08 March 2021

News Flash

Thombre

‘मराठवाडय़ातील पाहणीनंतर नव्याने आढावा घेऊन निर्णय’

लागेल ती मदत सरकारकडून दिली जाईल. सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास बाळगा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.

परभणीतही ‘चारा-पाण्या’चे संकट गंभीर होण्याची चिन्हे

जिल्ह्यात आटत चाललेले जलसाठे, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पाहता येत्या काळात ‘चारा-पाण्या’ची समस्या भविष्यात तीव्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.

कृष्णा प्रकल्पात मराठवाडय़ाची २१ टीएमसी पाण्यावर बोळवण!

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजन क्षीरसागर यांनी दिला.

‘सावकारी कर्जमाफीबाबत सरकारच्या घोषणा फसव्याच’

दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीत राज्य सरकारविरोधात तालुका व जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

पोलीस, पाऊस अन् तरुणांची गर्दी!

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे भाषण झाले. ते ऐकण्यास जमलेल्या तरुणांच्या गर्दीतून या उत्साहाचे दर्शन घडले.

पुरुषोत्तम करंडक : अभियांत्रिकी महाविद्यालयांचे वर्चस्व

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), व्हीआयआयटी, पीआयसीटी, व्हीआयटी आणि सिंहगड या पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करीत अभियांत्रिकीचे वर्चस्व गाजविले.

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे संगीत पुरस्कार डॉ. अलका देव-मारुलकर यांना जाहीर

गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांना यंदाचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘स्मार्ट सिटी’च्या विषयावरून िपपरीत ‘भाजप विरुद्ध सगळे’

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

शैक्षणिकदृष्टय़ा मागास जिल्ह्य़ांसाठीची ‘मॉडेल स्कूल’ योजना निधीअभावी बंद

विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मॉडेल स्कूल’ ची योजना शासनाने निधीअभावी बंद केली आहे.

पोलिओसदृश रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ

लोहारा तालुक्यातील जेवळी पश्चिम तांडा येथे पोलिओसदृश रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

परळीत महाप्रसादातून ५००हून अधिक भाविकांना विषबाधा

सप्ताहानिमित्त साबुदाणा खिचडीचा प्रसाद खाल्ल्यामुळे पाचशेपेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाल्याचा प्रकार परळी तालुक्यातील गाढेिपपळगाव येथे घडला.

‘प्रभारीराज’मुळे आनंदीआनंद!

सर्वानाच खूश ठेवण्यासाठी काम करणे व न करणे असे दोन्ही प्रकार घडत असल्याने ‘प्रभारीराज’मुळे जि. प.मध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे.

दोन लाख निरक्षरांना साक्षरता प्रवाहात आणणार

२ लाख ८ हजार ३४४ निरक्षरांना साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना अक्षरओळख करून दिली जात आहे. या अभियानातून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली.

नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ; परळी तहसीलमधील साहित्य जप्त

आदेश देऊनही संबंधित व्यक्तीस नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने परळी तहसील कार्यालयातील संगणकासह इतर साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली.

जिल्हाध्यक्षांना काळे फासले; शिकवणी बंद आंदोलन

खासगी शिकवणीचालक आणि विद्यार्थी संघटना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद विकोपाला चालला आहे.

‘दारूचे दुकान सुरू करा’; महिलांचा ग्रामसभेत ठराव!

सरकार दारूबंदीला आळा घालू शकत नसेल, तर अधिकृत सरकारमान्य दुकान सुरू करा, असा ठराव महिलांनी ग्रामसभेत मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला.

‘मराठवाडय़ात घोषणांचा पाऊस’

दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली.

शिक्षण विभागातील अनागोंदी; स्वीकृत सदस्य वडजेंना नोटीस

जि. प. शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य व शिक्षक संघटनेचे नेते जीवन वडजे यांना वेगवेगळ्या ३२ आरोपांखाली शिक्षणाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली.

कृतीचाच दुष्काळ!

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनांचा ढीग लागला आहे. परंतु निवेदनाची दखल घेण्यास कमालीचा विलंब होत असल्याने प्रशासनाचा सुस्तपणा समोर येत आहे.

‘दुष्काळग्रस्तांना घरटी ५० हजारांची मदत द्यावी’

दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत सरकारने द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

महिलांसाठी जीम उभारण्यास परभणी महापालिकेची मंजुरी

महिलांसाठी जीम उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्वाचा आधार

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीचा उपयोग केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

दुष्काळाच्या प्रश्नी आता काँग्रेसचे नेतेही रस्त्यावर!

मराठवाडय़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेल्या दौऱ्यानंतर काँग्रेसनेही दुष्काळ परिषदा व मोर्चाचे आयोजन केले आहे.

कांद्याच्या कोठाराला अवकळा

दरवर्षी कांदा पुरविणाऱ्या उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यांतील कांद्याचे कोठार यंदा पावसाअभावी ओसाड पडले.

Just Now!
X