scorecardresearch

विनायक परब

गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

सोल्युशन का पता नहीं!

मोसमी पावसाआधी गेले तीन महिने करोनाकहराच्या बातम्यांचा पाऊस ई-पेपर (या आठवडय़ापासून सुरू झालेली छापील वर्तमानपत्रे) आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून सतत सुरू…

कै सी तेरी खुदगर्जी?

योगायोग किती विलक्षण आहे पाहा.. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येस निसर्ग या चक्रीवादळावर, त्याने दिलेल्या इशाऱ्यावर, वातावरणबदलावर आणि तापमानवाढीवर चर्चा सुरू…

सावधपण सर्वविषयी!

लडाख ते अरुणाचल ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ३४८८ कि.मी.ची आहे. चीनच्या बाजूस सीमेपर्यंत रस्तेबांधणी झाली असून आता रेल्वेमार्गही तयार आहे.…

पाळू शिस्त, राहू मस्त

आपण इतिहास शिकतो तो केवळ गुण मिळवून उत्तीर्ण होण्यासाठी; तो खरा शिकायचा असतो तो त्यातून धडे घेण्यासाठी. ४० दिवसांचा  आपला…

केंद्र‘शाही’!

टाळेबंदीचे ४० दिवस संपत असताना केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांसमोर पुन्हा तोच पेच यक्षप्रश्न म्हणून उभा राहणार आहे- आरोग्य…

कठीण समय येता..

करोनासंसर्ग हा केवळ भारत, चीन, इटली, स्पेन, अमेरिकेपुरता मर्यादित नाही, तर त्याचा विळखा संपूर्ण जगाला पडला आहे.

माहितीची साथ

‘इन्फोडेमिक’ – अर्थात माहितीची साथ. करोनासारखे साथीचे विकार जेवढे भयावह तेवढीच ही माहितीची साथही भयावह

कोविडकोंडी!

सध्या कोविड-१९ विरोधातील युद्ध सर्व पातळ्यांवर जगभरात सुरू आहे. या युद्धाचा विशेष असा की, ज्याच्याविरुद्ध लढायचे तो साध्या डोळ्यांना दिसत…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या