऊ पाहाणारे नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंगलखोरीचा मुद्दा उपस्थित करण्याची विरोधकांची धडपड शिगेला पोहोचली असतानाही आणि मोदी यांच्याविरोधात दंड थोपटणारे पोलीस अधिकारी संजीव भट्ट यांच्या पत्नीला काँग्रेसने तिकिट दिले असतानाही मणिनगर मतदारसंघातील मोदी यांचा विजय गृहीत धरला जात आहे.

कापसाला सहा हजार भाव द्या

साखर उद्योगाला नियंत्रणमुक्त करण्याच्या डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींची महाराष्ट्रात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापसाच्या आधारभूत किंमतीत वाढ करून प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव जाहीर करण्यात यावा, अशा मागण्या महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटून केल्या.

पाकिस्तानच्या डॉ. चिश्ती यांची २० वर्षांनी सुटका

सुमारे २० वर्षांपूर्वी अजमेरमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेले पाकिस्तानचे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ मोहम्मद खलील चिश्ती यांची सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हत्येच्या आरोपातून सुटका केली. गेली २० वर्षे आपल्यावरील आरोपांमुळे भारतात अडकून पडलेले ८२ वर्षीय चिश्ती यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

Just Now!
X