5 Essential things to keep in car : हिवाळ्यात अनेक लोक देश भ्रमंती करतात, प्रसिद्ध ठिकाणी फिरायला जातात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कारने लाँग ट्रिपवर जाण्याची योजना बनवत असाल तर अशा काही वस्तू आहेत ज्या सोबत ठेवल्यास तुमचा प्रवास सुखद आणि अडचणीशिवाय पूर्ण होऊ शकतो. याला इमरजेन्सी कीट देखील म्हणतात. चला तर या कीट विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

१) कारचे कागदपत्र

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

तुम्ही जेव्हाही घराबाहेर जाल तेव्हा कारची कागदपत्रे सोबत ठेवा. या कागदपत्रांमध्ये ड्रायव्हिंग लायसंस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आरसी, वाहनाचा विमा, आणि प्रदूष सर्टिफिकेट असावे. याबरोबर आपले ओळख पत्रदेखील सोबत ठेवावे. कारमध्ये युजर मॅन्युअल देखील ठेवा.

(Petrol-Diesel Price on 25 December 2022: विकेंडच्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? पहा तुमच्या शहरांतील किंमती)

२) फायर एक्सटिंग्विशर

कारमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. अशात आग विझवणारे फायर एक्सटिंग्विशर यंत्र कामी येऊ शकते. प्रवासावेळी आग लागण्याची घटना घडल्यास हे यंत्र कामी येऊ शकते.

३) फर्स्ट एड बॉक्स

कारमध्ये नेहमी फर्स्ट एड बॉक्स ठेवले पाहिजे. प्रवासादरम्यान तुम्हाला लागले, जखम झाल्यास फर्स्ट एड बॉक्स कामी येऊ शकते. यात तुम्ही आवश्यक औषधी देखील ठेवू शकता.

(Maruti Car: फक्त ६० हजारात खरेदी करा मारुतीची ‘ही’ जबरदस्त मायलेजवाली कार)

४) टायर इन्फ्लेटर

नेहमी आपल्या कारमध्ये टायर इन्फ्लेटर ठेवा. याचा वापर करून तुम्ही टायरमध्ये हवा भरू शकता. टायर पंक्चर असल्यास या उपकरणाच्या मदतीने किमान मेकॅनिकपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते.

५) टूलकिट

आपल्या कारमध्ये नेहमी बेसिक टूलकिट ठेवा. कारचे टायर बदलताना किंवा इतर पार्ट काढताना, लावताना टूलकिट उपयुक्त ठरू शकते.