मारुती ८००, आल्टो या सारख्या चांगल्या मायलेज देणाऱ्या कारमुळे मारुती सुझुकीने ग्राहकांच्या मनात घर केले होते. आणि वारसा नव्या जनरेशनच्या कार्सने देखील कायम ठेवला आहे. आजही मायलेजमुळे नागरिक मारुती सुझुकीच्या कार्सना पसंती देतात. या कंपनीच्या कार्स स्वस्त देखील असतात. पण सध्या कारचा प्रतीक्षा कालावधी हा सर्वांना निराश करणारा आहे. तुमची मारुती सुझुकी कंपनीची कार घेण्याची तयारी असेल तर मग कार घेण्यापूर्वी ही गोष्ट तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारुतीवर सध्या कार डिलिव्हरीचा बॅकलॉग वाढतच चालला आहे. ऑटोमोबाइल वेबसाइट ऑटोकारच्या म्हणण्यानुसार, मारुतीला ४.१७ लाख कार्सचे वितरण करायचे आहे. प्रलंबित वितरणाचा हा डेटा 2023 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा आहे. या ४ लाख प्रलंबित डिलिव्हरींमध्ये सीएनजी कारची संख्या अधिक आहे.

(आयफोनच्या किंमतीत मिळू शकतात ‘या’ सेकंड हँड कार; जाणून घ्या किंमत)

सीएनजीची मागणी वाढली

पेट्रोलचे भाव वाढल्याने सीएनजी कारची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकीकडे सीएनजी कारच्या १.२५ लाखांहून अधिक युनिट्स प्रलंबित असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ऑटोकारला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

किती कार प्रलंबित

मारुती सुझुकी ब्रेझाबाबत ग्राहकांमध्ये मोठा उत्साह आहे. ब्रेझा ३० जूनला लाँच झाली होती. ७० हजार ब्रेझा कारची डिलिव्हरी प्रलंबित आहे. तर ३८ हजार बलेनो कारचे वितरण कंपनीला करायचे आहे.

(या ५ कारला बाजारात जोरदार मागणी, मात्र प्रतीक्षा कालावधी पाहून व्हाल निराश)

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 lakh car delivery pending of maruti suzuki ssb
First published on: 12-09-2022 at 16:54 IST