दक्षिण आशियाई वाहनांच्या बाजारात ह्युंदाई कंपनीचा दबदबा वाढू लागला आहे. भारतीय वाहन बाजारात ह्युंदाई ही दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. दर महिन्याला ही कंपनी भारतात सरासरी ४० हजार ते ५० हजारांपर्यंत प्रवासी वाहनांची विक्री करते. हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये ह्युंदाईचा वरचष्मा आहे. आता या कंपनीने त्यांची एपीव्ही कार लाँच केली आहे.

एमपीव्ही सेगमेंटमध्ये मारुतीकडे अर्टिगा, एक्सएल ६ सारख्या गाड्या आहेत. तर किआ कंपनीची करेन्स लोकांची पसंती मिळवत आहे. आता या सेगमेंटमध्ये ह्युंदाईने एंट्री केली आहे. कंपनीने २०२३ स्टारगेझर ही कार लाँच केली आहे. सध्या ही कार कंपनीने थायलंडमध्ये लाँच केली आहे. या कारची किंमत ७,६९,००० थाय बात म्हणजेच जवळपास १८.४५ लाख रुपये इतकी आहे. ही कार कंपनीने ६ आणि ७ सीटर अशा दोन प्रकारात सादर केली आहे.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

हे ही वाचा >> Car Insurance घेताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, अन्यथा कंपनी..

मिळतील दमदार फीचर्स

२०२३ ह्युंदाई स्टारगेझर कार प्रीमियम लूक आणि डिझाईनसह येते. या H आकाराचा एलईडी लाईट बार आहे. यात अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यामध्ये १.५ लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड एमपीआय पेट्रोल सिंगल इंजिन ऑप्शन देण्यात आला आहे. हे इंजिन ११३ बीएचपी पॉवर आणि १४४ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यात आयव्हीटी (सीव्हीटी) गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच या कारमध्ये वायरलेस चार्जर, एम्बियंट लायटिंग आणि स्मार्टसेन्स एडीएएस हे सुरक्षा फीचर देखील देण्यात आलं आहे.