Mahindra Scorpio-N 2022 Price, Feature & Variants: दीर्घ प्रतीक्षेनंतर, महिंद्राने अखेर नवीन स्कॉर्पिओ एन (2022 Scorpio N) एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत लॉंच केली आहे. जबरदस्त लुक आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह कंपनीने ही एसयूव्हीजी पाच ट्रिस्ममध्ये लॉंच केली आहे – Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L, तर ती पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिंद्राने नवीन स्कॉर्पिओ एनला अर्बन एसयूव्ही म्हणून संबोधले आहे जी पूर्णपणे नव्याने तयार करण्यात आली आहे आणि त्यासोबत सर्व काही नवीन देण्यात आले आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशनच्या मॉडेलचे बाह्य आणि आतील भाग पूर्णपणे नवीन आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची टक्कर टाटा हॅरियर, टाटा सफारी, ह्युंदाई क्रेटा आणि ह्युंदाई अल्काझार यांसारख्या कारशी होणार आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ एनची तुलना स्कॉर्पिओ क्लासिकशी केली, तर ही २०६ मिमी लांब, ९७ मिमी रुंद आणि ७० मिमी व्हीलबेससह बाजारात उतरवण्यात आली आहे. नवीन जनरेशनमध्ये १७-इंच डायमंड कट अलॉय व्हील, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम आणि शार्कफिन अँटेना यांसारखे बाह्य बदल देण्यात आले आहेत. डीप फॉरेस्ट, डॅझलिंग सिल्व्हर, रॉयल गोल्ड, नेपोली ब्लॅक, एव्हरेस्ट व्हाइट, रेड रेज आणि ग्रँड कॅनन या सात रंगांमध्ये ही एसयूव्ही ऑफर करण्यात आली आहे.

CNG Vs Petrol : सीएनजी कार पेट्रोल कारपेक्षा जास्त फायदेशीर कशा? जाणून घ्या फायदे

अधिक प्रशस्त केबिन

व्हीलबेस वाढल्याने, नवीन स्कॉर्पिओ एनचे केबिन अधिक प्रशस्त झाले आहे आणि महिंद्राने ते प्रीमियम बनवले आहे. ३डी सराउंड साऊंड सिस्टीमसह १२ स्पिकर्स असलेले सोनी सिस्टीम, अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, २०.३२-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, सेगमेंटमधील सर्वात रुंद सनरूफ, लेदरेट सीट आणि एसयूव्हीच्या केबिनमध्ये ७० हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

दमदार इंजिन

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, स्कॉर्पिओ एनमध्ये अ‍ॅमस्टेलियन पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे २०० पीएस पॉवर आणि ३८० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, एमहॉक डिझेल इंजिन १७५ पीएस पॉवर आणि ४०० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही नवीन एसयूव्ही या सेगमेंटमधील सर्वात कमी प्रदूषण करणारी कार म्हणून समोर आली आहे. कंपनीने हे दोन्ही इंजिन ६ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह सुसज्ज केले आहेत. यासोबतच या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच या एसयूव्हीमध्ये शिफ्ट बाय केबल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत

महिंद्रा स्कॉर्पिओ एनमध्ये सहा एअरबॅग्ज, ईबीडी सह एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, हिल होल्ड कंट्रोल, ब्रेक डिस्क वाइपिंग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक प्रीफिल, ई-कॉल, एसओएस स्विच आणि रोल ओव्हर मिटिगेशन आणि इतर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, नवीन एसयूव्हीमध्ये अनेक ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत, ज्यात टार्मॅक, स्नो, मड आणि डेझर्ट यांचा समावेश आहे. नवीन कारला ४ एक्सप्लोर टेरेन मॅनेजमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कुटरनंतर OLA Electric Car कितपत सुरक्षित? जाणून घ्या तपशील

३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या डीलरशिपवर किंवा ऑनलाइन २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ एनसाठी बुकिंग सुरू होईल, म्हणजे सणासुदीच्या काळात ती ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. तथापि, ५ जुलै २०२२ पासून, ही एसयूव्ही तुमच्या कार्टमध्ये महिंद्रा डीलरशिपद्वारे किंवा ऑनलाइन जोडली जाऊ शकते. ग्राहक ५ जुलैपासून भारतातील ३० शहरांमध्ये आणि १५ जुलैपासून देशभरातील नवीन स्कॉर्पिओ एनची टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतील. नवीन स्कॉर्पिओ एनची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत ११.९९ लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलसाठी १९. लाख रुपयांपर्यंत जाते. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर महिंद्रा ग्राहकांना पहिली २५,००० बुकिंग ऑफर करणार आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2022 mahindra scorpio n launches in india the first 25000 customers will get a special offer find out the details pvp
First published on: 28-06-2022 at 12:36 IST